दिपाली सुधिंद्र


संपर्क : deepasy@gmail.com

967 309 7077

दिपाली सुधिंद्र या शुभदा लांजेकर यांच्‍या मानसकन्या. त्‍या पुण्‍यातील 'साथी' या संस्थेत सार्वजनिक आरोग्यासंबंधात २००६ पासून 'रिसर्चर' म्हणून काम करत आहेत.


शुभदा लांजेकर व आवाबेन नवरचना संस्था

(2 प्रतिक्रीया) शुभदा लांजेकर यांचा जन्म पुण्यातील. बालपण बरे गेले. त्या अकरावीपर्यंत शिकल्या. वडील अतिशय कडक शिस्तीचे. आई प्रेमळ, मनमिळाऊ, पाककलेची आवड असणारी गृहिणी होती. दुसऱ्यांना अडीअडचणीत मदत करणे हा आई-वडिलांचा स्वभाव होता. त्यामुळे शुभदा प्रेमात पण कडक शिस्तीत वाढल्या. त्यांनी शिक्षण चालू असताना थोडे अर्थार्जन केले. त्या साड्यांवर टिकल्या भरणे, साडीच्या पदराला जाळी गोंडे करणे अशी कामे करत. त्यांना त्या कामांत आई मदत करत असे. तयार माल दुकानात पोचवण्याचे काम करावे लागे. ते काम वाढले तेव्हा त्यांनी आजुबाजूच्या गरीब गरजू महिलांना काम दिले. वीसपर्यंत महिला ते काम करत एवढा व्याप वाढला. त्यामुळेच त्यांना सामाजिक जाणीव आली आणि उपक्रम फलदायी पद्धतीने चालवण्याचे शिक्षण मिळाले.