Member for

9 months 2 weeks

९९६७८४१२९६
अनंत पांडुरंग देशपांडे हे इलेक्ट्रिकल आणि मेकेनिकल इंजिनिअर. त्यांनी पुणे व मुंबई येथे चार कारखान्यांत मिळून पस्‍तीस वर्षे नोकरी केली. देशपांडे १९७५ पासून 'मराठी विज्ञान परिषदे'च्या मध्यवर्ती संस्थेचे कार्यवाह आहेत. परिषदेच्या सर्व प्रकारच्या वाढीत त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी 'नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्यूनिकेटर्स' ही संस्था १९९७ साली स्थापन केली. ते त्‍या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यासोबत ते 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया'च्या घाटकोपर शाखेचे वीस वर्षांपासून अध्यक्षपद भूषवत आहेत. ते त्‍यासोबत आकाशवाणी, नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स अॅण्‍ड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन, दिल्ली आणि महाराष्ट्र शासनाची साहित्य पुरस्कार समिती, तसेच नेहरू सायन्स सेंटर अशा अनेक संस्थांवर कार्यरत होते. देशपांडे यांनी विज्ञान विषयावर दीड हजारांहून अधिक जाहीर भाषणे दिली आहेत. त्‍यांनी हजाराहून जासत संख्‍येने लेख लिहीले आहेत. त्‍यांचे आकाशवाणीवर दोनशे साठ तर दूरदर्शनवर साठ कार्यक्रम झाले आहेत. त्‍यांच्‍या नावावर सत्‍तावन्‍न पुस्तके आहेत. त्‍यांना केंद्र सरकार, फाय फाउंडेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे, निर्माण फाउंडेशन यांच्‍याकडून विविध पुरस्कार मिळाले आहेत.