मुख्यपानाचे बॅकग्राऊंड


मुख्य पानाची बॅकग्राउंड इमेज बदलण्यासाठी ह्या पानाची रचना आहे. हे पान डिलीट करू नये.
ह्या पानाचे बॅकग्राउंड जे काही असेल ते साइटच्या मुख्यपानाचे बॅक बनेल. अशाच प्रकारची रचना इतर पानांच्या बाबतीतही वापरता येणे शक्य आहे!
ह्यामुळे CSS सारखी बदलावी व FTP करावे लागत नाही.

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ - महाराष्ट्राचे समग्र चित्र

अज्ञात 23/05/2015

ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामतील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.

वेबसाइट हे कोणतीही माहिती तत्क्षणी जगभर पोचवण्याचे साधन आहे. वर्तमानपत्र, रेडिओ, टि.व्ही. चॅनेल्सच या माध्यमांच्या तुलनत वेबसाईटची माहिती साठवण्याची क्षमता मोठी आहे. त्यास ऑडिओ, व्हिडीओ अशा इतर माध्यमांची जोड देऊन माहिती अधिक परिणामकारतेने सादर करता येते. तसेच त्यात कोणताही मजकूर शोधून मिळवता येतो. तो कधीही सुधारता येतो. म्हणून 'व्हिजन महाराष्ट्रा'ने उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी इंटरनेट हे माध्यम निवडले.

वाढत्या ‘ग्लोबल’ वातावरणात ‘लोकल’ स्वरूप झपाट्याने नष्ट होत असल्याची भावना जगभर, प्रांतोप्रांती व देशोदेशी आहे. आपणास ‘थिंक महाराष्ट्र’मार्फत महाराष्ट्रीय समाजापुरता त्या भावनेचा आदर करून आपल्या प्रदेशाचे व संस्कृतीचे संचित जपण्याचे उपक्रम हाती घेता येऊ शकतील आणि तसे काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचे कार्य समाजासमोर सातत्याने मांडता येईल. ही अभूतपूर्व कल्पना आपल्या काळात निर्माण झाली व विकास पावली याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल! कारण 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' हे मॉडेल ठरू शकेल व त्या धर्तीवर 'थिंक कर्नाटक', 'थिंक पंजाब', 'थिंक बंगाल', एवढेच काय 'थिंक स्वीडन', 'थिंक कोरिया' यांसारखे प्रयत्न त्या त्या समाजात आकार घेऊ लागतील.

‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. कारण या प्रकल्पात महाराष्ट्रातील चांगुलपणा आणि प्रज्ञाप्रतिभा यांच्यामध्ये दुवा साधायचा आहे. त्या दृष्टीने वेबपोर्टलवर तीन प्रकारे माहितीचे संकलन केले जाते.

सार्वत्रिक, सतत मुक्‍त ज्ञान प्रक्रिया


मोहन हिराबाई हिरालालस्‍वराज्‍य माझा जन्‍मसिद्ध अधिकार आहे!

स्‍वराज्‍य प्रत्‍येकाचा जन्‍मसिद्ध अधिकार आहे!

माझे स्‍वराज्य 'मीच' व आमचे स्‍वराज्‍य 'आम्‍हीच' मिळवू शकतो!

त्‍यासाठी -

सार्वत्रिक सतत मुक्‍त ज्ञान प्रक्रिया
 

निसर्गाचा अविभाज्‍य घटक म्‍हणून माणसाकडे नैसर्गिकरित्‍या दोन जबाबदा-या आल्‍या आहेत.

  • १. ज्ञान निर्मिती
  • २. व्‍यवस्‍थापन (ज्ञानासह सर्व गोष्‍टींचे)

१. ज्ञान-निर्णय-कृती-ज्ञान अशी चक्रीय प्रक्रिया. आज निर्णय व कृतीवर अवाजवी जोर. ज्ञान प्रक्रियेसाठी योग्‍य जागा, रचना व वेळ नाही.

२. 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' - मराठी भाषिकांसाठी अशी ज्ञान प्रक्रियेसाठी योग्‍य जागा बनू शकते काय? त्‍यासाठी रचना व कार्यपद्धती कशी असावी? जुन्‍या अनुभवापासून शिकून करायचे नवे प्रयोग कोणते?

३. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग काय व कसा करता येईल?

४. व्हिडीओ कॉन्‍फरन्सिंगद्वारे अभ्‍यासगटाच्‍या मराठी भाषेत होणा-या नियमबद्ध चर्चांचे नियोजन करून त्‍यांचे रेकॉर्डींग करणे. ते साठवून ठेवून त्‍याचे सर्वांना विनामुल्‍य उपलब्‍ध होईल असे व्‍यवस्‍थापन करणे. उदाहरणार्थ, विकिपेडीयाप्रमाणे.

५. या कामात ज्‍यांना रस आहे व ज्‍यांना हे काम करणे स्‍वतःची गरज आहे असे वाटते, अशा व्‍यक्‍तींचा शोध घेऊन त्‍यांचा कृतीगट तयार करणे.

(मला या प्रक्रियेत रस आहे व हे काम करणे माझी स्‍वतःची गरज आहे असे वाटते.)

मोहन हिराबाई हिरालाल
mohanhh@gmail.com

सुतोवाच वादसंवादाचे


थिंक महाराष्‍ट्रगांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ पुस्‍तकानिमित्ताने २६-२७ ऑक्टोबरला पुण्यात चर्चा झाली. ती ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ने गांधी स्मारक निधीच्या (पुणे) सहकार्याने योजली. महाराष्ट्रभरातून सुमारे दीडशे प्रतिनिधी दोन दिवस येऊन गेले. परिचर्चेनंतर कृतीच्या अंगाने काही घडावे हा जसा विचार व्यक्त झाला; तसेच या निमित्ताने ‘वादसंवाद’ सुरू व्हावा असेही मत, विशेषतः मोहन हिरालाल यांनी व्यक्त केले. त्याचा आरंभ तोच करून देत आहे. त्या पाठोपाठ, अवधूत परळकर याने ‘महाराष्ट्र  टाइम्स मध्ये‘ परिचर्चेबाबत जो लेख लिहिला तो प्रसिद्ध करत आहोत. त्यानंतर या निमित्ताने जे साहित्य जमा झाले आहे ते एकेक प्रकट होत जाईल...

- संपादक

थिंक महाराष्‍ट्रः प्रगतीची पावले


- दिनकर गांगल

‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पामध्ये साधनसंपत्ती व मनुष्यबळ या दोन्हींची कमी आहे. परंतु अशा स्वेच्छाप्रयत्नांमध्ये हे स्वाभाविकच आहे. मात्र लोकांना ही कल्पना भावते खूप, मग प्रतिसाद उबदार व धो-धो का येत नाही? कारणे दोन आहेत: एक तर ज्या पिढीला फुरसत आहे व जी पिढी सुखस्वस्थ आहे तिला संगणक, महाजाल या गोष्टी दूरच्या वाटतात, आपल्या जमान्याच्या वाटत नाहीत. उलट, जी पिढी या माध्यमाजवळ आहे ती जीवनसंघर्षात, करिअरच्या प्रगतीत गुंतली आहे. तिला ‘फेसबूक’,ट्विटर्’ ही दैनंदिन गप्पाष्टकांची सदरे फार प्रिय असतात. थोडे वेगळे आणि अधिक ओळखीचे उदाहरण म्हणजे मोबाईल फोन. हे अत्यंत उपयुक्त साधन, परंतु त्यावरील सत्तर ते ऐंशी टक्के संभाषण ही निव्वळ बडबड असते. पण विचार असा करू या, की एरवी घरात तरी असाच वायफळपणा चालू असतो ना? (असायचा ना?) घराघरातली माणसे कमी झाली म्हणून ती गरज मोबाईल फोनमधून जनात भागवली जाते. टेलिव्हिजनवरच्या ‘सोप’ दैनंदिन मालिकांची महती तीच सांगतात. राहण्याची घरे, जागा आणि माणसे या दोन्ही गोष्टींनी लहान झाल्यावर मोठ्या कुटुंबाची गरज सासू-सून-दीर-भावजया अशा, मालिकांतील नाट्यातून, एकत्रितपणातून भागवली जाते. असो.
 

‘थिंक महाराष्ट्र’ची संकल्पना Think Maharashtra Link Maharashtra अशी माणसांना जोडण्याची असल्याने ती लोकांना पसंत पडते. आतापर्यंत आपण परभणी, नांदेड, अंबाजोगाई, लातूर, धुळे, अमरावती, येथे बैठका घेऊन, तेथे मोठ्या पडद्यावर ‘थिंक महाराष्ट्र’चे पोर्टल दाखवून अनेक माणसांना या जाळ्यात आणले आहे.