शंकर बोऱ्हाडे


संपर्क : shankarborhade@gmail.com9226573791

शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात. त्यांनी लिहिलेला, 'ठाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची चिकित्सा करणारा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे.


मराठा समाजाचा आक्रोश मराठी साहित्याला का ऐकू येत नाही?

(4 प्रतिक्रीया) ग्रामीण लेखकांनी मराठा समाज गृहीत धरून त्यांच्या कथा-कादंबऱ्या बेतल्या, पण निखळ मराठा समाजमन मांडले नाही. साहित्यात शोषण करणारी जमात म्हणूनच मराठा समाजाचे चित्रण होत राहिले.

सुनिता पाटील यांची स्मशानसेवा

(2 प्रतिक्रीया) नाशिकच्या रामचंद्र हिरवे यांच्या चार-पाच पिढ्यातरी ‘पंचवटी स्मशानभूमी’त गेल्या आहेत. हिरवे कुटुंबाची स्मशानभूमीत वखार होती. ते लोकांना लाकडे व इंधन पुरवत. पुढे, ते काम महापालिकेने घेतले. नाशिकची महापालिका प्रेते दहन करण्याकरता विनामूल्य लाकडे पुरवते. त्यांनी त्यापुढे जाऊन सरण रचणे आणि अंतिम संस्कार सुसह्य करणे या कामी लोकांना मदत केली. त्यांची मुलगी सौ. सुनिता राजेंद्र पाटील तो वसा चालवत आहे. सुनिता पाटील यांचा जन्म नाशिकला स्मशानातच झाला! त्या वाढल्याही त्या वातावरणात. पण त्यांची दृष्टी-मेली नाही, उलट संवेदना जागी झाली. सुनिता शिकल्या पंचवटीतील ‘गणेश विद्यालय’ आणि ‘नर्गिस दत्त कन्या विद्यालय’ या शाळांत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी प्रथम एका पुरुषाचा अंतिम संस्कार विधिवत केला आणि दहा वर्षांत बारा हजारांहून अधिक प्रेतांना तशीच स्वर्गाची वाट दाखवली. सुनिता या अंतिम सोहळ्यालाही आनंददायी करू पाहतात.

स्वास्थ्यासाठी नाशिककरांची पंढरपूर सायकलवारी

(5 प्रतिक्रीया) ‘नाशिक सायक्लिस्ट’ ही हौशीने सायकल चालवणाऱ्या मंडळींची ऑर्गनायझेशन गेल्या तीन-चार वर्षांत नाशिकमध्ये सक्रिय झाली आहे. नाशिक शहरात सायक्लिस्ट मंडळींची संख्या वाढत आहे. त्यातच महेंद्र व हितेंद्र महाजन या डॉक्टर बंधूंनी ‘रॅम रेस अॅक्रॉस अमेरिका’ ही चार हजार आठशे किलोमीटरची स्पर्धा जिंकली आणि नाशिकचे नाव सायक्लिस्टांचे गाव म्हणून भारतभर झाले. पुणे शहराची ओळख सायकल चालवणारे शहर अशी एके काळी होती. स्वयंचलित टू व्हिलर आल्यावर त्यांनी प्रथम पुणे ताब्यात घेतले. आता, नाशिकसह सर्व जिल्ह्यांच्या शहरी स्कुटी, मोटार सायकली यांचेच राज्य दिसते. त्यामुळे सायकलला छांदिष्टांचे, व्यायामप्रेमींचे व पर्यावरणवाद्यांचे वाहन म्हणून प्रतिष्ठा मिळत आहे. नाशिकमध्ये सकाळ, सायंकाळ सायकल चालवणा-यांची संख्या लक्षणीय रीत्या वाढलेली दिसते.

सुमंतभाई गुजराथी - इतिहास संवर्धनाचे शिलेदार

(5 प्रतिक्रीया) सुमंतभाई गुजराथी म्हणजे सिन्नर तालुक्यातील गेल्या पाच दशकांतील सांस्कृतिक व ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार. नव्वदाव्या वर्षांतही ताजेतवाने. तो माणूस म्हणजे ऊर्जास्रोत होता. त्यांनी नोकरी म्हणाल तर एस टी महामंडळात कारकुनाची केली. पण एरवी, ते सतत काही करत असायचे. त्यांचे संपर्काचे साधन होते पोस्ट कार्ड. पोस्ट कार्डच्या बळावर सुमंतभार्इंनी अनेक गोष्टींचा पाठपुरावा केला.

अनुराधा राव - संवेदनशील गाईड

(1 प्रतिक्रीया) मी अंदमानच्या रॉस आयलंड बेटावर फिरत असताना आमच्‍या टूरिस्ट कंपनीने एक गाईड बोलावली होती. तिचे नाव अनुराधा राव. तिला पाहिल्‍यानंतर प्रथम दर्शनी तिच्याविषयी कुतूहल वाटत नाही. तरी तिने दंडात घातलेल्या पितळी देवदेवतांच्या मूर्तीवरून ते रसायन वेगळे असल्याचे लक्षात आले. अनुराधा राव ही बंगाली स्त्री. तिच्या चार पिढ्या अंदमान बेटावर नांदल्या. तिचे एकत्रित कुटुंब होते. ते आज राहिले नाही.

कुंभमेळ्यातील महाइव्हेंट

(1 प्रतिक्रीया) हिमालयबाबाचा एकशेआठ दिवसांचा यज्ञ नाशिकला कुंभमेळा चोवीसशे कोटींवर पोचला आहे! महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, आरोग्यविभाग आणि पोलिस या यंत्रणांचा आधुनिक हायटेक यंत्रणा उभारण्याकडे कल आहे. साधुग्राम नावाचे नवे तात्पुरते गाव वसवण्यात आले आहे.

बहुजन सांस्कृतिकवादाकडे – जयंत पवार

महर्षी शिंदे यांची उपेक्षा ही त्यांच्या हयातीतच झाली. डिप्रेस्ड क्लास मिशनमधूनही त्यांना बाहेर पडावे लागले. डॉ. आंबेडकरकेंद्री विचारक महर्षी शिंदे यांची कोणती दखल घेत नाहीत. जयंत पवार यांनी बदललेल्या संदर्भात ती घेतली आहे हे मला महत्त्वाचे वाटते. - प्रा. शंकर बो-हाडे

विजय म्हस्के - बुद्धिमान युवा शास्त्रज्ञ

(25 प्रतिक्रीया) शारीरिक अपंगत्वावर मात करून युवा शास्त्रज्ञ म्हणून लौकिक मिळवणाऱ्या विजय म्हस्के याच्या जिद्दीची कहाणी.