चंद्रपूरचा परकोट अज्ञात 10/06/2016

चंद्र‘पुरात शहरासभोवती परकोट आहे. त्याचा पाया गोंड राजवंशातील दहावा परंतु चंद्रपूर येथे राज्य करणारा पहिला राजा खांडक्या बल्लाळशहा याने 1472 च्या सुमारास घातला व त्याची राजधानी बल्लारपूर येथून चंद्रपूरास हलवली. तेल ठाकूर नावाच्या वास्तुशिल्पकाराने परकोटाचा नकाशा तयार केला व साडेसात मैल परिघाची आखणी करून पायाभरणी केली. परकोटाचा पाया बारा फूट खोल आहे. खांडक्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हीरशहा याने बांधकाम सुरू केले. त्याने प्रथम परकोटाच्या चार वेशी उभारल्या. ‘हत्तीवर आरूढ असलेला सिंह’’ हे शौर्याचे राजचिन्ह ठरवून, प्रत्येक वेशीवर बाजूस खोदवले. त्या शिल्पात सिंहाचे शरीरआकारमान हत्तीच्या दुप्पट दर्शवले गेले आहे! हीरशहाचा नातू कर्णशहा याच्या कारकिर्दीत तटाची उंची केवळ अर्ध्यावर बांधून झाली. कर्णशहाचा नातू धुंड्या रामशहा (1597 - 1622) याच्या कारकिर्दीत परकोटाचे काम पूर्ण झाले. त्यानिमित्त मोठे वास्तुपूजन होऊन दानधर्म झाला. याचा अर्थ खांडक्याच्या सहाव्या पिढीत ते काम पूर्ण झाले. सव्वा कोट रुपये खर्च झाला व कामास सव्वाशे वर्षांचा कालावधी लागला. तटाची उंची वीस फूट (सुमारे) असून परीघ साडेसात मैल आहे. परकोटाचा आकार दीर्घ वर्तुळाकार असून पूर्व-दक्षिण बाजूंना झरपट तर पश्चिमेस इरई नदी वाहते.

परकोटाच्या चार प्रवेशद्वारांची नावे जटपुरा, अचलेश्वार, पठाणपुरा व बिनबा अशी आहेत, तर त्यास बगड, हनुमान, विठोबा, चोर व मसाण अशा पाच खिडक्या आहेत. खिडक्यांचा आकारही प्रचंड असून त्यातून ट्रक-ट्रॅक्टर यांची वाहतूक सहज होत असते. ही सर्व नावे भोसल्यांच्या अमलात पडली आहे. जटपुरा दरवाज्यावर गणेशराव जाट, अचलेश्वार दरवाज्यावर भानबा माळी, पठाणपुरा दरवाज्यावर अलिखान पठाण आणि बिनबा दरवाज्यावर बिनबा माळी असे जमादार होते. ते सगळ्या प‘कारच्या आवक-जावकीची नोंद ठेवत असत. त्यांच्याच नावावरून पुढे या दरवाज्यांना नावे देण्यात आली.

तटबंदी

अज्ञात 14/04/2015

तटबंदी (फॉर्टिफिकेशन) म्हणजे शत्रूच्या हल्ल्यापासून आपल्या स्थानांचे संरक्षण व्हावे म्हणून बांधलेली भिंत. आक्रमकांकडून केला जाणारा तोफेच्याे गोळांचा मारा आदी शस्त्रास्त्रांपासून बचाव करणे, शस्त्रास्त्रांच्या हालचालीत व्यत्यय आणणे, समुद्रकिनाऱ्यारून होऊ शकणाऱ्या हल्यालीत पासूनच्याद बचावाची खबरदारी ही तटबंदी बांधण्यानची मुख्यर उद्दिष्टेऱ आहेत. तटबंदीच्या बाहेर चौफेर गोळामारी करता यावी व तटबंदीच्या कोणत्याही ठिकाणाहून शस्त्रास्त्रे सुलभतेने वापरता यावी, असाही त्यामागील उद्देश असतो.

तटबंदीचे स्वरूप अनेक प्रकारचे असू शकते. उदाहरणार्थ, सपाट जमिनीवरील व डोंगरावरील किल्ले, गावासभोवतालच्या कोटभिंती, खंदक, काटेरी कुंपणे इत्यादी कृत्रिम तटबंदीचे प्रकार आणि नद्या, डोंगर व जंगले हे नैसर्गिक तटबंदीचे प्रकार आहेत. आधुनिक काळात महाविध्वंसक शस्त्रास्त्रांच्या माऱ्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी जमिनीच्या पोटात बोगदे वा तळघरे उभारावी लागतात; तथापि अठराव्या शतकाअखेरपर्यंत संरक्षण–व्यवस्थेत जमिनीवरील किल्ल्यांवर भर असे. राजधान्या व दळणवळणाची मोक्याची स्थळे पक्क्या तटबंद्यांनी सुरक्षित केली जात. त्यांस स्थानविशिष्ट तटबंदी (पॉइंट फॉर्टिफिकेशन) म्हटले जाते. तथापि व्यापक क्षेत्ररक्षणास (एरिक डिफेन्स) उपरोल्लेखत तटबंदी–प्रकार योग्य नव्हते. एकोणिसाव्या शतकापासून वैज्ञानिक–तांत्रिक प्रगती झपाट्याने होऊ लागली, त्यामुळे मोठमोठ्या सैन्यांच्या व शस्त्रास्त्रांच्या हालचाली त्वरेने करणे शक्य झाले. म्हणून तटबंदीच्या रचनेतही बदल करणे क्रमप्राप्त ठरले. आधुनिक काळातील जनरल ब्रिऑलमाँत, ग्रुसाँ वगैरे सैनिक वास्तुशिल्पकार प्रसिद्ध आहेत. तटबंदीच्या इतिहासावरून काही प्रमाणात सामाजिक, राजकीय, शास्त्रीय आणि युद्धतंत्रीय बदल कळू शकतात.

भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड


सह्याद्रीच्या कुशीत अनेक ट्रेकिंग पॉईण्टस आहेत. त्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सचा, दुर्गवेड्यांचा ‘विक पॉईण्ट’. ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या त्या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे, कातळ शिल्पे, खोल दऱ्या, उरात धडकी भरवणारे उभे कडे, समृद्ध वनसंपदा, प्राचीन वास्तू कलेचे दर्शन घडवणारी देखणी मंदिरे, लेणी समूह...

सह्याद्रीत अनेक कोकणकडे आहेत, परंतु हरिश्चंद्र गडाचा हा थोरला कडा म्हणजे सृष्टीला पडलेले सुंदर स्वप्नच जणू! देशभरात अत्यंत दुर्मिळ दिसणाऱ्या वर्तुळाकार इंद्रधनुष्याचा (इंद्रवज्र) अद्भुतरम्य देखावा काही दुर्गवेड्यांनी तेथे पाहिला आहे. म्हणूनच तो गड हा एक अनमोल ठेवा आहे.

कोरीगड किल्ला


महाराष्ट्रातील किल्ले लक्षात घेतले तर काही ठरावीक गोष्टी, रचना प्रत्येक किल्ल्यांमध्ये आढळतात. सभोवताली किंवा दूरपर्यंत नजर ठेवता यावी यासाठी डोंगराच्या माथ्यावर किल्ल्याचे स्थान, चौफेर तटबंदी (बेलाग-उंच कडा असेल तर तटबंदी नाही), सहज न दिसणारं प्रवेशद्वार, तटबंदी किंवा दरवाजे ह्यांची एकामागोमाग उभारणी, किल्ल्यावर शे-पाचशे लोकांना वर्षभर पुरेल इतका पाण्याचा साठा (तलाव-विहीर किंवा पाण्याची टाकी), धान्याचा साठा करण्याची सोय, भक्कम-भव्य असे बुरुज, किल्ल्यावर देवतेचं मंदिर, मुख्य म्हणजे चोरवाटांचं अस्तित्व, दूर अंतरापर्यंत मारा करणा-या तोफा... इत्यादी. राज्यात स्वराज्यासाठी धडपड ही मुख्यतः सह्याद्री प्रांतात झाल्यानं अडीचशेपेक्षा जास्त किल्ले त्या भागात आढळतात.

नवख्या ट्रेकरला ट्रेकींगची सुरुवात कोरीगड किल्ल्याच्या भ्रमंतीनं करायला हरकत नाही. सहकुटुंब एक दिवसाची सहल म्हणूनसुद्धा कोरीगड हे उत्तम ठिकाण ठरू शकते.

तो लोणावळ्यापासून सुमारे बावीस किलोमीटरवर आहे. लोणवळा एस.टी.स्टँडला जात भांबुर्डे किंवा आंबवणे गावात जाणारी एस.टी. पकडायची. सहाराच्या प्रसिद्ध अॅम्बी-वॅली च्या पुढे किल्ला आहे.

‘सहारा’च्या कृपेनं इतकी वर्षं दगडानं भरलेला तो रस्ता अगदी गुळगुळीत झाला आहे. आजुबाजूला एवढी दाट झाडं की ऊन जमिनीला स्पर्श करणार नाही! मनसोक्त फोटो काढायचे आणि ठोकून द्यायचं की फोटो स्वित्झर्लडमधील आहेत! कोरीगडपर्यंतचा रस्ता एवढा चांगला आहे की अनेक जाहिरातपटांचे शुटिंग तिथंच झालं आहे.