सीताराम निकम


संपर्क : nikamgeography@gmail.com

9420693626


सीताराम आर. निकम हे नाशिक शहरात राहतात. त्‍यांनी निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव महाविद्यालयात भूगोलाचे प्राध्‍यापक म्‍हणून काम केले आहे. सध्‍या ते 'कर्मवीर शांताराम कोंडाजी वावरे' महाविद्यालयात प्राध्‍यापक पदावर कार्यरत आहेत. निकम यांना भूगोल शिकवण्‍यापेक्षा अनुभवण्‍यास आवडतो. त्यासाठी ते मित्रमंडळींना सोबत घेऊन भटकंती करतात. त्‍यांचा नव्‍या, अपरिचित जागा शोधणे हा छंद आहे. ते त्‍यांच्‍या भटकंतीबाबत लेखन करतात.


इगतपुरीचा नवरा-नवरीचा डोंगर

(13 प्रतिक्रीया) नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कुशेगावजवळ नवरा-नवरीचा डोंगर प्रसिद्ध आहे. गिर्यारोहणासाठी लोकांना आवडेल असे ते ठिकाण आहे. ‘डोंगराच्या कुशीत वसलेले’ म्हणून त्या गावाचे नाव कुशेगाव. नाशिकहून वाडीवऱ्हे फाटा येथून वळले, की पश्चिमेकडे वीस किलोमीटर अंतरावर कुशेगाव लागते. गाडी कुशेगावला पार्क करून डोंगराच्या दिशेने पायी जावे लागते. डोंगर दुरून विलोभनीय दिसतो.

श्री क्षेत्र कावनाई

(8 प्रतिक्रीया) नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनाई हे ठिकाण पर्यटन आनंदासाठी अनेक दृष्टींनी परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबर गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो. कावनाई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे. ते तीर्थ अकरा लाख बत्तीस हजार वर्षें प्राचीन तीर्थस्थान आहे असे मानले जाते. त्या वेळी त्या तीर्थावर प्रथम कुंभमेळा झाला, म्हणे. कावनाई येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्‍थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, असा भाविकांचा समज आहे.