‘नॉ लिंग’ : रेवदंडा गावाजवळ सापडले दुर्मीळ भाषेचे धन प्रसाद फाटक 12/12/2019

_korlai_gad_korlai_gaonकोरलई हे रायगड जिल्ह्यातील रेवदंड्याच्या खाडीच्या पलीकडे असणारे छोटेसे गाव. ते अलिबागपासून बावीस किलोमीटरवर आहे. ते रेवदंड्याच्या खाडीत घुसलेल्या भूभागावर वसलेले आहे. कोकण किनारपट्टीवर वसलेल्या कोठल्याही छोट्या गावासारख्याच खाणाखुणा अंगावर वागवणारे. शेती आणि मासेमारी हा तेथील मुख्य व्यवसाय. पण तेथील एक गोष्ट विशेष आहे - आणि ती एकमेवाद्वितीय आहे! ती म्हणजे तेथे बोलली जाणारी भाषा. ती भाषा त्या गावाव्यतिरिक्त जगात इतरत्र कोठेही बोलली जात नाही. 

शाही दफन भूमी - खोकरी

Think Maharashtra 19/09/2019

-khokriमुरुडवरून म्हसळा येथे जाताना चार किलोमीटरवर एका टेकडीवर खोकरी नावाचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांचा भास मशिदी असल्यासारखा होतो. त्या वास्तू आपले लक्ष्य वेधून घेतात. पण त्या प्रत्यक्षात मशिदी नसून मुरुड संस्थानाचे राजे सिद्दी यांच्या तीन शाही कबरी आहेत.

कबरी दगडी तीन आहेत. त्या सुमारे साडेचारशे वर्ष जुन्या आहेत. सर्वात मोठी कबर सिद्दी सुरूल खान यांची आहे. जंजिऱ्याची सत्ता सुरूल खान यांच्या हातात 1708 ते 1734 या काळात होती. सुरुलखानाची कबर त्याच्या हयातीत बांधण्यात आली असे सांगण्यात येते. सुरुलखानाची कबर उंच चौथऱ्यावर आहे. तेथपर्यत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. कबरीच्या भिंतीवर दगडात जाळ्या कोरल्या आहेत. तसेच, छोटीछोटी कोष्टके बनवली आहेत. कबरीवर सर्वत्र फुलांचे कोरीव काम केलेले आहे. कबरीच्या अंतर्भागात सुरुलखान आणि त्यांचे गुरु यांचे थडगे आहे.

सुजलाम सुफलाम गाव – मुरुड-जंजिरा (Murud Janjira Village)


मुरुड-जंजिऱ्याला सिद्दी संस्थानचा इतिहास आहे, छत्रपतींनी ते सर करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. तेव्हा दर्यासारंग दौलतखानाने बाजूलाच, कासा खडकावर पद्मदुर्ग उभा केला...

मुरुड-जंजिरा हे माझे गाव. रेवदंडा-साळाव पूल ओलांडून मुरुडकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी बदलती दृश्ये नजर खिळवून ठेवतात. अधुनमधून समुद्राच्या लाटांचा खेळ, तर कधी नजरेला सुखावणारी मुलायम हिरवळ, मध्येच लागणारी लहानशी गावे.

शिल्पकलेचा देखणा आविष्कार मुरुडच्या वेशीवर दृष्टीस पडतो, तो म्हणजे जंजिऱ्याच्या भूतपूर्व नवाबांचा राजवाडा. नवाबांनी तो राजवाडा 1885 च्या सुमारास प्रशासनाच्या सोयीसाठी बांधला. राजवाड्याचे शिल्प मुघल व गोथिक पद्धतीचे आणि मनोहारी आहे. राजवाड्याच्या ठिकाणापासून सभोवारचा समुद्र व मुरुड शहराच्या परिसराचे दृश्य विहंगम दिसते. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी.

मुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी

प्रतिनिधी 08/06/2015

कोटेश्वरी ही मुरुडची ग्रामदेवता. मुरुड-जंजिरा शहरात प्रवेश करताना, सीमेवर कोटेश्वरी देवीचे मंदिर आहे. देवस्थान तीनशे वर्षांपूर्वींचे आहे. देवीचे मूळ स्थान मुरुड शहरासमोर समुद्रात उभ्या असलेल्या पद्मदुर्गात (कासार जलदुर्ग) आहे असे मानले जाते. अकल्पित भ्रष्ट घटना घडली आणि देवीने किल्ल्यातील मूळ स्थान सोडले व तिचा मुखवटा मुरुड शहराच्या सीमेवरील शेतजमिनीत लाठीच्या खांबावर प्रकट झाला! राज्यातील त्वष्टा कासार समाजबांधवांची त्या देवीवर जास्त श्रद्धा आहे.