Member for

1 year 3 months

संध्या जोशी यांचे बालपण अलिबाग येथे गेले. त्‍यांचे शेजारी ज्‍यू समाजाचे होते. संध्या जोशी यांचे शिक्षण बी.एस्.सी, एम.ए (तत्‍वज्ञान) झाले. तत्‍वज्ञान आणि योग हे त्‍यांचे आवडीचे विषय. त्‍या जेरुसलेम येथे भरलेल्या 'जागतिक मराठी परिषदे'मध्‍ये १९९६ साली सहभागी झाल्‍या होत्‍या. त्‍यांनी इस्राइलमध्‍ये जाऊन अनेक मराठी लोकांच्‍या मुलाखती घेतल्‍या. त्‍यांनी लिहिलेली 'इस्रायलची मराठी लेकरे' आणि 'अग्नीपूजक पारसी' ही पुस्‍तके 'ग्रंथाली'कडून प्रसिद्ध करण्‍यात आली. संध्या जोशी यांनी पूर्वी विविध वृत्तपत्रांतून लेखन केले आहे. माधव गडकरी यांनी संपादित केलेल्‍या पुस्‍तकात जोशी यांनी इस्राइलसंबंधात भाग लिहिला आहे.

User Phone

9833852379