सार्वजनिक गणेशोत्सवाची मोहीम अमेरिकेमध्ये!


गणेशाच्या मूर्तीत अशी काहीतरी जादू आहे, की ती जाती, भाषा, प्रांत आणि आता कदाचित राष्ट्र व धर्म यांचेदेखील भेद विसरायला लावते! गणेश चित्राकृतीचा आकार, उकार आणि ओम् कार यांचे आवाहन असे आहे, की जे साती समुद्र पार करील! लोकमान्यांनी त्यांच्या लोकविलक्षण प्रज्ञेने गणपतीच्या मूर्तीमधील सौंदर्य जाणले! आणि काळाची गरज ओळखून ते राष्ट्रप्रेमाच्या कामी लावले. नंतर थिल्लर संस्कृतीचा काळ आला तेव्हा त्या आकर्षणामुळेच इतर कोणी देवता नाही, पण गणपती दूध प्यायला – अगदी लंडनपासून महाराष्ट्रातील खेडोपाड्यांपर्यंत!

रामाचे अजानबाहू रूप आणि गजाननाची लंबोदर मूर्ती ही भारतीय संस्कृतीमधील सर्वश्रेष्ठ व कालातीत कलात्मक सौंदर्यलक्षणे मानली जातात. गजाननाचा आकार हे तर माणसाला पडलेले स्वप्नच होय! ते कसेही रेखाटा, कोरा! त्यामधून सुंदरता व्यक्त होते. त्यावर धार्मिक पावित्र्याचा संस्कार केला गेल्यामुळे त्याचे शिल्प वा रेखाटन वा चित्रकृती अजरामर व चिरस्मरणीय बनून गेले आहेत.

जग ग्लोबल झाले तेव्हापासूनमहाराष्ट्राचे हे आद्यदैवत देशोदेशी पोचू लागले आहे. लंडनला सुरुवात झाली. आता पन्नास-शंभर देशांत गणपती उत्सव जाऊन पोचला आहे. यंदा एकट्या पेणमधून तीन लाख गणपती निर्यात झाल्याची बातमी होती. गेल्या पंधरा-वीस वर्षांत जेव्हा मराठी शंभर-दीडशे कुटुंबे चीनमध्ये राहू लागली तेव्हा चार वर्षांपूर्वी तेथेही सार्वजनिक गणपती बसू लागला आहे.

गणपतीच्या सार्वजनिक आवाहनाचे आगळे दर्शन गेल्या आठ-दहा वर्षांत अमेरिकेत दिसून येत आहे. त्यामधून भारतीय संस्कृतिचिन्हांचे व त्यांना जोडलेल्या धार्मिक पावित्र्याचे आकर्षण किती दूरगामी आणि सखोल असू शकते ते लक्षात येते.

फिलाडेल्फियातील गणेशोत्सव - 'या सम हा'


लहानपणापासून आपण जे जे चांगले अनुभवले ते ते आपल्या मुलांना अनुभवायला मिळावे, ही आंतरिक इच्छा कमीअधिक प्रमाणात सर्व पालकांमध्ये दिसून येते. शिवाय, पुन:प्रत्ययाचा आनंद कोणास नको असतो? म्हणून वेळ मिळताच, आपण आपले व मुला-नातवंडांचे फोटोआल्बम काढून बघतो आणि गतकाळातील आठवणींत रमून जातो. गणपतीचे आणि शिवाजी महाराजांचे केवळ नाव घेताच उत्साहाचे भरते येणारी मराठी माणसे, निव्वळ व्हिडिओ किंवा फोटोंमध्ये गुंतून न राहता, त्यांची भावसृष्टी नाटके व उत्सव यांच्या माध्यमातून सातत्याने पुनश्च उभी करतात.

अमेरिकेतदेखील हे वेड कमी नाही. तीनशे वर्षांपूर्वी युरोपातून आलेल्या स्थलांतरित मंडळींनी येथे जागोजागी छोटी इटाली, छोटे आयर्लंड, नवे इंग्लंड स्थापन करून, येथील गावांना युरोपातील गावांची नावे देऊन गतकाळाशी धागा जोडला आहे. केवळ इतके करून थांबतील तर ते पक्के अमेरिकन कसले? अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील व अंतर्गत युद्धातील निवडक लढायांच्या जागी जंगलात जाऊन त्या लुटूपुटूच्या स्वरूपात का होईना, पुन्हा लढण्याचा व  अनुभवण्याचा छंदही हौशी मंडळी गेली कित्येक दशके जोपासत आहेत. अशा हौशी लोकांच्या सहवासात राहून, जात्याच उत्साही असलेल्या मराठी माणसांचे गुण द्विगुणित होणे हे ओघाने आलेच!

परदेशातील भारतीयांना एकत्र जोडणारा गणेशोत्सव

अज्ञात 09/09/2013

रॅले येथे साजरा करण्‍यात येणारा गणेशोत्‍सवगणेश हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. विघ्नविनाशक, सिद्धिविनायक म्हणून त्याला मराठी मनात एक विशेष स्थान आहे. अमेरिकेत ‘एशियन एक्सक्लूजन अॅक्ट’ नावाचा कायदा १९२४ पर्यंत होता. त्यानुसार एशियन लोकांस अमेरिकेत वसण्याची मनाई होती.  त्यानंतर ते चित्र बदलले व १९५० च्या दशकाच्या अखेरीस तुरळक भारतीय अमेरिकेत स्थायिक होऊ लागले. त्यावेळी बहुतेकजण एक पेटी नि आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले. त्यात मराठी, संख्येने अत्यंत थोडे पण त्यांनी निदान गणपतीचे चित्र बरोबर आणलेले असे. मग ते टेपने भिंतीवर चिटकवायचे नि मनोमन त्याची प्रार्थना करायची. काही वर्षे गेली. शिक्षण-नोकरी यांत स्थैर्य आले. घरात मुलांचे आगमन झाले नि आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल माहिती द्यायला हवी, सभोवताली संस्कारशील अनुकूल वातावरण नाही; तेव्हा आपणच मुलांना ते शिकवायला हवे याची जाणीव प्रबळ होऊ लागली. मराठी माणसांची संख्या हळुहळू वाढत होती. गावोगावी असतील तेवढी मराठी मंडळी कुणाच्या तरी घरी एकत्र जमत. त्या काळात तेथे मिळत असलेले सामान घेऊन जमेल तेवढे भारतात गणपतीच्या दिवसांत बनवतात तसे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत. सर्वजण एकत्र टाळ्यांच्या गजरात ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ आरती म्हणत. कुणीतरी पेटी हाती घेई, कुणी गाणी म्हणत नि शनिवार-रविवारचा दिवस पाहून केलेला गणेशोत्सव असा साजरा होई. आपल्या मुलांना निदान गणपती म्हणजे काय ते दाखवल्याचे समाधान होई. आपली मुले गणेशास अमेरिकनांसारखे ‘एलिफंट गॉड’ न म्हणता गणपती म्हणताहेत, गणपतीच्या रूपामागील प्रतीकात्मकता त्यांना कळू लागली आहे एवढे समाधान पालकांना असे.

बालमोहन शाळेच्या निमित्ताने - बदल काय होतोय?

Suhas Tapasvi 03/02/2013

सुहास गो. तपस्वीमाझ्या ‘बालमोहन’मधील शिक्षणाला १९४९च्या जूनमध्ये पाचव्या इयत्तेत सुरुवात झाली. ते आठवायचं कारण म्हणजे, बापूंचं आत्मचरित्र ‘आठवणीतील पाऊले’ अशातच वाचलं; बापू म्हणजे, बापुसाहेब रेगे, दादा रेगे यांचे मोठे चिरंजीव. ते आत्मचरित्र वाचताना १९५०च्या दशकातल्या शाळेतील आठवणी जागृत झाल्या. साठ-पासष्ठ वर्षांपूर्वीचा, एसएससीपर्यंतचा सात वर्षांचा कालखंड चलतचित्रपटासारखा माझ्या डोळ्यांपुढून गेला.

पी.डी. पाटेकर नावाचे वडलांचे आतेभाऊ होते. ते गिरगावच्या राममोहन शाळेत शिकवायचे; त्यांचा शिक्षणक्षेत्रात दबदबा होता. ते आमच्या घराच्या जवळच, शिवाजीपार्कला राहायचे. मी चवथीपर्यंत म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिकलो. नंतर शाळा बदलून खाजगी शाळेत जायचं म्हणून वडलांनी मला नवीन शाळेच्या निवडीकरता पंडितकाकांकडे नेलं. दादर म्हणजे त्यावेळी दोनच शाळांची नावं नजरेसमोर येत; स्टेशनजवळची छबिलदास किंवा लांब चालण्याची तयारी असेल तर हिंदू कॉलनीतील ‘किंग जार्ज’. पण पंडितकाकांनी ‘बालमोहन’चं नाव सुचवलं; चर्चेला वावच ठेवला नाही, थोडाफार आग्रह धरला. झालं, ठरलं, ‘बालमोहन’ पक्कं झालं!

त्या काळची पहिली आठवण म्हणजे, चवथीतून पाचवीत आल्यावर खाजगी शाळेतील शिक्षणाला सुरुवात झाल्यावरची. मात्र खाजगी शाळेत आल्यामुळे फार फरक झाल्याचं जाणवलं नाही; तशीच मुलं, तसेच शिक्षक व शाळेचं वातावरणही साधारण तसं. सांगण्याचा उद्देश म्हणजे, मला अपेक्षित दृष्टिकोनातून विशेष बदल जाणवला नाही; ‘बालमोहन’ काही खास निराळी वाटली नाही. बहुतेक, त्यावेळी खाजगी व म्युनिसिपालिटीच्या शाळांत विशेष फरक नसावा; असंही असू शकेल, की मी जात होतो ती मोडक इंजिनीयर्सच्या बंगल्यातील म्युनिसिपालिटीची शाळा तशा इतर शाळांपेक्षा जास्त चांगली होती. मोडक शाळेतल्या पटांगणातील पारावर बसून जसा अधुनमधून मी डबा खायचो, त्याच मोकळ्या वातावरणात पिंपळाच्या पारावर बसून मी ‘बालमोहन’मध्येही डबा खायला लागलो.

मकर संक्रांत २२ डिसेंबरला हवी


सूर्याचे उत्‍तरायणसूर्याने एका राशीतून दुस-या राशीत जाण्यास संक्रमण असे म्हणतात. अशा प्रकारे वर्षभरात मेष, वृषभ, मिथुन इत्यादी बारा संक्रमणे क्रमाक्रमाने होत असतात. यांतील सर्वात प्राचीन काळापासून ओळखली गेलेली संक्रमणे म्हणजे कर्क आणि मकर; असे का? त्याचे कारण ते दिवस वर्षातले वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहेत. कर्क संक्रमणाच्या दिवशी आपल्याकडे (उत्तर गोलार्धात) सर्वात मोठा दिवस आणि लहान रात्र असते; तर मकर संक्रमणाच्या दिवशी सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र असते. त्याबरोबरच, सूर्याचे उत्तरेकडे मार्गक्रमण मकर संक्रमणापासून सुरू होते. कारण त्या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे झुकू लागतो. यालाच उत्तरायणारंभ म्हणतात. त्या दिवसापासून दिवसाची लांबी वाढू लागते.

मकर संक्रांत १४ जानेवारीला साजरी केली जाते. मकरसंक्रांत १४/१५ जानेवारीला तर टिळक पंचांगानुसार १० जानेवारीला येते. मागच्या शतकात ती १३ जानेवारीस साजरी होत होती तर यापुढे काही वर्षांनी, ती १५ जानेवारीस येत जाईल. हे दिवस काही उत्तरायणारंभाचे नाहीत; त्याचप्रमाणे तो सर्वात लहान दिवस व मोठी रात्र असा वैशिष्ट्यपूर्ण दिवसदेखील नाही. मग संक्रांत या दिवशी का साजरी करायची?

संबळ - अवनध्द वाद्य


क-हाड येथील खंडोबाच्या यात्रेत मुख्य‍ मंदीरानजीक संबळ वाजवणारे गोंधळी संबळ हे एक अवनध्द वाद्य आहे. कालिकापुराणात, शिवाने पार्वतीच्या आनंदासाठी हे वाद्य निर्माण केले अशी समजूत आहे. संबळ हे वाद्य कुलधर्म, कुलाचार, परंपरा म्हणून उपयोगात येते. गोंधळी गाताना तुणतुण्याबरोबर सोयीचे वाद्य म्हणून ते वापरतात. गोंधळ हा लोकगीताचा प्रकार संबळेच्या तालावर आकार घेतो.

संबळ हे तबल्याप्रमाणे दोन वाद्यांची जोडी असलेले चर्मवाद्य आहे. ती दोन्ही वाद्ये एकत्र जोडलेली असतात. दोन्ही भाग लाकूड कोरून पोकळ केलेले असतात. डाव्या हाताने वाजवण्याचा भाग तांब्यानेही बनवला जातो. या वाद्याचा एक भाग लहान व एक भाग मोठा असतो. त्यातल्या एकाला नरसंबळ आणि दुस-याला मादीसंबळ असे म्हणतात. नरसंबळ डग्ग्याचे बोल पुरवते. त्‍यावर डग्ग्यासारखी शाई असते. तर मादीसंबळ तबल्याचे बोल पुरवते. संबळेचा आकार पंचपात्राप्रमाणे असतो. लहान वाद्याच्या तोंडाचा घेर मोठ्या वाद्याच्या घेरापेक्षा निम्मा असतो. यांची तोंडे कातड्याने मढवून सुताच्या दोरीने आवळलेली असतात. वाद्याच्‍या तोंडावरील कातड्यास ताण देण्‍याकरता संबळेच्‍या भोवती तबल्‍याप्रमाणे चामड्याची किंवा दोरीची वादी असते.

संबळावर वाजवण्यासाठी खास आराटी झाडाच्या मुळीचा आकडा तयार केलेला असतो. त्यामुळे संबळाचा आवाज घुमून श्रोत्यांच्या शरीरात कंप पावत शिरतो. त्‍या वाद्यातील खर्ज स्वर निघणा-या भागाला बंब किंवा धम असे म्हणतात. तर दुस-याला झील असे नाव आहे. संबळ दोरी अथवा शेल्‍याने कमरेस बांधले जाते. गोंधळी ते वाद्य उभे राहून वाजवतात.
 

संबळ तखडाच्या किंवा वेताच्या बारीक छडीने वाजवतात. छड्यांचा पुढील भाग छत्रीच्या दांड्याप्रमाणे वळवलेला असतो. छड्यांची लांबी एक ते सव्वा फूट असते. छड्या हातातून निसटू नयेत, म्हणून त्यांच्या दुस-या बाजूंना कापड गुंडाळलेले असते.
 

कोकणातील नमन – खेळे

Suresh Chavan 25/12/2012

नमन-खेळे हा लोककला प्रकार ‘यक्षगान’ या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवतो  नमन-खेळे हा उत्तर कोकणातील लोककला प्रकार आहे. त्याकडे धार्मिक विधी म्हणून पाहिले जाते. खेळे लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा प्रसंगी केले जातात. खेळे पेशवाई काळापासून होत असावेत. खेळ्यांच्या काही गीतांतून राघोबादादांच्या नावाचा उल्लेख आढळतो. १७२८ साली शामजी नाईक काळे व शिवराम नाईक गोडबोले या दोन कीर्तनकारांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला, त्याचे दोन भाग होऊन एक ‘दशावतार’ म्हणून दक्षिण रत्‍नागिरी जिल्‍ह्यात (सिंधुदूर्ग) प्रसिद्धी पावला व ‘नमन-खेळे’ उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात होऊ लागले. तो समाज अशिक्षित व आर्थिक दृष्ट्या मागासलेला. त्यामुळे नमन-खेळे यांना सामाजिक प्रतिष्ठा लाभली नाही, म्हणून तो लोककला प्रकार दुर्लक्षित राहिला आहे.

 तो कलाप्रकार नृत्य, नाट्य व संगीत यांनी परिपूर्ण असा आहे. त्‍याचे ‘यक्षगान’ या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य आहे. दोन्हींकडे पायघोळ झगे वापरले जातात. रामायण-महाभारताचे गायन कोरसच्या साह्याने केले जाते व पात्रे त्‍यावर अभिनय करतात. अंगसोंगे व लाकडी सोंगे याबाबतीत खेळ्याचे साम्य लळिताशीही आढळते.

खेळांचा राजा - मल्लखांब


मल्लखांबावर खेळांडूनी सांघिकरित्या उभारलेला मानवी मनोराही गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची! दुस-या बाजीराव पेशव्यांच्या काळातली. मराठी राज्य पानिपतच्या दारुण पराभवातून सावरू पाहात होते, भारतभर पसरत चाललेल्या इंग्रजांच्या साम्राज्याला तोंड देण्याचा निकराचा प्रयत्न करत होते. राजकीय व सामाजिक अस्थिरता, अंतर्गत कलह, फाटाफुटीचे राजकारण यांमध्ये मराठी दरबारापुढे एक आव्हान येऊन ठेपले, ते हैदराबादच्या निजामाकडून! विविध राज्यांमधून विजय मिळवत आलेल्या अली व गुलाब या, दोन कसलेल्या, भीमकाय व बलदंड पैलवानांनी दुस-या बाजीराव पेशव्यांच्या भरदरबारात कुस्तीचे आव्हान दिले. पैलवानांचा आत्मविश्वास, त्यांची रग व तयारी बघून दरबारात पेशव्यांच्या पदरी असलेल्या बावन्न पैलवानांपैकी एकाचीही आव्हान स्वीकारण्याची हिंमत झाली नाही. पेशव्यांची इभ्रत पणाला लागल्याचे पाहून, पेशव्यांकडे भिक्षुकी करणा-या सतरा-अठरा वर्षांच्या बाळंभटदादा देवधर यांनी ते आव्हान स्वीकारले व तयारीसाठी काही मुदत मागून घेतली. त्यांनी त्यांच्या नाशिकजवळच्या कोठुरे गावी जाऊन मातेचे आशीर्वाद घेतले आणि नाशिक जिल्ह्यात असलेल्या, वणीच्या डोंगरावर वसलेल्या सप्तशृंगी देवीची आराधना सुरू केली. असे म्हणतात, की त्यांच्या कठोर अनुष्ठानाने देवी प्रसन्न झाली आणि तिने बाळंभटदादांना आशीर्वाद दिला, की प्रत्यक्ष मारुतीराय त्यांना कुस्तीचे डाव शिकवतील! त्याप्रमाणे बजरंगबलीने दृष्टांत देऊन एका लाकडी लाटेवर (खांबावर) कुस्तीचे डाव दाखवले. बाळंभटदादा ठरलेल्या मुदतीत पुण्याला परतले आणि स्वत:पेक्षा वयाने, अनुभवाने, वजनाने मातब्बर असलेल्या अलीला गळखोड्याच्या डावांनी चीतपट केले. गुलाब बाळंभटदादांची तयारी पाहून अक्षरश: पळून गेला. दादांनी ज्या लाकडी खांबावर कसून सराव केला, त्या खांबाला त्यांनी ‘मल्लखांब’ असे नाव दिले. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत ज्याच्यावर सराव करायचा तो मल्लखांब. अशा त-हेने कुस्तीला पूरक व्यायामप्रकार म्हणून मल्लखांबाची सुरुवात झाली.

हळदीचे पेव - जमिनीखालचे कोठार!


हळदीच्या पेवात गोणींमध्येत भरलेली हळदीची खांडे रिते केले जातात.हळद ही कीडनाशक म्हणून ओळखली जाते, परंतु खुद्द हळदीचे पीक अत्यंत नाजूक आहे. हळकुंड उघड्यावर ठेवल्‍यास त्‍यास किडीची लागण पहिला पाऊस पडताच होण्‍याची शक्‍यता बरीच असते. हळदीला ओलसरपणा लागला तर ती आतून काळपट-लाल पडते. अशा हळदीला लोखंडी हळद असे म्‍हणतात. त्या हळदीचा दर्जा कमी असतो. त्‍यामुळे पावसाळ्यात हळद साठवण्‍यासाठी जमिनीमध्‍ये कोठार खणण्‍यात येते. त्या कोठारास ‘पेव’ असे म्‍हटले जाते. शेतकर्‍यांचा अनुभव आणि निरीक्षण यांमधून पेवांचे तंत्र शतकापूर्वी विकसित झाले. पेव ही हळकुंड स्‍वरूपातील हळद साठवण्‍याची शेतक-यांची पारंपरिक पद्धत आहे.

हळद साठवण्यासाठी पेवे खोदली जातात. सांगलीतील हरिपूर, सांगलवाडी या परिसरात १९६५ सालापर्यंत सुमारे आठशे पेवे खोदण्यात आली होती. अन्य राज्यांतून हळदीची मोठी आवक १९६५ साली झाल्याने, त्यावेळी आणखी बाराशे नवीन पेवांची निर्मिती करण्यात आली होती. त्या दोन हजार पेवांत दोन लाख पोती हळदीची साठवणूक होई. त्यानंतर पेवांची संख्या व हळद साठवणुकीची क्षमता वाढत गेली. २००४ सालापर्यंत हरिपूरात चाळीस हजार पेवे होती. त्‍यात चाळीस लाख पोती हळद मावत असे.

दिंडी सुरेश वाघे 05/10/2012

'दिण्डु' या कानडी शब्दापासून 'दिंडी' हा शब्द आला असावाअधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पालखीच्या बरोबर चालणारा वा राहणारा वारक-यांचा समूह म्हणजे दिंडी, असा 'दिंडी' शब्दाचा अर्थ 'मराठी विश्वकोशा' त दिला आहे; तर लहान दरवाजा किंवा पताका असेही त्याचे दोन अर्थ सांगितले जातात.

'दिण्डु' या कानडी शब्दापासून 'दिंडी' हा शब्द आला असावा. वारकरी आपल्याला स्वर्गाची दारे उघडावीत म्हणून भजन करतात, यावरून त्यांच्या वाटचालीला 'दिंडी' नाव मिळाले असे म्हणतात. वै. सोनोपंत दांडेकर ह्यांच्या मतानुसार भजनी मंडळातील एकजण 'दिंडी' नावाचे वीणेसारखे एक वाद्य वाजवत पुढे जातो व बाकीचे त्याच्या मागोमाग जातात, म्हणून त्या मंडळाला 'दिंडी' असे म्हणतात. तर काहींच्या मते, वारकरी खांद्यावर पताका घेऊन वाटचाल करतात, यावरून त्या वाटचालीस 'दिंडी' असे म्हटले जाते. ठरावीक वेळेला देवाच्या भेटीला जाणे ह्याला वारी म्हणतात. त्यावरूनच दिंडीतील लोकांना वारकरी म्हटले जाते. भगव्या पताका, टाळ , मृदंग आणि विठ्ठला च्या जयघोषात 'दिंडी'त राहून (छोट्याशा दरवाज्यात) भजन केले, की स्वर्गातील दिंडी दरवाजा उघडतो अशी वारक-यांची ठाम श्रध्दा आहे. 

महाराष्ट्रात ल्या खेड्यापाडयांतून असंख्य वारकरी ऊन, पाऊस, वारा, ह्या कशाचीही पर्वा न करता दिंडीत सामील होतात. वारक-यांचा हा मेळा नाचत नाचत जाऊ लागतो. मधेच, भारुडे रंगतात. फुगडया खेळल्या जातात. माणूस द्वैत विसरतो आणि अद्वैताचा खेळ सुरू होतो. दिंडी हा खेळ आहे. एकनाथां नी तर ह्याचे वर्णन केले आहे -