Member for

11 months 4 weeks

अरुण गोडबोले हे सातारकर. त्‍यांची तत्वज्ञान, आयकर, चित्रपट, प्रवासवर्णन अशा विविध विषयांवर आजवर छत्‍तीस पुस्‍तके प्रसिद्ध आहेत. त्‍यांचा गेल्‍या त्रेपन्‍न वर्षांपासून करविषयक सल्‍लागार म्‍हणून लौकिक आहे. त्‍यांनी पाच मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून त्‍यांना राज्य व अन्य  पुरस्कार प्राप्‍त आहेत. त्‍यांनी 'प्रकटले श्रीराम चाफली' आणि 'अदृष्टांची दृष्टी' या दोन लघुपटांची निर्मिती केली आहे. त्‍यांना विविध संस्था, राज्य शासन यांच्‍याकडून लेखन आणि चित्रपट यांकरता अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्‍यांनी स्‍वतःच्‍या 'कौशिक प्रकाशना'तर्फे गेल्‍या तीस वर्षांत एकशे पंचेचाळीस पुस्‍तके प्रकाशित केली आहेत. त्यातील अनेक पुस्‍तकांचा पुरस्काराने गौरव करण्‍यात आला आहे. गोडबोले हे अनेक आर्थिक, सामाजिक व धार्मिक संस्थावर अध्यक्ष-विश्वस्त स्‍वरुपात कार्यरत राहिले आहेत. ते 'समर्थ थीम पार्क'चे संयोजक आहेत.

User Phone

9822016299