मुकुंद लक्ष्मण नवरे


संपर्क : mnaware@gmail.com

8976340520

मुकुंद लक्ष्मण नवरे यांचा जन्‍म १९४७ सालचा. त्‍यांनी पशुवैद्यकशास्त्रातील पदवी नागपूर येथून १९६९ साली मिळवली. त्‍यानंतर त्‍यांनी चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ दुग्धविकासाच्या क्षेत्रात व त्यातील पंचवीस वर्षे भारतात श्वेतक्रांती आणणा-या डॉ. वर्गीज कुरियन यांच्या ऑपरेशन फ्लड योजनेत काम केले. त्‍यांनी वयाच्‍या साठीनंतर लेखनास सुरूवात केली. त्‍यांनी 'धनंजय' दिवाळी अंकात दीर्घकथा लिहल्‍या. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा इतर दिवाळी अंकात व 'अंतर्नाद' मासिकात प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचा 'अकल्पित कथा' हा कथासंग्रह विजय प्रकाशन, नागपूर, यांकडून प्रकाशित करण्‍यात आला आहे.


दि स्टुडण्ट्स इंग्लिश मराठी डिक्शनरी : वाडवडिलांचे आशीर्वाद जणू!

(1 प्रतिक्रीया) माझ्या संग्रहातील एक पुस्तक आता शंभर वर्षे वयाचे झाले आहे. ‘दि स्टुडण्ट्स इंग्लिश मराठी डिक्शनरी‘ हे त्या पुस्तकाचे नाव. ती त्‍या डिक्‍शनरीची १९१६ साली प्रकाशित झालेली पहिली आवृत्ती आहे. गंगाधर वामन लेले, (बी. ए., निवृत्त आजीव सभासद, दि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे) आणि कृष्णाजी गोविंद किनरे (शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल, पुणे) हे त्‍या डिक्शनरीचे संपादक आहेत. शंकर नरहर जोशी यांनी 'चित्रशाळा प्रेस, ८१८ सदाशिव पेठ, पुणे' येथे पुस्तकाचे मुद्रण करून ते प्रकाशित केले आहे. त्या पुस्तकातील प्रस्तावनेवर २५ जुलै १९१६ हा दिनांक असून पुस्तकात सुमारे पस्तीस हजार शब्द आणि पंधरा हजार म्हणी व वाक्संप्रदाय संग्रहित केले असल्याचे संपादकांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे पुस्‍तकात प्रत्येक शब्दासमोर मराठी उच्चारण देण्यात आलेले आहे. पुस्तकाची पृष्ठसंख्या आठशेदहा असून अधिक परिशिष्टाची पृष्ठे तेरा आहेत. माझ्याकडील पुस्तकाचे नंतर कधीतरी बाइंडिंग करून घेण्यात आले असल्याने त्या पुस्‍तकाचे बाहेरील आवरण कसे असेल ते कळून येत नाही.