रोहिणी आठवले


संपर्क : rohiniathavale@yahoo.com

9423007913

रोहिणी आठवले पुण्‍यातील 'ज्ञानमित्र अकादमी'च्‍या प्रोपरायटर आहेत. त्‍यांनी मुंबई विद्यापीठातून एम.एसस्‍सी.ची पदवी (प्रथम श्रेणी) मिळवली. त्‍यांनी त्‍यानंतर Plant Tissue Culture या विषयावरील पीएचडी पुणे विद्यापीठातून पूर्ण केली. त्‍यांनी 'ज्ञानमित्र अकादमी'मध्‍ये वनस्‍पतीशास्‍त्र हा विषय बारा वर्षे शिकवला. पुढे त्‍या अध्‍यापनाच्‍या कामातून निवृत्‍त झाल्‍या. त्‍या 'समवेदना' या संस्‍थेसोबत २०१६ पासून कार्यरत आहेत. रोहिणी आठवले त्‍या संस्‍थेकरता 'त्‍वचा दान' या विषयावर जनजागृती करण्‍यासाठी प्रयत्‍नशील असतात.


आरोग्यपूर्ण समाजासाठी – समवेदना

(2 प्रतिक्रीया) दुसऱ्याची वेदना स्वत:ची समजून ती दूर करण्यासाठी एकत्रितपणे केलेले प्रयत्न म्हणजे ‘समवेदना’! आवश्यक वैद्यकीय सेवा वंचितांपर्यंत सहानुभूतीपूर्वक पोचवणे हे ‘समवेदने’चे ध्येय. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चारूदत्त आपटे व त्यांचे सहकारी यांनी १ एप्रिल २००३ रोजी पुणे येथे ‘समवेदने’ची सुरूवात केली. न्युरोसायन्सेस ट्रस्ट व रिसर्च सोसायटीतर्फे ‘समवेदना’ उपक्रम चालतो. ‘समवेदना’चे कार्य उपचार, प्रतिबंध व जनजागृती या, आरोग्यक्षेत्रातील तीन स्तंभांवर आधारित आहे.