सोमनाथची जलश्रीमंती!


सोमनाथ म्हणजे दुसरे ‘आनंदवन’च! परंतु ‘आनंदवना’पेक्षा तेथे काही खास आहे.  ते म्हणजे, वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी कल्पकतेने अमलात आणलेल्या उपाययोजना. विकास आमटे यांच्या प्रयोगशीलतेतून अस्तित्वात आलेले जलसंधारणाचे विविध प्रयोग आणि त्या माध्यमातून लाभलेली जलश्रीमंती हे ‘सोमनाथ’चे शक्तिस्थान. विकास आमटे हे ‘सोमनाथ प्रकल्पा’चे आधुनिक भगीरथ आहेत.

प्रकल्पाच्या एक हजार तीनशेएकाहत्तर एकर परिसरात पूर्वी शेती होती, पाणीदेखील उपलब्ध होते. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यालगतचा तो परिसर. तो विपुल पावसासाठी प्रसिद्ध आहे. बाबा आमटे यांनी त्या परिसरातील एका नाल्यावर दहा मीटर उंचीचा बंधारा उभारला; पाणी साठवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे ‘सोमनाथ’ म्हणजे ‘आनंदवन’ आणि अन्य बाबा आमटे प्रेरित प्रकल्प यांच्यासाठी धान्याचे कोठार ठरले. ‘सोमनाथ’ म्हणजे आमची तांदळाची खाण असे साधना आमटे म्हणत. कुष्ठमुक्तांनी त्यांच्या घामातून उभारलेले, आदर्श असे स्वयंपूर्ण गाव! तशी ख्याती ‘सोमनाथ’ने निर्माण केली.

पवई तलावावरील ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’

अज्ञात 13/09/2015

मुंबईच्या पवई तलावाचे जलसंरक्षण कार्य 'नौशाद अली सरोवर संवर्धिनी' करते. पवई तलाव आणि दिवंगत ‘ख्यातनाम संगीतकार नौशाद अली यांचे नाते अतूट होते. नौशाद अली हे ‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’चे अनेक वर्षे अध्यक्ष होते. त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील उत्तम काम पवई तलावाच्या काठीच सुचले आहे असे ते काही वेळा बोलून दाखवत. पवई तलावाच्या संवर्धनाकरता ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’ या संस्थेची स्थापना झाल्याने माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले असे त्यांचे ज्येष्ठ पुत्र राजू नौशाद अली म्‍हणतात व वडिलांचे नाव सरोवर संवर्धिनीला दिल्याने आनंद व्यक्त करतात.

सरोवर संवर्धिनी ही संकल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न डॉ. एम.एस. कोडारकर यांनी काही ठिकाणी केला व तो यशस्वीही झाला. कोडारकर यांनी काही वर्षे इंग्लंडला लोच लोमंडं या फिल्टर स्टेशनवर संशोधनात्मक काम केल्यामुळे त्यांच्या गाठीशी तसा अनुभव होता, त्याचा फायदा पवई तलावाच्या संवर्धनाकरता घ्यावा याकरता ‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’ने घेतला. पवई तलावाचे संवर्धन करता यावे आणि पर्यावरणाविषयी विद्यार्थी व जनसामान्य यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’ने ‘इंडियन असोसिएशन ऑफ ऑक्वाटिक बायोलोजिस्ट’ या संस्थेच्या मदतीने ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’ या संस्थेची स्थापना 2 फेब्रुवारी 2008 रोजी केली. पवई तलावातील जल आणि मत्स्य संवर्धन करणे, जलजागृती करून जलसाक्षरतेची मोहीम राबवणे, प्रशिक्षण शिबिरे योजणे, शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि स्थानिक पातळीवर विविध प्रकारे पर्यावरण तसेच प्रदूषण मुक्ततेचे कार्यक‘म राबवणे ही संस्थेची उद्दिष्टे आहेत.

दुष्काळ आहे सुनियोजनाचा


भारतात पडणारा वार्षिक पाऊस हा चार हजार बीसीएम आहे व हा पाऊस देशाला पुरेसा आहे, जर तो नीट अडवला तर.

महाराष्ट्रातील पाण्याची उपलब्धता - महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र 307.71 हजार चौरस किलोमीटर असून ते गोदावरी, कृष्णा, तापी,नर्मदा व कोकण अशा पाच मुख्य खो-यांमध्ये आणि पंचवीस उपखो-यांमध्ये विभागले आहे. राज्यात लहानमोठ्या मिळून नद्यांची संख्या चारशे इतकी आहे. राज्यभरातील पावसाच्या प्रमाणात विविधता असल्याने पाण्याची उपलब्धतादेखील राज्यभर समान नाही. सह्याद्री विभागात राज्याचे तेरा टक्के क्षेत्र असून तेथे पंचवीस टक्के पाऊस पडतो. पठारी भागातदेखील सह्याद्रीइतके क्षेत्र असले तरी केवळ एकोणीस टक्के पाऊस पडतो; परंतु खानदेश, कृष्णा व गोदावरी खो-यांतील क्षेत्र मात्र चौतीस टक्के असून तेथे जेमतेम वीस टक्के पाऊस पडतो. घाटाकडील काही भाग, विदर्भ व मराठवाडा या भागांत जमिनीचे क्षेत्र व पडणा-या पावसाचे प्रमाण जवळपास सारखे आहे.

श्रमदानातून ढगेवाडीचा कायापालट

अज्ञात 10/08/2015

संगमनेर-भंडारदरा रस्त्यावर अकोल्याच्या जवळ डोंगरांच्या रांगेमध्ये ‘ढगेवाडी’ हा पाडा वसलेला आहे. ढगेवाडीला जायचे असेल तर तीन डोंगर ओलांडून, चढ चढून वर गावात जावे लागे. तीस वर्षांपूर्वी त्या पाड्यावर पन्नास-साठ कच्च्या झोपड्या होत्या. पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरून पाच किलोमीटर अंतर चालून जावे लागत होते. पावसाळ्यात तेथे थोडीफार शेती होई. पण नंतर गावातील लोक मजुरीसाठी दूर जात असत. ते रस्तादुरुस्ती, बांधकाम, ऊसतोडणी अशा कामांच्या शोधात वणवण फिरत. त्यांच्या मागे पाड्यावर म्हातारी-कोतारी आणि लहान मुले राहत.

ढगेवाडीतला एक तरुण, भास्कर पारधी हा त्या परिस्थितीतून गावाला बाहेर कसे काढावे या विचारात असायचा. भास्करने शालेय शिक्षण अकोला (ता. संगमनेर) येथील ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या वसतिगृहात राहून घेतले. त्यालनंतर तो पुण्यातील मोहन घैसास यांच्या ‘सुयश चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेत काम करू लागला. त्याला त्यातून नवी दृष्टी मिळाली. भास्कसरची विचारचक्रे गावाच्या विकासाच्या दृष्टीने फिरू लागली. तो ढगेवाडी पाड्यावर परत आला. त्यांरच्यारसोबत ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे कार्यकर्ते व ‘सुयश ट्रस्ट’चे मोहन घैसास व स्मिता घैसास हेदेखील होते. त्यांनी मिळून ढगेवाडीची पाहणी केली. विकासाच्या दृष्टीने काही योजना आखल्या. मग त्यांनी ग्रामस्थांना एकत्र करून, त्यांना त्या योजना समजावून दिल्या. जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. गावक-यांना त्यांच्या  उत्साहाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गावातील तरुणांच्या मदतीने गावाभोवतालच्या डोंगरउतारावर ठिकठिकाणी चर खणून पावसाचे पाणी जिरवण्याची व्यवस्था केली. गावात पाझर तलाव होता. त्या तलावाच्या खाली बांध बांधला. अशा तऱ्हेने पावसाचे पाणी अडवण्याची व्यवस्था झाली. ते सर्व ढगेवाडीतील गावकऱ्यांच्या श्रमदानातून घडले.

दिलीप उतेकर - साखर गावचा भगिरथ


दिलीप उतेकरदिलीप उतेकर हे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातले. खेड तालुक्यापासून ४८ किलोमीटर अंतरावर असलेले साखर हे त्यांचे गाव. उतेकरांचा जन्म तिथला. त्यांनी गावात सातवीपर्यंत शिक्षण घेतले आणि दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी जवळचे धामणंद गाव गाठले. मग बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी चिपळूण, तर त्यापुढील शिक्षणासाठी मुंबई असा त्यांचा प्रवास त्यांना गावापासून दूर घेऊन गेला. उतेकर वीस वर्षांचे असताना मुंबईत आले. त्यांनी मुंबईत शिपाई, लोडर अशी कष्टाची कामे करत काही वर्षांत स्वतःचा शिपिंगचा छोटा व्यवसाय थाटला.

उतेकर पंचावन्न वर्षांचे आहेत. ते तीस वर्षे गावापासून दूर राहिले. मात्र तरीही त्यांचे चित्त त्यांच्या गावातच होते. त्याचे कारण तर विशेष आहेच, त्यातून जे घडले ते त्याहून आश्चर्य वाटण्याजोगे आहे.

साखरगाव आणि परिसराला ‘पंधरागाव परिसर’ असे म्हटले जाते. तो प्रदेश खडकाळ आहे. गावात पाऊस भरपूर, मात्र पाणी अडवण्याची-जिरवण्याची कोणतीच योजना नव्हती. त्यामुळे गावाला पाण्याच्या  टंचाईचा सामना करावा लागे. गावातील स्त्रियांना पाण्यासाठी गावापासून आठ-दहा किलोमीटर चालत जावे लागे. डोंगरातून फुटणा-या पाझरातून पाण्याचे हंडे भरण्यास दोन-दोन तास लागत. त्या स्त्रियांना अनेकदा गावाजवळच्या लहानमोठ्या पाणवठ्यांवर खोदलेल्या खड्ड्यांच्या शेजारी कंदिलाच्या उजेडात रात्रभर वाट पाहवी लागे. पाण्याची टंचाई एवढी होती, की मी जनावरेही पाण्यावाचून मरताना पाहिली, असे उतेकर सांगतात.

कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प!


 भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारताच्या शांति‍पर्वात म्हटले आहे, की “हे राजन,लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होता. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेव्हा सगळ्या नद्यांचे रक्षण, संवर्धन करणे हाच राजाचा धर्म आहे.”
 

कोरडी पडलेली आटपाडी तालुक्यातील माणगंगा  नद्यांचे महत्त्व महाभारत काळापासून विशद केले जात असले, तरी नद्यांबाबत आपण आणि आपले राज्यकर्ते म्हणावे तेवढे जागरूक नाही. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतून वाहणा-या माणगंगा या ऐतिहासिक नदीचे देता येईल. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली , सोलापूर आणि सातारा या तीन सुजलाम्-सुफलाम् जिल्ह्यांतील दुष्काळी भाग म्हणजे माणदेश. पाऊसमान कमी म्हणून समृद्धता नाही आणि समृद्धता नाही म्हणून विकास नाही. या दुष्टचक्रात अडकलेल्या माणदेशी माणसांचे स्वप्न आहे विकासाचे. पण शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याला पारख्या असलेल्या त्या माणसांवर निसर्गानेच अन्याय केला आहे. त्या भागातून जाणारी माणगंगा नदी पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर कायम कोरडी असते.
 

शिरपूरची तीस खेडी जलसंपन्न


सुरेश खानापूरकरपावसाचे पाणी जिथल्या तिथेच अडवा-जिरवा, ते स्थानिकांना वापरू द्या! अशी साधी व सोपी संकल्पना घेऊन सुरेश खानापूरकर काम करत आहेत. त्यांचा प्रयोग चालू आहे तो धुळे जिल्हयातील शिरपूर तालुक्यात. त्यांनी अमरीश पटेल ह्यांच्या सुतगिरणीच्या आर्थिक साहाय्याने एकोणतीस खेडी जलसंपन्न केली आहेत. तेथे मे महिन्यात देखील शेतीला पाणी मिळते; नवी धान्य लागवडं केली जाते! इतरत्रही ठिकाणी असे प्रयोग होत आहेत, पण येथील प्रयोगांची व्याप्ती, त्यात ओतलेला जीव व त्याला असलेला शास्त्रीय आधार यामुळे शिरपूरसारख्या दुष्काळी तालुक्यातील गावेसुद्धा सुजलाम् बनली आहेत.
 

असली, नागेश्वर यांसारखे नाले, जे भर पावसाळ्यातही पाऊस पडून गेल्यानंतर कोरडे व रोडावलेले दिसायचे ते नाले तुडुंब भरलेले असतात. त्यात साठलेल्या पाण्यामुळे आसपासची भूजल पातळी उंचावली आहे. परिणामी, विहिरी व बोअरवेल्सना कमी खोलीवर पाणी लगत आहे. पाणी जमिनीत मुरवण्याकडे आतापर्यंत लक्ष दिले जात नव्हतं. उलटं, वाटेल तसे पाणी उपसले जायचे, त्याचा परिणाम म्हणून पाण्याची पातळी खोल-खोलवर जात राहिली. काही भागांत तर ती इतकी खोल गेली की तिने ही स्थिती बदलण्यासाठी आवश्यकता होती ती जास्तीत जास्त पाणी साठवण्याची व ते हळुहळू जमिनीत मुरु देण्याची! सुरेश खानापूरकरांनी हे केले, त्याचे फळही मिळाले.