Member for

4 years 11 months

सोनाली नवांगुळ या मुक्त पत्रकार, लेखक व अनुवादक आहेत. त्‍या ‘स्पर्शज्ञान' या ब्रेल पाक्षिकेच्या उपसंपादक म्हणून काम करतात. त्‍या अनेक नियतकालिकांमध्ये आणि साप्ताहिकांमध्ये विविध विषयांवर लेखन करतात. त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रिय सदरांचे संकलन असलेले ‘स्वच्छंद' हे पुस्‍तक 'मेनका प्रकाशना'ने प्रकाशित केले आहे. दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणा-या ऑस्कर पिस्टोरिअस या धावपटूच्या आत्मकथनाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘ड्रीमरनर' या नावाने ‘मनोविकास'ने प्रकाशित केला आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमधील स्त्रियांचे लेखन मराठीत यावे याकरता 'मनोविकास' प्रकाशित व कविता महाजन संपादित जी महत्त्वाची पुस्तक मालिका आली त्यातील सलमा या तमिळ बंडखोर लेखिकेची कादंबरी सोनाली यांनी ‘मध्यरात्रीनंतरचे तास' या नावाने मराठीत आणली आहे. त्यांची आणखी दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सोनाली यांनी २०१४ मध्ये पुणे येथे झालेल्या 'अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना'चे अध्यक्षपद भूषविले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9423808719