सुळका

इगतपुरीचा नवरा-नवरीचा डोंगर

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कुशेगावजवळ नवरा-नवरीचा डोंगर प्रसिद्ध आहे. गिर्यारोहणासाठी लोकांना आवडेल असे ते ठिकाण आहे. ‘डोंगराच्या कुशीत वसलेले’ म्हणून त्या गावाचे नाव कुशेगाव. नाशिकहून वाडीवऱ्हे फाटा येथून वळले, की पश्चिमेकडे वीस किलोमीटर अंतरावर कुशेगाव लागते. गाडी कुशेगावला पार्क करून डोंगराच्या दिशेने पायी जावे लागते. डोंगर दुरून विलोभनीय दिसतो. कुशेगावाच्या उत्तरेला पूर्व-पश्चिम पसरलेली डोंगररांग आहे. त्या डोंगररांगेच्या पूर्व टोकावर दोन सुळके आहेत. ते सुळके म्हणजे जणू नवरा-नवरी जोडीने उभे आहेत असे वाटते. म्‍हणून त्या सुळक्यांना क्रमश:

माहुली गडावरील स्वच्छता मोहीम

‘उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या माणसांबद्दल झाडांना कितीही अनुकंपा वाटली तरी ती स्वत:ची जागा सोडून, सावलीचा वर्षाव करत माणसांच्या मागे जाऊ शकत नाहीत. झाडांच्या औदार्याला, ममत्वाला एकाच जागी स्थिरावण्याचा शाप असतो.’ तसेच काहीसे सह्याद्रीतील गडकोटांचे आहे, डोंगरांचे आहे, घाटमाथ्यांचे आहे, शिखरांचे आहे. तरी त्यांच्यात आणि झाडांत एक साम्य दिसून येतेच… ते दोन्ही स्वत:ची जागा न सोडतासुद्धा दुसऱ्यांना स्वत:ची ओढ लावून आपल्याजवळ करतात. मी डिसेंबरअखेरीला एक छायाचित्र फेसबूकवर पाहिले: ‘किल्ले माहुली’ची पुन्हा कचराकुंडी झाली आहे! अन् क्रमश: