अन्नातील ग्लुकोज, रोगनियंत्रण आणि रसिका

अज्ञात 10/06/2017

_Rasika_Vartak_Karandikar_1.jpgअन्नातून निर्माण झालेले ग्लुकोज माणसाला ऊर्जा देते ही एक गुंतागुंतीची आणि सूक्ष्म शारीरिक प्रक्रिया असते. तिच्या यंत्रणेचा अभ्यास करून त्यापासून रोगनियंत्रण शक्ती शरीरात निर्माण करण्याचे संशोधन जागतिक पातळीवर सुरू आहे. त्या संशोधनात सहभागी आहे, लग्नानंतर ठाण्याची सून झालेली डॉ. रसिका वर्तक-करंदीकर. रसिका सध्या जगातील प्रतिष्ठित असलेल्या स्टॅनफर्ड विद्यापीठ (कॅलिफोर्निया) येथे त्या विषयावरील संशोधन करत आहे. त्‍या सॅन होजे येथे त्‍यांच्‍या पतीसह वास्‍तव्‍यास आहेत.

रसिकाने मुंबई विद्यापीठातून सूक्ष्म जीवशास्त्र विषयात पदवी ग्रहण करून पुणे विद्यापीठातून आरोग्य विषयात उच्च शिक्षण घेतले. त्यावेळी तिला प्राध्यापक सुखात्मे शिष्यवृत्ती मिळाली. तिने अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील टेक्सास हेल्थ सेंटर, सॅन अॅन्तिनो येथे पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी २००८ साली प्रवेश घेतला. तेथे रसिकाला विशेष गुणवान विद्यार्थ्याला मिळणारी ‘डेव्हिड कॅरिलो’ शिष्यवृत्ती लाभली होती. तिला ‘बरोज वेलकम’ची विशेष शिष्यवृत्ती २०१२ आणि २०१३ या दोन्ही वर्षीं मिळाली.

मनुष्याने खाल्लेल्या अन्नापासून ग्लुकोज निर्माण होते. ते ग्लुकोज त्याच्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. त्याच्या अन्नात कर्बोदके, प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ यांचा समावेश असतो. त्या घटकांचे विघटन त्याच्या पेशींमधील विशिष्ट जैविक रसायनामुळे होते. ते विघटन होताना नवीन वाटा निर्माण होतात. त्या वाटा त्याच्या शरीरात असणाऱ्या लक्षावधी पेशींमधील मिटोचोंड्रिया या अतिसूक्ष्म ऑरगॅनेलेसमध्ये शिरकाव करतात. एकपेशीय जीवांमध्ये ते ऊर्जा निर्मिती केंद्र असते. परंतु तेथे ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया तांत्रिक आहे. त्याला एटीपी जनरेशन म्हणतात. मायटोकॉनड्रियामध्ये शिरकाव करून घेतलेले घटक त्याच्याबरोबर असलेल्या इलेक्ट्रॉन, पाच रेस्पिरेटरी कॉम्प्लेक्समधून जातात. त्यांची १, २’ ३’ ४’ ५’ अशी सरळ गणना केली जाते. त्या कॉम्प्लेक्समधील घटकांमध्ये जर दोष निर्माण झाला तर पेशींमधील ऊर्जा संपून पेशी नाश पावतात. त्याचा परिणाम साहजिक त्या त्या अवयवांवर होतो आणि रोगांना निमंत्रण मिळते.

सायबरवर्ल्डमध्ये ‘नाशिकचा’ ठसा

अज्ञात 06/06/2017

_bhagyashree_kenge_2.jpgअनुराग व भाग्यश्री केंगे यांनी नाशिकची पहिली वेबसाईट www.nashik.com डिसेंबर १९९७ मध्ये उभी केली. इंटरनेट नव्याने येत होते, त्यामुळे ‘नाशिक इंटरनेटवर’ ही बातमी नाशिककरांसाठी नवीन व अचंबित करणारी वाटली. बहुसंख्यांना तिचा अर्थदेखील समजत नव्हता- परदेशात असलेले नाशिककर मात्र त्यांचे शहर इंटरनेटवर पाहून ’नॉस्टॅल्जिक’ व आनंदित झाले. ‘नाशिक डॉट कॉम’वर अनेक विभागांचा समावेश केला गेला होता. जुने तर हवेच, पण नवीनही सामावून घ्यावे असे ठरवून त्यावरील ‘नॅव्हिगेशन’, ‘लिंक्स’ ठरवल्या गेल्या. नाशिक हे केंगे पती-पत्नींचे गाव. ती दोघे म्हणतात – आमच्याच गावाचा शोध घेऊ लागल्यावर गोदावरीचा काठ, काळाराम, सुंदरनारायण, नारोशंकर मंदिर यांचा इतिहास आणि सौंदर्य नव्याने जाणवले. नाशिकच्या अनेक गल्ल्या, जुने वाडे, खाण्याची ठिकाणे, शहराच्या वेशी अशा गोष्टी वेबसाईटवर देण्यात आल्या. वि.दा. सावरकर, अनंत कान्हेरे यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देण्यात आली. दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा आढावा घेण्यात आला.

आनंद बनसोडे - सोलापूरचा जिद्दी एव्हरेस्ट वीर


हिमालयातील एव्हरेस्टसह जगातील चार सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणारा आनंद बनसोडे हा सोलापूरचा तरुण महाराष्ट्रातील तमाम युवकांना प्रेरणावत ठरला आहे! त्याची शिखर सर करण्याची जिद्द आणि त्याने त्यासाठी केलेला संघर्ष जाणून घेताना आनंद बनसोडेबद्दल कौतुकच मनी दाटते.

आनंदने गिर्यारोहण प्रयत्नपूर्वक शिकून घेतले व पाच-सात वर्षांच्या अल्पावधीत जगातील चार उंच शिखरे पादाक्रांत केली; एवढेच नव्हे, तर त्या प्रत्येक मोहिमेला सामाजिक विषयाची डूब दिली व त्यामुळे त्याच्या एकूण मोहिमेला संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळाली. युनायटेड नेशन्स सोबत काम करणारा चित्रपट अभिनेता फरहान खान याने आनंदच्‍या मे 2015 मधील अमेरिका मोहिमेचा फ्लॅगऑफ केला होता. खरे तर, राष्ट्रसंघाच्या संबंधित समितीपुढे आनंदचे जुलैअखेर भाषण व्हायचे होते, परंतु त्याच्या पिताजींचे, अशोक बनसोडे यांचे २५ जूनला आकस्मिक निधन झाले. योगायोग असा, की आनंद त्यावेळी उत्तर अमेरिकेतील अलास्का राज्यातील शिखर सर करण्याच्या प्रयत्नात होता, तो त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच मोहीम अर्धवट सोडून सोलापूरला परत आला.

आनंदच्या मोहिमेचे नाव आहे ‘जागतिक शांततेसाठी सप्तशिखर मोहीम’. त्याने आतापर्यंत सर केलेली एव्हरेस्टशिवायची शिखरे अशी – युरोपमधील शिखर माऊंट एल्ब्रुस (17 जुलै 2014), आफ्रिकेतील किलोमांजरो (15 ऑगस्ट 2014) आणि ऑस्ट्रेलिया खंडांतील माऊंट कोस्झीस्को (3 नाव्हेंबर 2014). या प्रत्येक ठिकाणी, त्याने भारताचा झेंडा फडकावला व सामाजिक आशयाची कोणती ना कोणती घोषणा कोरून ठेवली.

आनंदने एव्हरेस्टवर 19 मे 2012 रोजी तिरंगी झेंडा फडकावला.

Beyond Bollywood...


Beyond Bollywoodएक बातमी अमेरिकन वृत्तपत्रांमधून काल-परवाच डोकावलेली पाहिली. 'डोकावली' म्हणण्याचं कारण असं, की ती रुढार्थानं ‘झळकली’ नव्हती. पुरवणीच्या कोपऱ्यातच होती - पण माझ्यासारख्या भारतीय मनांना तिचं कौतुक झळकल्यासारखं जाणवलं. बातमी होती वॉंशिंग्टन येथील जगप्रसिद्ध स्मिथसोनियन म्युझियमतर्फे सादर होऊ घातलेल्या एका आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाबद्दलची. प्रदर्शन उभं राहाणार आहे डिसेंबर २०१३ मध्ये. आणि त्याचं नाव आहे  "Beyond Bollywood : Indian Americans Shape the Nation".

भारतामधून अमेरिकेत स्थलांतर केल्यानंतर तिथे नव्याने रुजतानाचा भारतीयांचा प्रवास, विशेषत: विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील स्थलांतरित लोकांचे अनुभव आणि गेल्या शतकामध्ये त्या आव्हानांची बदलत गेलेली रूपं, आपला पाय अमेरिकेत रोवताना त्यांच्या भारतीय पावलांचे अमेरिकन संस्कृतीवर, राजकारणावर, समाजावर, कला-जीवनावर, शिक्षणपद्धतीवर,उद्योग-व्यवसायावर, विज्ञानावर, आध्यात्मिक विचारावर कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणतेपणी उमटलेले ठसे - या सगळ्याचा आढावा त्या प्रदर्शनात घेतला जाणार आहे.

प्रदर्शनाची कल्पना शीर्षकापासूनच विचार करायला लावणारी आहे! "Beyond Bollywood…Indian Americans Shape the Nation."

इवलेसे रोप लावियले दारी...


- विनता कुलकर्णी, इलिनॉय, अमेरिका

BMM Logoपु. ल. देशपांडे मराठी माणसाबद्दल एक गोष्ट सांगत. एक लहान बेट होतं आणि तिथे दोन मराठी माणसं राहायची आणि त्यांची तीन मराठी मंडळे होती. प्रत्येकाचे एक आणि दोघांचे मिळून एक. या मराठी मनोवृत्तीला छेद देत १९८१ साली शिकागो मध्ये कै. शरद गोडबोले, कै. विष्णु वैद्य आणि सौ. जया हुपरीकर यांच्या पुढाकाराने उत्तर अमेरिकेतील विविध शहरांमध्ये अस्तित्वात असणाऱ्या सर्व मराठी मंडळांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. आजमितीस विविध राज्यांमध्ये एकूण ४२ मराठी मंडळे सभासद आहेत.
 

(अमेरिकेतील आद्य महाराष्ट्र मंडळाच्या आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संस्थापकांच्या कार्याचा परिचय)

- विनता कुलकर्णी, इलिनॉय, अमेरिका

सामाजिक संस्थेचा इतिहास म्हणजे तीमधील कार्यकर्त्यांची प्रयत्नशीलता, तत्कालीन परिस्थिती, संस्कृती यांच्या जडणघडणीच्या पाऊलखुणा आणि पुढे जाणार्‍यांसाठी मशाल असते. शिकागो महाराष्ट्र मंडळ हे बेचाळीस वर्षांची परंपरा असलेले अमेरिकेतील आद्य मराठी मंडळ. उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांसाठी संघटित मंच असावा ह्या उद्देशाने निर्मिलेल्या बृहन्महाराष्ट्र (बृ.म.) मंडळाच्या संस्थापनेत शिकागोचे कार्यकर्ते कै. विष्णू वैद्य, कै. शरद गोडबोले आणि सौ. जया हुपरीकर ह्यांचा पुढाकार आहे. तसेच ह्या संस्थापक त्रयींच्या सामाजिक कार्यात इतर स्वयंसेवकांबरोबर त्यांना मोलाचे सहकार्य मिळाले स्वत:च्या घरातून - अर्थात्‌ प्रभा वैद्य, अनिता गोडबोले आणि शंकर हुपरीकर ह्यांच्या सहभागातून.