गिरीश अभ्यंकर - मजेत राहणारा माणूस!

(3 प्रतिक्रीया) ज्याला त्याला, प्रत्येकाला अन्न कसं आवडतं आणि ते कसं शिजवायचं आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे ही गिरीश अभ्यंकरांची मूळ भूमिका. एक मशीन केलं आणि त्याच्या हजारोंनी प्रती बनवल्या अशी भानगड नाही. ज्याची त्याची (शारीरिक!) उंची, ज्याची त्याची जागा, ज्याची त्याची सर्व सोय बघून ज्याचं त्याला सर्व करता येईल अशी रचना हवी.

राँग थिअरी

आपण आणि आपल्या आजुबाजूचा जगरूपी पसारा याविषयी विचार करणे ही माणसाच्या आवडीची गोष्ट. लहान मूलसुद्धा स्वत:साठी त्याच्या परीने तसा विचार करत असते. अजमावत असते, की हे काय विश्व आहे - येथे काय केले जाऊ शकते... मला काय काय करता येऊ शकते... काय केले तर मजा येते... काय झाले तर धडपडायला होते... त्याला त्रास कशामुळे होतो... त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास कधी होतो... माणूस अनुभवाच्या प्रक्रियेतून, विचार करण्यातून मोठा होतो. त्याचे लहानपणीचे काही समज-गैरसमज कुणी न सांगता बदलतात; काही तसेच राहतात, भक्कम होतात. त्याचे आकलन घडवण्याला - स्वानुभवाच्या जोडीला इतरांचे अनुभव, काही सामुहिक माहिती (पुस्तके, वर्तमानपत्रे इत्यादी) - मदत करतात. त्या सगळ्यातून त्याचा कॉमन सेन्स किंवा सर्वसाधारण समज आकाराला येतो.