भ्रष्टाचार निर्मुलन, सेक्युल्यॅरिझम आणि गांधीजी


हरिहर कुंभोजकरमहात्मा गांधी यांच्यासारख्या युगपुरुषाविषयी सर्वसामान्य माणसाला वाटणाऱ्या आदराचे आणि प्रेमाचे रूपांतर श्रद्धा आणि भक्ती यांत होणे हे नैसर्गिक आहे. पण अशी श्रद्धा-भक्ती बऱ्याचदा चिकित्सक विश्लेषणाला मारक ठरते. कार्य माणसाच्या हातून योग्य प्रकारे पार पडले तर त्याचे श्रेय त्याच्या श्रद्धेस दिले जाते. उलटपक्षी, ते त्याच्या हातून अयशस्वी झाले तर आपली श्रद्धाच कमी पडली अशी समजूत करून घेऊन दोष स्वत:कडे घेतला जातो. ज्या तत्त्वांवर विश्वास ठेवून कार्य केले गेले त्या तत्त्वांचे कठोर परीक्षण होत नाही. पण गांधीजी संत, महात्मा नव्हते. ते सक्रिय राजकारणी, प्रयोगशील विचारवंत आणि तत्त्वचिंतक होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि तात्त्विक विचारांचे तटस्थपणे व कालसापेक्ष मूल्यमापन होणे आवश्यक ठरते. अर्थात गांधीजी आपल्याला भावनिकदृष्ट्या आणि काळाच्या दृष्टीने इतके जवळ आहेत, की पूर्ण तटस्थता कठीण आहे. तरीही मी एक-दोन मोजक्या गोष्टींची चिकित्सा शक्य तितक्या तटस्थतेने करू इच्छितो.

देशाची सामाजिक, राजकीय, आर्थिक अवस्था गांधीजींना अभिप्रेत असलेल्या रामराज्याच्या कल्पनेपासून शेकडो मैल दूर आहे. आम्ही अतिशय वेगाने ब्रिटिश येण्यापूर्वी भारतात जी स्थिती होती त्या स्थितीकडे वाटचाल करू लागलो आहोत.

सर्वव्यापी भ्रष्टाचार :

सर थॉमस रो हा जहांगीर बादशहाच्या दरबारात ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्याने कंपनीच्या लंडनमधील मुख्य कार्यालयाला कंपनीच्या हिंदुस्थानातील कामाचा अहवाल १६१८ मध्ये पाठवला होता. त्यात तो म्हणतो, ‘येथे कायद्याचे राज्य नाही, बादशहा म्हणेल तो कायदा. कोणतेही काम पैसे देऊन करून घेता येते. हिंदुस्थानातील सर्व बंदरे कंपनीच्याच ताब्यात आहेत असे समजावे.’

‘हिंदस्वराज्य’मध्ये गांधीजींनी लिहिलेला संवाद उद्धृत करतो: (भाषांतर माझे)

वाचक :  इंग्लंड भारत का जिंकू शकले? आणि जिंकलेल्या भारतावर अबाधितपणे राज्य का करू शकले?

हिंदस्वराज्य परिचर्चा


 ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि गांधी राष्ट्रीय स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ या पुस्तकावर 26-27 ऑक्टोबर 2013 रोजी पुण्यात गांधीभवन येथे परिचर्चा झाली. गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी हे आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत परंतु निधीचे विश्वस्त अन्वर राजन आणि डॉ. उर्मिला सप्तर्षी, दोघे जण दोन्ही दिवस उपस्थित होती.

परिचर्चेबाबत संयोजनाच्या सुरुवातीपासून उत्सुकता होती आणि विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, विचारवंत स्वत: होऊन परिचर्चेविषयी विचारणा करत होते. प्रत्यक्ष परिचर्चेत दोन दिवसांत तब्बल एकशेपस्तीस जण सहभागी झाले; तरी जवळजवळ पस्तीस लोक, ज्यांनी येऊ म्हणून कळवले होते ते काही ना काही कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत.

परिचर्चेच्या प्रारंभी ज्येष्ठ गांधीविचार अध्यासक आणि विचारवंत डॉ. सु.श्री. पांढरीपांडे यांनी बीज भाषण केले. स्वातंत्र्य आणि स्वराज्य यांमधील फरक स्पष्ट करून ते म्हणाले, की आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवले पण आर्थिक, आध्यात्मिक, नैतिक, सांस्कृतिक, भाषिक स्वातंत्र्याचे काय? स्वातंत्र्य हिंसेने मिळवणे शक्य आहे, पण स्वराज्य अहिंसेनेच मिळवावे आणि टिकवावे लागते. त्यासाठी स्वत: बरोबर इतरांच्या स्वातंत्र्याचाही विचार करावा लागतो; निसर्गाचा विचार करावा लागतो. गांधीजींनी निसर्गाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. विज्ञान-तंत्रज्ञान आणि मानवी जीवन यांतील संबंध तटस्थ असू शकत नाही. मग तंत्रज्ञान आणि समाजव्यवस्था यांतील संबंध स्वराज्याला अनुकूल आहे, की नाही याचा विचार करून त्याचा स्वीकार करायला पाहिजे. गांधीजींनी शरीरश्रमाला महत्त्व दिले. त्यांना ज्यातून शरीरश्रम वगळले जातील असे तंत्रज्ञान मान्य नव्हते. त्यांनी सत्य, अहिंसा, स्वराज्य आणि स्वदेशी या चतु:सुत्रीतून स्वराज्यशास्त्र मांडले. मानवी जीवनात संघर्ष पावलोपावली आहे पण समन्वय कसा साधणार हा खरा प्रश्न आहे आणि गांधी विचार आपल्याला समन्वयाकडे नेतो असे ते म्हणाले.

सत्याला सामोरे की शब्दचातुर्य?


अवधूत परळकरमी मला विशेष प्रभावित करून सोडणारे पुस्तक म्हणून हेन्री डेव्हिड थोरोच्या Walden नंतर 'हिंद-स्वराज्य'चे नाव घेईन. त्या पुस्तकाचे लेखक मोहनदास करमचंद गांधी यांना 'सत्य' ही गोष्ट प्राणाहून प्रिय होती. आपले काय? सत्याला सामोरे जाण्यात आपल्याला स्वारस्य आहे की नाही? येथे आपण सत्य बोलणार आहोत की नाही? इतरांशी नाही तर निदान स्वत:शी तरी? असा विचार मनात आला आणि मी मला जाणवलेले सत्य या परिचर्चेच्या निमित्त तुमच्यासमोर ठेवण्याचे ठरवले. एक कबुली द्यायला हवी, की गांधी पाठीशी नसते तर मला हे धाडस कदाचित झाले नसते.

तर मला जाणवलेले सत्य असे...

आपला समाज गांधी मानत नाही, गांधीविचारांना आणि आचारांना आपल्या समाजाच्या विश्वात आणि व्यवहारात काडीचेही स्थान नाही. उलटपक्षी, घराघरात गांधीद्वेष पसरलेला आहे. खास करून, सुशिक्षित उच्चभ्रूंच्या घरांत... त्या घरांतील लहान मुले त्याच संस्कारात वाढत आहेत.

लगेच, “काय सांगता, आमच्या सोसायटीत आम्ही सारे गांधी जयंतीला एकत्र जमतो; प्रार्थना म्हणतो की…” असे कृपा करून सांगू नका. तसे, महात्मा गांधी यांना प्रात:स्मरणीय नेते मानणारे अनेक माझ्या परिचयाचे आहेत. विद्येच्या या माहेरघरी येथील उच्चविद्याविभूषित गांधींविषयी बोलताना कोणती विशेषणे वापरतात तेही मला ठाऊक आहे. मी त्याच समाजाबद्दल बोलत आहे, जो येथे या सभागृहात जमलेल्या या लहान समुहापेक्षा मोठा आहे आणि निराळा आहे. त्या समुहात आज ‘मी नथूराम गोडसे…’ हे नाटक सर्वाधिक प्रिय आहे. मध्यमवर्गीय मराठी समाज म्हणून ज्याकडे निर्देश करता येईल असा हा समाज. अलिकडे त्या लोकांत दलितांची भर पडली आहे. प्रश्न असा, की आपण त्यांना गांधींच्या विचारांपर्यंत नेणार आहोत की नाही? की गांधीविचार ही आपल्या वर्तुळात चर्चा करण्याची गोष्ट म्हणून आपल्यापुरती मर्यादित ठेवणार आहोत? आणि बाहेरील वास्तवाकडे डोळेझाक करून आपला कार्यक्रम पुढे रेटणार आहोत?

गांधी विचारांचा जागर


शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी 'हिंद -स्वराज्य' या पुस्तकात मांडलेले विचार आजच्या समाज वास्तवाच्या आणि काळाच्या संदर्भात किती प्रस्तुत आहेत, याचा मागोवा घेण्यासाठी झालेल्या चर्चासत्रावरचा डोळस कटाक्ष...

परिचर्चेतील मुख्‍य वक्‍ते - (डावीकडून) सु. श्री. पांढरीपांडे, डॉ. अभय बंग, मोहन हिराबाई हिरालाल आणि विवेक सावंतमोहनदास करमचंद गांधी या तरूणानं १९०९ साली भारतीय समाजाच्या जीवनशैली संदर्भातले आपले तात्विक विचार पुस्तकरूपानं मांडले. 'हिंद-स्वराज्य' या पुस्तकात ज्या काळात त्यांनी हे विचार मांडले तो शंभर वर्षांपूर्वीचा काळ आणि २०१३ सालचा आजचा काळ, या दरम्यान देशात बरीच सामाजिक, नैतिक, राजकीय उलथापालथ झाली आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. या कालप्रवाहात पूलही वाहून गेला की काय अशी शंका वाटावी अशी स्थिती आहे.

महात्मा गांधींनी 'हिंद -स्वराज्य'मध्ये मांडलेले विचार आजच्या समाज वास्तवाच्या आणि काळाच्या संदर्भात किती प्रस्तुत किंवा अप्रस्तुत आहेत; किती उपयोगी किंवा निरूपयोगी आहेत यावर परिचर्चा घडवून आणण्याचा एक चांगला उपक्रम अलीकडेच पुण्यात पार पडला. 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' आणि 'गांधी स्मारक निधी' या संस्थांच्या वतीनं आयोजलेल्या दोन दिवसांच्या या चर्चासत्रात समाजातल्या विविध क्षेत्रातल्या अभ्यासकांनी, समाजसेवकांनी भाग घेतला. काही विद्यार्थीही या चर्चासत्राला उपस्थित होते.

सुतोवाच वादसंवादाचे


थिंक महाराष्‍ट्रगांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ पुस्‍तकानिमित्ताने २६-२७ ऑक्टोबरला पुण्यात चर्चा झाली. ती ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ने गांधी स्मारक निधीच्या (पुणे) सहकार्याने योजली. महाराष्ट्रभरातून सुमारे दीडशे प्रतिनिधी दोन दिवस येऊन गेले. परिचर्चेनंतर कृतीच्या अंगाने काही घडावे हा जसा विचार व्यक्त झाला; तसेच या निमित्ताने ‘वादसंवाद’ सुरू व्हावा असेही मत, विशेषतः मोहन हिरालाल यांनी व्यक्त केले. त्याचा आरंभ तोच करून देत आहे. त्या पाठोपाठ, अवधूत परळकर याने ‘महाराष्ट्र  टाइम्स मध्ये‘ परिचर्चेबाबत जो लेख लिहिला तो प्रसिद्ध करत आहोत. त्यानंतर या निमित्ताने जे साहित्य जमा झाले आहे ते एकेक प्रकट होत जाईल...

- संपादक