शहाजी गडहिरे - सामाजिक न्यायासाठी अस्तित्व


शहाजी गडहिरे आणि त्यांच्या पाच-सहा सहका-यांनी 2001 मध्ये ‘अस्तित्व’ संस्‍थेची स्थापना केली. आरोग्याशी निगडित समस्यांवर काम करण्यासाठी आरोग्याबरोबर सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर प्रथम स्त्री-पुरुष समानता, महिला सबलीकरण, घरगुती हिंसाचार रोखणे यांना प्राधान्य दिले पाहिजे ही गडहिरे यांची भूमिका. त्याच जाणिवेतून त्यांच्या या संस्थेची सध्याची वाटचाल सुरू आहे. 'अस्तित्व' संस्था सोलापूर जिल्ह्यात सेंद्रीय शेती, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यांबाबतही जागरुकता निर्माण करण्याचे कामही करते.

'अस्तित्व' संस्था सुरू झाली तेव्हा आरोग्य हेच तिचे उद्दिष्ट होते. महिला, बालके यांच्या आरोग्यविषयक समस्या, त्यांच्यातील कुपोषण यावर संस्थेने काम सुरू केले. त्याला चांगले यश मिळाले. संस्था आता कुपोषणासह सरकारी आरोग्यसेवा सक्षम करण्यावर भर देत आहे. त्यासाठी जनसुनवाई घेण्यात येते. संस्थेचे प्रतिनिधी तालुक्यातील निवडक प्राथमिक आरोग्यकेंद्रे व उपकेंद्रे येथे उपस्थित राहून सरकारी कामकाजावर देखरेख ठेवतात. रुग्णांना सरकारी दवाखान्यांत जाण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे दवाखान्याच्या बाह्य रुग्ण विभागातील नोंदणी वाढली आहे; तसेच, दवाखान्यातील सेवकवर्गाची उपस्थिती, कामकाजाचा दर्जा, गुणवत्ता यांतही सुधारणा झाली आहे. डॉक्टरांनी बाहेरून औषधे आणण्यासाठी चिट्ठी देण्याचे प्रमाण कमी झाले असून औषधे शक्यतो दवाखान्यातून उपलब्ध करून दिली जात आहेत.

श्रमदानातून ढगेवाडीचा कायापालट

अज्ञात 10/08/2015

संगमनेर-भंडारदरा रस्त्यावर अकोल्याच्या जवळ डोंगरांच्या रांगेमध्ये ‘ढगेवाडी’ हा पाडा वसलेला आहे. ढगेवाडीला जायचे असेल तर तीन डोंगर ओलांडून, चढ चढून वर गावात जावे लागे. तीस वर्षांपूर्वी त्या पाड्यावर पन्नास-साठ कच्च्या झोपड्या होत्या. पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरून पाच किलोमीटर अंतर चालून जावे लागत होते. पावसाळ्यात तेथे थोडीफार शेती होई. पण नंतर गावातील लोक मजुरीसाठी दूर जात असत. ते रस्तादुरुस्ती, बांधकाम, ऊसतोडणी अशा कामांच्या शोधात वणवण फिरत. त्यांच्या मागे पाड्यावर म्हातारी-कोतारी आणि लहान मुले राहत.

ढगेवाडीतला एक तरुण, भास्कर पारधी हा त्या परिस्थितीतून गावाला बाहेर कसे काढावे या विचारात असायचा. भास्करने शालेय शिक्षण अकोला (ता. संगमनेर) येथील ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या वसतिगृहात राहून घेतले. त्यालनंतर तो पुण्यातील मोहन घैसास यांच्या ‘सुयश चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेत काम करू लागला. त्याला त्यातून नवी दृष्टी मिळाली. भास्कसरची विचारचक्रे गावाच्या विकासाच्या दृष्टीने फिरू लागली. तो ढगेवाडी पाड्यावर परत आला. त्यांरच्यारसोबत ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे कार्यकर्ते व ‘सुयश ट्रस्ट’चे मोहन घैसास व स्मिता घैसास हेदेखील होते. त्यांनी मिळून ढगेवाडीची पाहणी केली. विकासाच्या दृष्टीने काही योजना आखल्या. मग त्यांनी ग्रामस्थांना एकत्र करून, त्यांना त्या योजना समजावून दिल्या. जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. गावक-यांना त्यांच्या  उत्साहाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गावातील तरुणांच्या मदतीने गावाभोवतालच्या डोंगरउतारावर ठिकठिकाणी चर खणून पावसाचे पाणी जिरवण्याची व्यवस्था केली. गावात पाझर तलाव होता. त्या तलावाच्या खाली बांध बांधला. अशा तऱ्हेने पावसाचे पाणी अडवण्याची व्यवस्था झाली. ते सर्व ढगेवाडीतील गावकऱ्यांच्या श्रमदानातून घडले.

सिताफळांचा बादशहा - नवनाथ कसपटे


नवनाथ कसपटे यांचे कर्तृत्व असे, की त्यांचे नाव घेतल्याबरोबर लोकांना सिताफळाची आठवण यावी! ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे रहिवासी आहेत. नवनाथ कसपटे यांचा जन्म 1 जून 1955 रोजी बार्शी तालुक्यातील गोरमाळे या गावी झाला. वडिलांचे नाव मल्हारी आणि आईचे नाव पार्वती. कसपटे यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले. त्यांना दोन मुले आहेत. एका मुलाचे शिक्षण बारावी  पर्यंत झाले  आहे तर दुसऱ्या मुलाने डी. फार्मसी केले आहे.

नाना भोसेकर आणि सांगोल्याची बोर-डाळींबे!

अज्ञात 09/07/2015

मी केशव वासुदेव तथा नाना भोसेकर सांगोल्याचा कायम रहिवासी असून, शास्त्र शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पुरे केल्यानंतर, स्टेट बँक ऑफ इंडिया, सांगोला शाखेत एप्रिल 1967मध्ये क्लेरिकल केडरमध्ये रुजू झालो. स्टेट बँकेने 1972-73 पासून शेतकऱ्यांना त्यांच्या विविध गरजांसाठी कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात केली होती, त्यावेळेस कर्ज वितरण विभागात काम करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. त्यानिमित्ताने तालुक्यातील व आजुबाजूच्या जत, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस इत्यादी तालुक्यांत कर्जवाटपासाठी फिरत असताना प्रदेशाचा, निसर्गाचा, शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा व पीक पद्धतीचा डोळे व मन उघडे ठेऊन अभ्यासही करत होतो.

नोकरी स्वीकारताना व ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर एक जाणीव मनामध्ये कायम ठेवली होती, ती म्हणजे मिळालेली खुर्ची ही केवळ माझ्या स्वत:च्या प्रपंचासाठी मिळाली नसून, तिचा वापर प्राधान्याने जनतेसाठी व त्यायोगे संस्थेसाठी/बँकेसाठी होणे आवश्यक आहे. अशा मानसिकतेमुळे शेतकरी वर्गाचा, त्यांच्यातीलच एक बनून, त्यांच्या अपयशांचा अभ्यास करून लक्षात आले, की मराठी शेतकरी कष्टांत कमी नाही, मात्र त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

आमचा सांगोला हा दुष्काळी तालुका, येथील पावसाळा अत्यंत लहरी, उन्हाळा मात्र आमच्या पाचवीला पुजलेला. शेजारी तीर्थक्षेत्र पंढरपूर. निसर्गाशी झगडत हतबल झालेल्या शेतकऱ्यांची मानसिकता 'ठेविले अनंते तैसेची राहवे, चित्ती असू द्यावे समाधान' अशी बनलेली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांपुढे प्रगतीची, सुबत्तेची स्वप्ने कधी आलीच नाहीत. कसे तरी का होईना, अर्धवेळचे का होईना उदरभरण होणे इतपत पिकले तरी बास ही त्यांची मानसिकता. त्यातही त्यांच्या स्वत:च्या पोटाबरोबर दारातील भाकड गायीगुरांच्या चाऱ्यासाठी भुसार पिकांची ओढ फार, त्यामुळे पाऊस झाला, की शेजाऱ्यांनी त्यांच्या ओटीत काय घेतले ते पाहायचे, तेच आपल्या मुठीत घ्यायचे व चिमटीने भूमातेची ओटी भरायची. एवढे झाले, की आभाळाकडे डोळे लावून त्या भगवंतावर भार टाकून प्रतिक्षा करायची. एवढेच त्याच्या हाती राहायचे.

भागवत नखाते - हाडाचे शेतकरी


सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील अकोला हे गाव पेरूंसाठी  प्रसिद्ध  आहे. तेथील वैशिष्ट्यपूर्ण पेरूच्या शोधात भेटले ते भागवत नखाते. फाटक्या अंगाची धुवट कपड्यातील व्यक्ती. त्यांनी आव आणला, ते अडाणी गावंढळ माणूस आहेत असा. म्हणाले, ‘मला काही फारसं समजत नाही'. पण त्यांच्या तोंडून सगळ्या सोलापूर जिल्ह्याचा इतिहास-भूगोल उलगडला जाऊ लागला. त्यांना त्या परिसराची माहिती तर आहेच, पण त्याहून अधिक त्यांना त्या परिसराची प्रगती व्हावी याची तळमळ आहे. त्यांची आस्था त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.

त्यांनी सगळ्या अकोला गावात फिरून पेरू बागायतदारांची भेट घडवून दिली. पेरू, बोरे व डाळिंबे या फळांमुळे, दुष्काळात होरपळणाऱ्या त्या गावाला जीवदान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

भागवतांनी तीस वर्षांपूर्वी अकोले गावात राहुरी कृषी विद्यापीठातून गणेश जातीच्या डाळिंबाचे कलम आणून डाळिंबाची प्रथम लागवड केली. गणेश डाळिंबाची साल पातळ असल्याने फळ लवकर सुकते व बाजारात फार काळ टिकत नाही हे लक्षात आल्यावर, त्यांनी भगवा डाळिंबाची जात अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथून आणली. त्याची साल जाड असल्याने तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. आता, अकोला हे सगळे गाव भगवे झाल्याचे व डाळिंब पिकाचा गावाच्या आर्थिक उलाढालीत मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांची स्वत:ची नर्सरी होती, परंतु सरकारी खात्यातील भ्रष्टाचारामुळे व दुष्काळामुळे ती बंद करावी लागल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची स्वत:ची डाळिंबांची एक हजार झाडे असून अॅपल, बोर  व पेरू ही पिकेही ते घेतात. नीरा कालव्याचे उदघाटन १९७८ मध्ये होऊनदेखील अद्याप तो अपूर्णावस्थेत असल्याने व झालेल्या कालव्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने पिकांना पाणी मिळत नसल्याची व टँकरने पाणी आणून पिके जगवावी लागत असल्याची खंत त्यानी व्यक्त केली.

नैसर्गिक व राजकीय परिस्थितीमुळे तो परिसर दुष्काळात होरपळतो, पण तरीही तेथील शेतकरी निराश होत नाहीत, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रगती करून घेतात असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले.

रिधोरे येथील शेतकरी ज्ञानमंदिर


सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील रिधोरे गावात आधुनिक आगळे-वेगळे मंदिर आहे. ते 'शेतकरी ज्ञानमंदिर' या नावाने ओळखले जाते! आधुनिक मानवी शक्तीची देवता म्हणून शेतकरी मंदिर. अतिशय वेगळी कल्पना! 'सिनामाई कृषिविज्ञान मंडळा'तर्फे ते बांधण्यात आले आहे. मंदिराचा मुख्य हेतू शेतक-यांचे शेतीविषयक प्रश्न  सोडवणे हा आहे. सर्व शेतक-यांनी एकत्र येऊन त्यांच्या समस्या सांगून त्यावर उपाय शोधणे या उद्देशाने मंदिर बांधण्यात आले आहे. म्हणून त्या मंदिरात पुजापाठ करणे किंवा देवतांचे इतर विधी या गोष्टींना स्थान नाही. मंदिरात फक्त शेतीविषयक तत्वज्ञान व माहिती दिली जाते.

देशात सर्व बाबतीत आधुनिकीकरण आले, नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले. शेतक-यांमध्ये आधुनिक पद्धतीने शेती करण्याची इच्छा बळावू लागली, पण सर्वच शेतक-यांना तशी माहिती उपलब्ध नसते. शेती महाविद्यालये विद्यापीठे दूर असतात. म्हणून सयाजीराव गायकवाड यांनी ‘शेतकरी ज्ञानमंदिर’ हा पहिला प्रकल्प 2 ऑक्टोबर 2004 रोजी स्थापन केला. त्यामुळे शेतक-यांना घर, शेतीजवळ आधुनिक शेतीविषयक माहिती मिळवून शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे.     

कासेगावची मांडवावरील डाळींब शेती


‘कासेगावी डाळींब’ म्हणून कासेगाव या गावाची डाळिंबे प्रसिद्ध आहेत. द्राक्षे, डाळींबे यांचे उत्पादन सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर परिसरातील शेतकरी घेतात. द्राक्षाचे पीक नाजूक आहे. हवामानातील छोट्या मोठ्या बदलाने द्राक्षांच्या पिकावर परिणाम होतो व काही वेळा तर संपूर्ण पीकच हातचे जाण्याचा धोका असतो. त्या तुलनेत डाळींब पीक कणखर आहे.

डाळिंबाचे रोप वाढू लागले, की पहिली दोन-तीन वर्षे रोपाची मुळे नाजूक असल्यामुळे वाढणाऱ्या खोडाला फाटे फुटतात आणि रोप जमिनीकडे वाकते. त्याचा फळधारणेवर परिणाम होऊ शकतो. त्या समस्येवर उपाय म्हणून पंढरपूर तालुक्यातील कासेगावचे प्रगतीशील शेतकरी नितीन लक्ष्मण शेळके यांनी जून 2013 मध्ये नवीन प्रयोग केला. त्यांनी द्राक्षांच्या बागांना जसे मांडव वापरले जातात तसे त्यांनी डाळिंबाच्या बागेसाठी वापरण्याचे ठरवले.

त्यांनी त्यांच्या एक एकर पाच गुंठे बागेत, कृषी खात्याने बीपासून तयार केलेली रोपे लावली आणि त्या रोपांना मांडवांच्या वरच्या तारांतून फांद्यांचा आधार दिला. त्या आधारांमुळे रोपांना फाटे फुटले तरी रोपे ‘जमीनदोस्त’ होत नाहीत. तसा आधार पहिली तीन वर्षे दिला गेला, की रोपाची उंची मांडवाच्या वरच्या तारांच्या वर जाते आणि मग केवळ तेवढा आधार रोपाला पुरतो.

नितीन शेळके यांची बाग सांभाळणारा त्यांचा सहाय्यक राजू सदाशिव चव्हाण याने या बागेविषयी तपशीलवार माहिती दिली. पाणीपुरवठा ठिबक सिंचनाद्वारे केला जातो. योग्य खतांची व कीटकनाशकांची मात्रा दिली जाते. ‘तेल्या’ रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये व झालाच तर तो लवकर आटोक्यात यावा म्हणून औषधयोजना केली जाते.

डाळिंबाच्या शेतीत मांडवांचा उपयोग करू लागल्यापासून उत्पन्नात वाढ होत आहे असा शेळके यांचा अनुभव आहे. त्या भागात बहुतेक सर्व शेतकरी मांडवांवरच डाळिंबाचे पीक घेऊ लागले आहेत.

संपर्क -

नितीन लक्ष्मण शेळके – 9923863770
राजू सदाशिव चव्हाण  - 8308501077

- प्रसाद घाणेकर

Last Updated On - 30th Nov 2016

अकोला - पेरूंचे गाव


सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील अकोला हे गाव प्रसिद्ध आहे ते पेरूंसाठी. वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या पेरूने गावाला ओळख व वैभव मिळवून दिले आहे.

पेरूची ती जात ‘लखनौ ४९’ या नावाने ओळखली जाते. त्या पेरूमध्ये बियांचे प्रमाण अल्प असते. बाजारात फळ दोन दिवस उत्तम स्थितीत टिकाव धरते. फळाचे सरासरी वजन चारशे ग्रॅम भरते. फळ गोडीला अधिक असून त्यात साखरेचे प्रमाण जास्त आढळते. त्याच्या झाडाला साधारण आठ दिवसांतून एकदा पाणी द्यावे लागते किंवा ठिबक सिंचन पद्धतीचाही वापर करता येतो. त्यामुळे पाण्याची कमतरता असूनही पेरूबागायत करता येते. ‘लखनौ ४९’ जातीच्या पेरूच्या लागवडीपासून साधारणपणे पाच वर्षे झाल्यावर हेक्टरी एक लाख रुपये उत्पन्न मिळते. झाड लागवडीनंतर अडीच-तीन वर्षांनी फळे देऊ लागते. झाडाचे सरासरी आयुष्य वीस वर्षे असते. पीक घेण्यासाठी पाण्याव्यतिरीक्त हेक्टरी पंचवीस हजार रुपये खर्च येतो.

ती जात मोहोळ तालुक्यातून सरकारी नर्सरीतून पंधरा वर्षापूर्वी आणण्यात आली. तेथील वातावरण व जमीन यामुळे पेरूची वैशिष्ट्यपूर्णता टिकून राहिली. औषधांचा वापर क्वचित व अत्यल्प प्रमाणात केला जातो. सेंद्रीय खतांच्या वापरावर भर दिला जातो. पण एकूणच खते व औषधे नाममात्र उपयोगात आणली जातात. खतांचे प्रमाण जास्त झाल्यास फळ नासून वाया जाते. वातावरणामुळे फळात कीड निर्माण होते. क्वचित ‘तेल्या’ रोग येतो. वर्षातून दोन वेळा अंतरमशागत करावी लागते.

गावामध्ये सध्या भारत हिरालाल शिंदे या शेतकऱ्याने या जातीच्या पेरूची लागवड केलेली आहे. त्यांची पावणेतीनशे झाडे असून त्यांपैकी एकशेदहा झाडे सध्या फळे देत आहेत. वर्षात एका झाडाला साधारणपणे नऊशे ते एक हजार फळे लागतात .

त्याच गावातील शेतकरी ‘भागवत शामराव नखाते’ यांनी सांगोला हा अत्यंत दुष्काळी तालुका असूनही डाळींब, पेरू व अॅपल बोर या पिकांनी तालुक्यातील शेतकऱ्याला तारले असल्याचे सांगितले. ते स्वत: हाडाचे शेतकरी असून उत्तम कबड्डी प्रशिक्षक आहेत. तसेच, त्यांना भोवतीच्या भौगोलिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची उत्तम जाण आहे.

- अनुराधा काळे

बबन पवार यांची पुराणकथेत शोभेल अशी यशोगाथा


प्रतिकूल परिस्थिती व शिक्षण अजिबात नसताना आत्मविश्वास, परिश्रम व चिकाटी या गुणांच्या आधारे माणूस काय करू शकतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बबन गोपाळ पवार. ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या कापसेवाडी या खेडेगावातील.

बबन पवार यांच्या आईचे नाव नानीबाई व वडिलांचे नाव गोपाळ. त्या दांपत्याला आठ अपत्ये. बबनरावांचे वडील दुष्काळ पडल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कामासाठी गेले होते. बबन यांच्या वडिलांचे निधन 1969 साली झाले. बबन यांचे बहीणभाऊ कासेगावला तर बबन गावाकडेच राहत.

दुष्काळी परिस्थितीत उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून, बबन यांनी गावातील लोकांच्या संगतीने मुंबई गाठली, पण शिक्षणाअभावी, बबन यांचा निभाव मुंबईत लागला नाही. म्हणून त्यांनी परत गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. सर्व भावंडे लहान असल्यामुळे त्यांची जबाबदारी आई व बबन यांच्यावर होती. बबन यांनी गावच्या सरपंचाकडे सालाना (वर्षाकाठी) दीडशे रुपये या हिशोबाने 1971 साली कामास सुरुवात केली. तसे काम करत असताना, त्यांनी त्यांच्या बहिणींची लग्ने थोड्या थोड्या महिने-वर्षांच्या अंतराने लावून दिली.

बबन यांच्या घरचा संसाराचा गाडा दिवसाला दीड रुपये या रोजगारावर चालत होता. बबन यांचे लग्न 1982 साली झाले. त्यांची पत्नीही मजुरी करू लागली. तसेच, भाऊ दत्तात्रय व विठ्ठल हेसुद्धा मजुरी करत होतेच. बबनरावांनी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी बहिणीकडे (मुलांच्या आत्याकडे) पोखरापूर येथे व पत्नीच्या बहिणीकडे (मुलांच्या मावशीकडे) तुळजापूर येथे पाठवले.

गोफण

अज्ञात 20/04/2015

शेतातील पिकांना पक्षी किंवा प्राणी यांचा उपद्रव होऊ नये यासाठी गोफण या यंत्राचा वापर पूर्वापार काळापासून केला जात आहे. गोफणीचा शेतातील उपयोग मानव शेती करू लागला तेव्हापपासून केला जात असावा. मात्र पूर्वी गोफण प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरली जात असे.

गोफण हे हाताने फेकण्याच्या अस्त्रांमध्ये सर्वात प्राचीन अस्त्र आहे. ते अश्मयुगापासून चालत आले असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. अश्मययुगात वापरल्या‍ जाणाऱ्या गोफणीचे दगड दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणि कच्छमधील धोलाविरा येथे पाहण्यास मिळतात.

गोफणीचे स्वरूप दोन दोरींच्या मध्यभागी अडकवलेला कातड्याचा पट्टा असे असते. ती गोफासारखी विणलेली असते. शिकार करण्यासाठी किंवा पक्ष्यांना हुसकावण्यासाठी जो दगड वापरायचा असतो, तो गोफणीच्या कातडी पट्ट्यामध्ये ठेवला जातो. त्यानंतर दोरीच्या एका टोकाला असलेल्या फासामध्ये हाताचे मधले बोट अडकावले जाते आणि दोरीचे दुसरे टोक हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट यामधील बेचक्यात घट्ट धरून ठेवले जाते. त्यानंतर गोफण हातात धरून वेगाने स्वतःच्या डोक्याभोवती चक्राकार आणि जमिनीस समांतर अशी फिरवली जाते. गोफणीमधील कातडी पट्टा व त्यातील दगड चक्राकार गतीने गरगरा फिरू लागतात. पुरेसा वेग आल्यानंतर योग्य क्षणी अंगठा व तर्जनी यांमध्ये पकडलेले दोरीचे टोक सोडून दिले, की मधल्या कातडी पट्ट्यात ठेवलेला दगड वेगाने नेम धरलेल्या जागेवर जाऊन पडतो. गोफणीतील दगड कुठे जाऊन पडावा वा कुठे लागावा यासाठी कौशल्याची आणि सरावाची गरज असते. हाताने दगड दूर फेकता येईल त्यापेक्षा कितीतरी जास्त गतीने व दूर अंतरापर्यंत गोफणीने दगड फेकता येतो.

गोफणीचे दोन प्रकार असतात. एक चामड्याच्या पट्ट्याला दोन दोऱ्या बांधलेली गोफण आणि दुसरी काठीच्या डेलक्याला बांधलेली गोफण. अनेक आदिवासी जमाती गोफणीचा वापर करतात.

गोफण प्राचीन काळापासून वापरली जात असल्याचा आणखी एक पुरावा आहे. गोफणीचा उल्लेख महाभारतातही आढळतो. महाभारतात चक्राश्म व भृशुण्ड्यू असे दोन शब्द आले आहेत.