दासोपंतांची पासोडी


मराठी साहित्यशारदेचे महावस्त्र

 

पासोडी सध्या मात्र कुणीही हात लावला तरी तुकडे पडतील अशा जीर्णावस्थेत आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती  राजेंद्रप्रसाद यांनी दिलेल्या काचेच्या कपाटात अंबाजोगाई येथे पासोडी ठेवलेली असली तरी पुरातत्त्व विभागाने वेळीच लक्ष घालून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, इतिहासाचा तो दुवा वाचवण्याची गरज आहे.

दासोपंत हे पंधराव्या शतकातील संत! मध्ययुगातील नाथपंचक म्हणजे एकनाथ, जनीजनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंदन आणि संतसर्वज्ञ दासोपंत हे होय. त्या पंचकातीलच नव्हे तर एकूण संतकाव्यात सर्वाधिक व प्रचंड काव्यनिर्मिती करणारे संत म्हणजे दासोपंत. त्यांच्या साहित्याची संतकाव्यातील विशिष्टता त्यांतील वैविध्य, वैचित्र्य व विलक्षणता यामुळे सिद्ध होते. दासोपंतांनी अंबाजोगाईतील मंदिर परंपरेत धर्मसंप्रदायी उपासनेला कलात्मक अधिष्ठान दिले.

दासोपंतांची पासोडी अंबाजोगाईत आलेल्या अनेक सामान्य पर्यटकांना माहीत नसते. अभ्यासक मात्र ती पाहण्यासाठी शोध घेत येतात. त्यांचे समाधान पन्नास वर्षांपूर्वीच्या बंद कपाटातील एका दृष्टिक्षेपातील पासोडीच्या दर्शनाने होत नाही. त्यांची निराशा होते. आलेल्या प्रत्येकाला पासोडी पाहता यावी अशी सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी ती ज्या ठिकाणी आहे तेथेच ठेवून, तिची सुरक्षितता लक्षात घेऊन ती पूर्ण लांबीरुंदीत पर्यटकांना पाहता यावी अशी सुविधा करणे गरजेचे आहे. कापड सुस्थितीत राहण्यासाठी, त्यावरील अक्षरे टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विशिष्ट रसायने, प्रक्रिया यांचा वापर करून पासोडीचे आयुष्य ज्यायोगे वाढवता येईल, अशा प्रकारची उपाययोजना करणे अगत्याचे आहे. तेणेकरून मराठी साहित्यशारदेला दासोपंतांनी अर्पण केलेले ते महावस्त्र सर्वाना डोळे भरून पाहता येईल.

दासोपंतांचे चरित्र

दिवाळी अंक मराठी संस्कृतीचे लेणे

अज्ञात 27/11/2013

दिवाळी अंक हे मराठी संस्कृतीचे गेल्या शतकातील लेणे आहे. ते जपले गेले पाहिजे हे खरे; मात्र सध्या अस्थिर सामाजिक–सांस्कृतिक परिस्थितीत ते कसे घडणार हा खरा प्रश्न आहे असे निरीक्षण दिनकर गांगल यांनी मांडले.

गेल्या वीस-पंचवीस वर्षांत काळ फार झपाट्याने बदलत आहे, नवनवीन माध्यमे लोकांसमोर येत आहेत, त्यामधील एक, पण आधीपासून रुढ असलेले माध्यम म्हणून वाचनाकडे पाहिले पाहिजे. मात्र गेल्या शतकात, १९५० ते १९८० च्या दरम्यान, मुद्रित साहित्याचे माध्यम सर्वात जास्त प्रभावशाली असताना दिवाळी अंक हे मराठी साहित्यामधील सर्वात मोठे आकर्षण असे. ठराविक दिवाळी अंक अगदी थोडक्या संख्येने का होईना सर्वदूर महाराष्ट्राभर पोचत. पारोळ्यासारख्या खेड्यातदेखील ‘सत्यकथे’चा एकादा वाचक असे. तो भेटला, की अपार आनंद होई. ते नेटवर्किंगच होते. पण ती एकात्म मंडळी होती.

साहित्याचा खप वाढला, परंतु वाचन मात्र कमी झाले अशी विसंगती सध्या अनुभवास येते असे सांगून त्यांनी दिवाळी अंकांच्या बहराचे दिवस आळवले. कित्येक लेखक दिवाळीसाठी म्हणून लेखनाच्या भट्ट्या लावत आणि तो कारखाना गणपतीच्या महिन्यापासून सुरू होई. ‘निवडक अबकडई’ पुस्तकात चंद्रकांत खोतने या ‘खाज असलेल्या’ संपादकांचे वर्णन केले आहे. पण त्यामधून माधव मोहोळकरांसारखे ‘संकोची’ लेखक लिहिते झाले - पुढे आले.

पहिला दिवाळी अंक ‘मनोरंजन’चा १९०९ साली प्रसिध्द झाला. त्याचे संपादक का.र. मित्र. त्यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने पाश्चात्य देशांत जसे विशेषांक प्रसिध्द होतात त्या धर्तीवर स्वत:च्या मासिकाचा अंक प्रसिध्द केला. मग ती पध्दतच पडून गेली. ‘मासिक मनोरंजन’मध्ये श्रीपाद कृष्ण, रा.ग. गडकरी यांच्यापासून वि.सी. गुर्जरांसारख्या कथाकारांपर्यंत अनेक साहित्यकार लिहित. ती मोठी प्रभावळ होती.

तसा दुसरा टप्पा सत्यकथा-मौज-दीपावली अशा अंकांभोवती जमलेल्या लेखकवर्गाचा सांगता येतो. त्याच बेताला शिक्षणाचा प्रसार वाढू लागला व त्यामधून वाङ्मयदेखील विस्तारू लागले. माहेर-मालिनी यांसारखी मासिके त्यामधून प्रकटली.

न्‍यूजर्सीचा बुक-क्‍लब


अशोक विद्वांस‘बुक-क्लब’ हा प्रकार शिक्षित व विचारवंत (केवळ बुद्धिजीवी नव्हे) समाजात प्रचलित आहे. अशा लोकांचा तो छंद आहे असेही म्हणता येईल. पन्नाशी गाठली म्हणजे करमणुकीचे शारीरिक खेळ-प्रकार (टेनिससारखे) साधारणपणे कमी झेपतात. साठीच्या पुढे गेलेला माणूस निवृत्त होतो व त्याच्या हाती मोकळा वेळ भरपूर असतो. तशा परिस्थितीत कमी श्रमाच्या अशा बुद्धिजन्य करमणुकीची आवश्यकता वाढते. मग काही लोक ब्रिजचे डाव टाकायला बसतात तर काही लायब्ररी गाठतात आणि काही मंडळी ’बुक-क्लब’ कडे वळतात. ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की “माणसाला तीन प्रकारची भूक असते. पैकी पहिली पोटाची भूक व दुसरी लैंगिक भूक. त्यानंतर, जी तिसरी भूक माणसाला अस्वस्थ करते ती मानसिक/वैचारिक समाधानाची.”

आमचा ‘बुक-क्लब’ आम्हाला सदैव भरपूर वैचारिक समाधान देत असतो. जॉन लॉक या सतराव्या शतकातील ब्रिटिश तत्त्वज्ञाने म्हटले आहे, “शिक्षण सर्वसामान्य माणसाला सुसंस्कृत बनवते, तर त्याचा संपूर्ण विकास होण्यासाठी वैविध्यपूर्ण इतर वाचनाची गरज असते. अशा इतर वाचनापासून त्याला भरपूर माहिती प्राप्त होते, तर त्यावर गंभीरपणे विचार केल्याने त्या माहितीचे सखोल ज्ञानात परिवर्तन होते.”

आमच्या ‘बुक-क्लब’ची सुरुवात मात्र जरा वेगळ्या परिस्थितीत झाली. तो १९९५ चा काळ असावा. काही मंडळी तरुण असून ती पूर्ण वेळ नोकरी करत होती व त्यांना अन्य प्रकारच्या करमणुकीची संधीही भरपूर होती; असे असूनसुद्धा एका वेगळ्या बौद्धिक पातळीवर विचारांना चालना मिळावी या हेतूने ती मंडळी एकत्र आली व आमच्या ‘बुक-क्लब’ची सुरुवात झाली. अर्थात त्यात निवृत्त झालेली मंडळी होतीच. आदरणीय डॉ. श्रॉफ, स्व. डॉ. कमलताई श्रॉफ, स्व. लक्ष्मण (बंडू) फडके, सौ. मीना देवधर व सौ. शैला विद्वांस या मंडळींनी जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी आमच्या ‘बुक-क्लब’ची सुरुवात केली; व २०१३ सालीसुद्धा आमचा ‘बुक-क्लब’ नियमितपणे चालू आहे! सुरुवातीपासून त्यात भाग घेणाऱ्यांपैकी काही सदस्य वेगवेगळ्या कारणांस्तव क्लबमध्ये येऊ शकत नाहीत. पण त्यांनी सुरुवातीच्या काळी आमच्यात ही आवड निर्माण करण्याचे जे काम केले आहे त्याची आम्हा सर्वांना चांगली जाणीव आहे. 

मासिक मनोरंजन - दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे मासिक

अज्ञात 01/11/2013

तत्कालीन सामाजिक बदलांचे दर्शन घडवणारे मासिक मनोरंजन अंकाचे मुखपृष्ठ  ‘मनोरंजन’ मासिकाने दिवाळी अंकांची परंपरा सुरू केली. मराठी लघुकथेचा पायाही ‘मनोरंजन’नेच घातला. केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी यांना कवी म्हणून पुढे आणले, ते ‘मनोरंजन’नेच. ‘मनोरंजन’ मासिकाचा पहिला अंक १८८५ च्या जानेवारीत प्रसिद्ध झाला. १९३५ च्या फेब्रुवारीमध्ये आपला शेवटचा अंक एकाएकी प्रसिद्ध करून ‘मनोरंजन’ने आपल्या अंगीकृत कार्याची धुरा आपल्या पडत्या काळात जन्मास आलेल्या ‘रत्नाकर’, ‘यशवन्त’ यांसारख्या नव्या जोमाच्या मासिकांवर टाकून हजारो मराठी वाचकांचा अचानकपणे निरोप घेतला. त्या सर्व वाचकांनी ‘मनोरंजन’वर जिवापलीकडे प्रेम केले होते. त्यामुळे ‘मनोरंजन’च्या निधनाने सगळ्यांनाच हळहळ वाटली. ‘मनोरंजन’ चाळीस वर्षे जगले; ‘मनोरंजन’चे मालक आणि संपादक काशीनाथ रघुनाथ मित्र ह्यांनी ‘मनोरंजन’ला अक्षरश: लहानाचे मोठे केले. ‘मनोरंजन’चा पहिला अंक हा फक्त बारा पानांचा होता. पुढे, तेच ‘मनोरंजन’ शंभर पानी झाले. पहिल्या अंकाच्या छोट्या संपादकीयात मित्रांनी म्हटले होते, की “आम्ही कशाकरता अवतार धारण केला आहे व पुढे काय काय कामे करणार आहोत, हे स्वमुखाने बरळण्यापेक्षा आमचे उद्देश आमच्या सर्वांगाचे परिशीलन केल्याने हळुहळू आमच्या प्रेमळ आश्रयदात्यांच्या लक्षात येतील, असे आम्हास वाटते. आम्ही आम्हास जे करायचे आहे ते सवडीसवडीप्रमाणे करून दाखवू एवढेच या ठिकाणी सांगण्याची परवानगी घेतो.” मित्रांनी विनयपूर्वक दिलेले हे अभिवचन ‘मनोरंजन’ने फारच थोड्या कालावधीत अक्षरश: पुरे करून दाखवले.

ब्लॅक ब्युटी – घोड्याच्या नजरेतून


‘ब्लॅक ब्युटी’ माझ्या वाचनातून अनेक पुस्तके गेली आहेत. कधी कादंबरी, कधी कथासंग्रह, कधी प्रवासवर्णन तर कधी आत्मचरित्र! पण ती सारी पुस्तके आहेत ती तुमच्या-माझ्यासारख्या माणसांवरची,  तशी माणसांशी संबंधित. माणसाने माणसाच्या नजरेतून, त्याच्या दृष्टिकोनातून लिहिलेली. पण मग माणसाप्रमाणे प्राण्यांच्या नजरेतूनही काही कथा असू शकतातच की! प्राण्यांना माणसांप्रमाणे जरी बोलता येत नसले तरी त्यांना मन असतेच ना! आणि मन म्हटले, की भावभावना ह्या आल्या. ते कधी दु:ख असेल तर कधी आनंद, कधी राग असेल तर कधी नैराश्यही! माणसाळलेला असाच एक प्राणी म्हणजे घोडा. घोडा! आपल्या पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग. घोड्याने जशी अनेक युद्धे पाहिली तसाच तो अनेक शर्यतींत चौफेर उधळलाही आहे. कधी तो श्रीमंतांचा थाट बनून राहिला तर कधी तो गरिबांची निकड बनला. बुद्धीने तल्लख असलेला तो प्राणी कुत्र्याप्रमाणेच माणसाचा लाडका ठरला. परंतु त्याच्या संपूर्ण प्रवासात त्याच्या मनाचा ठाव कधी कुणाला लागला का? त्या मुक्या जनावराच्या भावना कधी कुणापर्यंत पोचल्या का? त्याच्या वेदना जाणून घ्यायच्या असतील तर अ‍ॅना सेवेल यांनी लिहिलेल्या ‘ब्लॅक ब्युटी’च्या वाचनाशिवाय पर्याय नाही. एका घोड्याचे आत्मवृत्त हळुवारपणे मांडणारी कादंबरी म्हणूनच जागतिक साहित्यात ‘ब्लॅक ब्युटी’अजरामर ठरली आणि ती सर्वकाल रोचकतेने वाचली जाते.
 

ब्लॅक ब्युटी नावाचा घोडा आहे. जसे माणसाला स्वत:चे स्वातंत्र्य प्रिय असते तसेच ते मुक्या जनावरालाही तितकेच आवडते. म्हणूनच केवळ त्याला काबूत आणण्यासाठी त्याला लगाम घालण्याचा, फॅशनसाठी त्याचा लगाम अधिकाधिक आवळण्याचा, त्याची शेपूट कापून टाकण्याचा माणसाचा खटाटोप हा त्या मुक्या जनावरासाठी किती क्लेशदायक असू शकतो त्याचे चित्रण ‘ब्लॅक ब्युटी’मध्ये करण्यात आले आहे. ते थेट मनाला भिडते.
 

अहिराणी लोकपरंपरा


‘अहिराणी लोकपरंपरा’ पुस्तकाचे मुखपृष्ठसुधीर देवरे यांनी ‘अहिराणी लोकपरंपरा’ या पुस्तकाच्या प्रास्ताविकात त्यांचे जन्मगाव विरगावातील अनुभवसमृद्धीचे शब्दचित्र रेखाटले आहे. त्यावरून त्यांनी पुस्तकाची निर्मिती त्यांची अनुभूती, लोकसाहित्याबद्दल आस्था, ती जपण्याची तळमळ आम वाचकांपर्यंत पोचवण्याचा मानस ठेवून केली आहे. सुधीर देवरे हे भाषा, कला , लोकजीवन आणि लोकसाहित्य यांचे अभ्यासक आहेत. त्यांचे अहिराणी आणि मराठी भाषांत कवितासंग्रह, समीक्षा ग्रंथ व आत्मकथन असे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्या संपदेत नाटके आणि कादंबरी यांचाही समावेश आहे. लेखकाने प्रस्तुत पुस्तकात अहिराणी लोकपरंपरेचा उगम, तिचे भौगोलिक आणि साहित्यिक दृष्टीने प्रगत स्वरूप मांडले आहे. लेखकाने विषयानुसार वर्गीकरण केल्यामुळे वाचकांच्यासमोर अहिराणी संस्कृती चलचित्राप्रमाणे उलगडत जाते.
 

विश्वाचे आर्त - नवी जीवनशैली कशी हवी?


प्रिय अतुल देऊळगावकर,
 

विश्वाचे आर्ततुझे ‘विश्वाचे आर्त’ हे पुस्तक वाचल्यानंतर तुला लिहावे असे उत्कटतेने वाटले. तू गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील तुझ्या वेगवेगळ्या पुस्तकांतून ‘प्रगती व पर्यावरण’ या विषयाचा केवढा आवाका मांडला आहेस! थक्क व्हायला होते. तुझा लेखनप्रवास ‘डळमळले भूमंडळ’ पासून सुरू झाला. तू ते पुस्तक लातूर जवळच्या किल्लारी भूकंपानंतरच्या अनुभवातून लिहिलेस. तुझ्या अभ्यासाला तेथून बहुधा दिशा व गती लाभली. तुझे लॉरी बेकर, स्वामिनाथन अशा तज्ज्ञ मंडळींबद्दलचे जागरूक प्रेम तुझ्याबद्दलच्या अपेक्षा वाढवत गेले. तू त्यांच्याबद्दल पुस्तके लिहीलीस आणि त्यानंतर तुझी तज्ज्ञता वाढत गेली. तू त्या शोधात भारतभर व जगामध्ये भ्रमंती करत राहिलास, वेगवेगळी कमिशने-कमिट्या यांचा भाग बनत गेलास; परिषदांना उपस्थित राहिलास, तरीदेखील तुझ्यातील तळमळीचा कार्यकर्ता डोकावायचा. तुझे टेलिव्हिजनवरचे दर्शन व अभ्यासमांडणी चिकित्सक, विश्लेषणपूर्ण, तरी आर्जवी वाटायची. तुझा ‘हे जग बदलले पाहिजे – सुधारले पाहिजे’ हा ध्यास त्यामधून व्यक्त होत असे. त्याची परिणती तुझ्या ‘बखर’मध्ये झाली. ते पुस्तक ‘मौजे’ने प्रकाशित केले व तू तुझा समावेश प्रतिष्ठित लेखकांच्या वर्तुळात होण्यास त्यामुळेही अधिक पात्र ठरलास. तुझ्या नावाभोवती त्या वेळपर्यंत विद्वत्तेचे झकास वलय आले. तुझी गणना महाराष्ट्रातील मोजक्या पर्यावरणवादी, निसर्गप्रेमी बुद्धिवंतांत होऊ लागली. त्या विषयावर प्रेम करणारे अनेक आहेत, पण त्या विषयाचा ध्यास, व्यासंग... समाज कार्यकर्ता ते पढतपंडित ही तुझी वाटचाल विलोभनीय वाटली, मनी कौतुक दाटून आले.
 

देवाच्या नावानं...


'देवाच्‍या नावानं...' पुस्‍तकाचे मुखपृष्‍ठयुनिक फीचर्स ही उपक्रमशील संस्था आहे. संस्थेने वर्तमानपत्रांना फीचर्स-लेख पुरवणारा एक गट येथपासून दोन-अडीच दशकांपूर्वी सुरुवात करून, स्वत:चे मासिक, पुस्तके प्रकाशित करणारी पत्रकार मित्रमंडळी येथपर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या 'समकालीन' ब्रँडचे वैशिष्ट्य संकल्पनेत व शीर्षकांत आकृष्ट करणारी पुस्तके हे म्हणता येईल. त्यांच्या 'देवाच्या नावानं...' या, सप्टेंबर २०१२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संपादित पुस्तकाबद्दल तसेच कुतूहल जागे झाले होते. समाजात देवभक्तिभाव वाढत चाललेला दिसत असताना, या मंडळींनी देवाला कशा प्रकारे हाक घातली असेल बरे? असे म्हणून पुस्तक पाहवे-हाती घ्यावे असे पहिली जाहिरात नजरेत आल्या दिवसापासून वाटत होते.
 

 पुस्तक घडवले आहे झकास; त्याचे स्वरूप महाराष्ट्रातील दहा देवस्थानांचा शोधबोध असे आहे. सुहास कुलकर्णी व मनोहर सोनवणे यांनी ते संपादित केले आहे. त्यांना पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे, विशेषत: सुहास पळशीकर व राजेश्वरी देशपांडे या प्राध्यापक द्वयीचे सहकार्य लाभले आहे. ही सारी पुरोगामी मंडळी - धर्म, देव, परंपरा यांकडे चिकित्सकपणे पाहणारी. त्यांच्या वतीने, त्यांच्या विचारकल्पनेनुसार वेगवेगळे पत्रकार-लेखक शिर्डी, अक्कलकोट, शेगाव, पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर, शनी शिंगणापूर, सिद्धिविनायक या प्रस्थापित 'देवांघरी' गेले. त्यांनी इतिहास, भूगोल, देवस्थानाचे स्वरूप - त्याची सत्तासंपत्ती असा शोध घेतला व तो वेधक पद्धतीने मांडला असे या लेखनाचे स्वरूप आहे.
 

‘मल्टिनॅशनल वॉर’

अज्ञात 16/02/2013

‘मल्टिनॅशनल वॉर’ काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ  कैलास पगारे यांच्या ‘मल्टिनॅशनल वॉर’ या कवितासंग्रहाच्या नशिकमधील प्रकाशन समारंभानंतर एका वेगळ्याच, प्रासंगिक चर्चेला तोंड फुटले. मी समारंभात भाषण करताना कवितासंग्रहाचे कौतुक केले. संग्रह प्रभावी आणि आजच्या दांभिकतेचा भेद करणारा आहे हे खरेच. समारंभातील अन्य वक्ते अविनाश सांगोलेकर व प्रल्हाद लुलेकर यांनादेखील कवितासंग्रह महत्त्वाचा वाटला. पगारे यांच्या कवितेतील विचारांची झेप आणि भाषेची सुगमता ही विशेष प्रत्ययकारी आहे असे त्या दोघांचे म्हणणे जाणवले. तेही खरे आहे. विशेषत: त्यांच्या कविता मंचकविता म्हणून लोकांसमोर सादर झाल्या तर त्यांना उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद लाभेल याबद्दल संशय नाही.
 

 पगारे ‘मल्टिनॅशनल वॉर’मध्ये आजच्या काळाविषयी बोलतात. ते आजच्या काळाची वर्णने भेदक करतात. ते कलेक्टरला ‘शहेनशहा’ आणि मॅनेजरला ‘मॅन किलर’ असे संबोधतात तेव्हा अंगावर काटा येतो. त्यांना विद्यमान व्यवस्थेचा गळा घोटायचा आहे. समाजातील धर्मांधता नष्ट करायची आहे वगैरे वगैरे. समाजातील धर्मवेडाचे वर्णन करताना ते एके ठिकाणी म्हणतात, की देवांची संख्या एवढी वाढव, की प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला एक देव येईल! असा उपरोध आणि उपहास संग्रहात ठायी ठायी भिडतो.
 

 कैलाश पगारे  आंबेडकरी कवितेने कवितेची नवी व्याख्या केली असे गंगाधर पानतावणे यांनी संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. दलित कवितेची रचना निबंधसदृश वाटे पण तिला आरंभी विधानाचे स्वरूप होते. ते विधान त्या काळाचे द्योतक होते. त्यांतीलसुद्धा काही चांगल्या वाटणार्‍या कवितांना अंतर्गत लय असे व त्यामुळे त्यांना व्यक्तिनिष्ठ कवितेचा कलाबाजही लाभे. त्यांत भावनोद्रेक असे. आशानिराशा, अपेक्षा, आकांक्षा, वैफल्य, जिद्द, हतबलता अशा भावभावना आवेगाने येत व वाचकाच्या हृदयास सरळ हात घालत. त्याच बरोबर त्या मेंदूमध्ये खळबळ निर्माण करत त्या त्यामधील विचारगर्भतेने. कवितेमागील वैचारिक बैठक विशेषत: दलित-वंचित समुदायास आत्मभान येण्यास, स्वत:ची ओळख पटवण्यास मदतशील झाली. पगारे यांच्या कवितेत ते सारे गुण आहेत. त्यामुळे ती प्रभावी वाटते.  
 

‘श्यामची आई’ पुस्‍तकाची जन्मकथा


‘श्‍यामची आई’ : जिव्हाळा, प्रेम आणि कृतज्ञता

 ‘श्‍यामची आई’ या पुस्तकाला ७७ वर्षे झाली तरी त्याची क्रेझ अजून तितकीच आहे. साने गुरुजींनी स्वत:च्या हृदयातील जिव्हाळा त्यात ओतलेला आहे. आईच्या प्रेमाचा सुगंध त्या कथेतून दरवळत आहे. श्यामला वाटत असलेली आईबद्दलची कृतज्ञता, तिच्या विषयी असलेली भक्ती 'श्यामची आई' पुस्तकात मांडलेली आहे. तीच भावना आपल्या मनाच्या कोपऱ्यात असलेल्या ‘आई’विषयीच्या भावनांना साद घालते. म्हणूनच हे पुस्तक आजही पहिली पसंती आहे. 

'श्‍यामची आई'  ‘श्यामची आई’च्या पहिल्या आवृत्तीवर प्रसिद्धीची तारीख दासनवमी शके १८५७ अशी छापलेली असल्याने ती आवृत्ती १९३५ साली प्रकाशित झाली, असा अंदाज केला जातो आणि तोच गृहीत धरला जातो. अनाथ विद्यार्थी गृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केल्यावर पहिल्या आवृत्तीच्या प्रसिद्धीचे साल १९३५ असेच छापले. ते अजूनही तसेच छापले जाते. खरी गोष्ट अशी आहे, की शके आणि इसवी सन या दोन कालगणनांमध्ये अठ्ठ्याहत्‍तर वर्षांचा फरक असतो. पण ‘शके’ ही भारतीय कालगणना असल्याने त्याच्या वर्षाची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार मार्च-एप्रिलमध्ये होते. त्यामुळे ‘शके’च्या सालामध्ये इंग्रजी महिन्यांचा मार्च-एप्रिल ते मार्च-एप्रिल हा काळ येतो. मग साने गुरुजींची पुतणी सुधा बोडा यांनी दासनवमी शके १८५७ चे इसवी सनामध्ये अचूक वार, तारीख, महिना आणि साल काय येईल, याचा बराच शोध घेतला. त्यांनी जुन्या पंचांग तज्ज्ञांकडून सारे पडताळून घेतले, तेव्हा ‘श्यामची आई’च्या प्रसिद्धीची अचूक तारीख १६ फेब्रुवारी १९३६ आहे, हे सिद्ध झाले. त्यामुळे २०११ हे वर्ष ‘श्यामची आई’चे अमृतमहोत्सवी वर्ष होते.