श्‍यामची आई

अज्ञात 22/07/2014

श्‍यामची आईमहाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे पुस्तक ‘श्यामची आई’! त्या पुस्तकाबद्दल लिहिताना पुस्तकाचे लेखक साने गुरुजी यांचे उद्गार प्रथम आठवतात. पुस्तक प्रकाशित होत असताना त्यांनी त्यांच्या मनोगतात म्हटले होते, “हे हस्तलिखित आतापर्यंत साठसत्तर लोकांनी ऐकले-वाचले आहे. ते त्यांना आवडले. ते मी न विचारताच ‘आईबद्दलची त्यांची भक्ती व प्रीती हे हस्तलिखित वाचून शतपट वाढली’ असे म्हणाले. या पुस्तकाचे काम झाले आहे. ते महाराष्ट्रात खपले नाही, तरी त्याचे कार्य झाले आहे. ते लिहीत असताना मला अपार आनंद लुटावयास मिळत होता, हा काय कमी फायदा? परंतु मी आसक्तीमय आशा बाळगून राहिलो आहे, की ‘श्यामची आई’ घरोघरी जाईल; ते मुलांची मने बनवू पाहणाऱ्या पाठशाळांतून, निदान दुय्यम शिक्षणाच्या पाठशाळांतून तरी जाईल. ते तसे जावो वा न जावो; परंतु आज माझ्या अनेक मित्रांच्या प्रेमाच्या मदतीमुळे ‘श्यामची आई’ माझ्या घरातून सर्वांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहे. तिने स्वत:च्या मुलाला वाढवले, त्याप्रमाणे ती इतर मुलाबाळांनाही वाढवण्यासाठी बाहेर पडत आहे. ती उघड्या दारांतून आत शिरेल, बंद दारे ठोठावून पाहील. परंतु सारीच दारे बंद झाली तर? तर ती माझ्या घरातच येऊन राहील; माझ्या हृदयात तर ती आहेच आहे.”

आठवणीतील पाऊले - दिशादर्शी साठवणी


मो.शि. (उर्फ बापुसाहेब) रेगे यांच्या (‘आठवणीतील पाऊले’) या पुस्तकात त्यांनी वयाच्या परिपक्व थांब्यावर गतकाळच्या आठवणी जागवल्या आहेत. या आहेत आठवणी, सुजन मनानं जागवलेल्या.

आठवणींचे केंद्रबिंदू आहेत दादासाहेब रेगे. कारण त्यांच्या संस्कारांतून बापुसाहेब घडले, वाढले, वागले. महत्त्वाचे अन्य घटक म्हणजे, स्वत:चे व्यक्तिमत्त्व असलेली ‘बालमोहन’ शाळा, शिक्षक आणि मुलं.

हा ग्रंथ म्हणजे शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा इतिहास आहे; संस्कारांची महती सांगणारा हितोपदेश आहे, विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिशा देणारी मनकथा आहे. बापुसाहेब रेगे म्हणतात, ‘मी शिक्षणसेवा आणि बालसेवा यांचे व्रत घेतले.’ त्याचे प्रत्यंतर पुस्तकाच्या पानापानातून येतं. सव्वातीनशे पानांच्या पुस्तकांतील दोनशे अठ्ठयाहत्तर पाने त्याची प्रचिती देतात. पुढची पाने व्यक्तिगत नातेसंबंधातली, सन्मान-गौरव यांचा कृतज्ञ उल्लेख करणारी वगैरे आहेत पण त्यातही शिक्षकांनी त्यांच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या भावना उद्धृत करण्यासारख्या आहेत.

उपमुख्याध्यापिका त्यांच्या मनोगतात म्हणतात –

“आपल्या स्वभावाला एक
सौजन्यशीलतेची किनार आहे
आपल्या तत्त्वांना एक धार आहे.
आपल्या अनुभवसंपन्न विचारांना
दूरदृष्टीची जोड आहे.
सर्वाप्रती आस्था, आत्मीयता
हे आपल्या वृत्तीचे एक वैशिष्ट्य आहे”...

माझी कहाणी- पार्वतीबाई आठवले


पार्वतीबाई आठवले स्त्रियांची आत्मचरित्रे,  आत्मकथने मराठीत बरीच आहेत. लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’, रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’, सुनीताबाई देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’ अशी काही लोकप्रिय आहेत.

असंच एक जुनं आत्मचरित्र म्हणजे पार्वतीबाई आठवले यांचं ‘माझी कहाणी’. पार्वतीबाई ह्या श्रीमती बाया कर्वे (महर्षी कर्वे यांच्या द्वितीय पत्नी) यांची बहीण.

पार्वतीबाईंचा जन्म १८७० सालचा. अकराव्या वर्षी लग्न. पंधराव्या वर्षी पहिले अपत्य. विसाव्या वर्षी वैधव्य. केशवपन आणि तांबडी वस्त्रे हा त्या वेळच्या विधवांचा ‘सनदशीर’ पोशाख. पार्वतीबाईंनी शिकायला सविसाव्या वर्षी सुरुवात केली. त्या इंग्रजी शिकण्यासाठी अमेरिकेला पंचेचाळीसाव्या वर्षी गेल्या व त्या भारतात १९२० साली परतल्या. त्यांनी १९०४ पासून म्हणजे वयाच्या चौतिसाव्या वर्षी अनाथाश्रमाकरता वर्गणी गोळा करायचे काम अंगावर घेतले आणि त्यांनी तेच काम पुढे आयुष्यभर केले.

पार्वतीबाईंचा जीवनप्रवास कोणत्या टप्प्यांनी झाला ह्याचा हा स्थूल आराखडा. प्रवास सुरू कसा झाला, पार्वतीबाईना आयुष्याचे ध्येय कसे सापडले, त्या अमेरिकेत इंग्रजी शिक्षणासाठी गेल्या तो उद्देश सफल झाला का आणि त्यांना तिथे काय अनुभव आले किंवा कोणत्या दिव्यातून जावे लागले याचा विस्तृत वृत्तांत म्हणजे या पुस्तकातला मजकूर.

अंधांच्या वाचनासाठी कार्यरत


सुखदा पंतबाळेकुंद्रीअंधांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्य वाचायला मिळावे यासाठी धडपडणाऱ्या ठाण्याच्या सुखदा पंतबाळेकुंद्री, पुण्‍याचे उमेश जेरे आणि त्यांच्या तीनशेहून अधिक सहकाऱ्यांनी मराठीतील तीनशेहून अधिक पुस्तकांचा खजिना ब्रेलमध्ये रूपांतरित केला आहे. त्या साहित्याला आणि अभ्यासाला पूरक अशा मराठी ते मराठी या शब्दकोशाचेही रूपांतर ब्रेलमध्ये करण्यात आले आहे.

सुखदा पतबाळेकुंद्री आणि उमेश जेरे हे दोघे मुंबई-पुण्‍यात आपापल्‍या परिने अंधांसाठी मराठीतील साहित्‍य ब्रेलमध्‍ये आणण्‍याचे काम करत होते. कामाच्‍या ओघात दोघांचा परस्‍परांशी संपर्क झाला. उमेश जेरे पुण्‍यातून तर सुखदा मुंबईतून काम करत आहेत. त्‍यांनी मोठ्या प्रमाणात बालसाहित्‍य ब्रेलमध्‍ये आणले आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या कामाचा रोख मोठ्यांसाठीची पुस्‍तके ब्रेलमध्‍ये आणण्‍याकडे वळवला आहे.

कैलास भिंगारे - साहित्य-संस्कृतीचा शिलेदार


सरस्वती लायब्ररी ते व्यंगचित्रकार संमेलन

कैलास भिंगारेकविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना ज्ञानपीठाचा सन्मान मिळाला होता, हे मराठी सर्व रसिकांना ठाऊक आहे; मात्र त्याच महान कवीने पुण्यातील रस्त्याच्या कडेला टपरीतील वाचनालय चालवणाऱ्या कार्यकर्त्‍यांना कला महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक उपक्रमांसाठी मोठी जागा द्यावी, ही विनंती केली होती, ती घटना फार थोड्यांना माहीत असेल! पुणे महापालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रजांच्या त्या विनंतीकडे जराही लक्ष दिले नाही. अर्थात, तात्यासाहेबांनी ती विनंती ज्याच्यासाठी केली होती, तो मात्र विलक्षण जिद्दीने, महापालिकेच्या अतिक्रमणाच्या फुफाट्यात वाहून न जाता खंबीरपणे उभा राहिला आहे आणि पुण्यासारख्या शहरात साहित्य-संस्कृतीचा शिलेदार म्हणून आत्मविश्वासाने वावरत आहे.

कोथरूड-कर्वेनगर-वारजे या पश्चिम पुण्यातील विस्तारलेल्या उपनगरातील विविध सांस्कृतिक आणि वाङ्मयीन उपक्रमांच्या आरंभीची आणि विस्ताराची पार्श्वभूमी ज्याच्या उत्साहामुळे आणि सक्रियतेमुळे तयार झाली, तो कार्यकर्ता आहे कैलास भिंगारे!

कैलास भिंगारेकैलासची आणि माझ्यासारख्या पत्रकार-लेखकाची पहिली भेट झाली त्याला पंचवीस-तीस वर्षे उलटून गेली आहेत. त्यावेळी त्याची पुस्तकाची टपरी पौड फाट्यापाशी रस्त्याच्या मध्यभागी होती. तो रस्ता अरुंद आणि नादुरुस्त असा होता. त्याने सरस्वती लायब्ररी त्याच रस्त्यावरील टपरीवर महापालिकेची परवानगी घेऊन सुरू केली. त्यावेळी कोथरुड परिसर विकसित होत होता, वस्ती वाढत होती आणि विविध थरांतील लोक त्यांची नवी घरे बांधून तेथे राहायला येत होते. त्या वर्गाची भूक वाचनाची होती. ती लक्षात घेऊन कैलासने सरस्वती लायब्ररी सुरू केली होती. कैलासचे लहान भाऊ त्याला त्यात मदतीला होते.

राँग थिअरी


आपण आणि आपल्या आजुबाजूचा जगरूपी पसारा याविषयी विचार करणे ही माणसाच्या आवडीची गोष्ट. लहान मूलसुद्धा स्वत:साठी त्याच्या परीने तसा विचार करत असते. अजमावत असते, की हे काय विश्व आहे - येथे काय केले जाऊ शकते... मला काय काय करता येऊ शकते... काय केले तर मजा येते... काय झाले तर धडपडायला होते... त्याला त्रास कशामुळे होतो... त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास कधी होतो...

माणूस अनुभवाच्या प्रक्रियेतून, विचार करण्यातून मोठा होतो. त्याचे लहानपणीचे काही समज-गैरसमज कुणी न सांगता बदलतात; काही तसेच राहतात, भक्कम होतात. त्याचे आकलन घडवण्याला - स्वानुभवाच्या जोडीला इतरांचे अनुभव, काही सामुहिक माहिती (पुस्तके, वर्तमानपत्रे इत्यादी) - मदत करतात. त्या सगळ्यातून त्याचा कॉमन सेन्स किंवा सर्वसाधारण समज आकाराला येतो.

कॉमन सेन्स माणसाला जगणे सोपे करण्याला मदतशील असतो; परंतु कॉमन सेन्स सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. पसाऱ्यातील गुंता जेवढा वाढत जातो आणि जगणे जेव्हा अवघड वाटू लागते तेव्हा गुंता सोडवण्यासाठी कॉमन सेन्सच्या पलीकडचा प्रयत्न लागतो. गिरीश अभ्‍यंकर लिखित ‘राँग थिअरी’ हा तसा प्रयत्न आहे.

तो प्रयत्न का करायचा याचे उत्तर ही ‘राँग थिअरी’ या पुस्तकाची कळीची गोष्ट आहे. त्या प्रयत्नाचे उद्दिष्ट ‘मजेत राहणे’ असे आहे. ते पुस्तक ‘आपल्याला मजेत राहायला आवडतं बुवा!’ ही कबुली ज्यांना द्यावीशी वाटते त्यांच्यासाठी आहे. मजेत राहण्यासाठी मानवतील तेवढे कष्ट आणि सोसवतील तितपत धोके किंवा हानी असे समीकरण जुळावे लागते.

रुपवेध - जाणिवेतून नेणिवेपर्यंतचं नाट्य


डॉक्‍टर श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर साकारलेल्‍या भूमिका - त्‍या रंगवताना त्‍या भूमिकांमागचा त्‍यांचा सर्वांगीण विचार, त्‍यांचं ‘नाटक’ या माध्‍यमाबद्दलचं व अभिनयाबद्दलचं चिंतन आणि त्‍यांनी पाहिलेला–घडवलेला मराठी रंगभूमीचा काळ...  अशा विविध विषयांना स्‍पर्शणा-या लेखनाचं संकलन म्‍हणजे ‘रूपवेध’ हे पुस्‍तक होय. या पुस्‍तकाचा विशेष असा, की यात डॉक्‍टर लागूंनी लिहिलेले काही लेख प्रथमच पुस्‍तकरुपात प्रकाशित होत आहेत. पुस्‍तकाच्‍या प्रस्‍तावनेत रामदास भटकळ लिहितात, की डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍या रंगभूमीवरील  कामाचा ‘लमाण’ या पुस्‍तकातून आढावा घेतला. मात्र त्‍यानंतर त्‍यांनी त्‍यांचे चित्रपटसृष्‍टीतले अनुभव, त्‍यांचे सामाजिक आणि सांस्‍कृतिक विचार आणि त्यांची त्‍यांवरील वैयक्तिक निष्‍ठा यांविषयी लिहिणं आवश्‍यक होतं. त्‍यांना त्‍यांच्‍या वृत्‍ती आणि प्रकृती यांमुळे ते लेखन करणं शक्‍य नव्‍हतं. ती उणीव डॉक्‍टरांच्‍या मुलाखती आणि त्‍यांचे इतर लेख यांमधून दूर करण्‍याचा हा प्रयत्‍न आहे.’

पुस्‍तकात विविध लेखांचं संकलन आहे हे स्‍पष्‍ट झालं असलं तरी त्‍या लेखांना मांडणीच्‍या अंगानं प्रवाही गती मिळवून देण्‍याचा प्रयत्‍न दिसतो. तो परिणामकारकही आहे. पुस्‍तकाची विभागणी पाच विभागांत केलेली आहे. मात्र लेख संकलित असल्‍याने त्‍यांमध्‍ये निश्चित असं समसूत्र शोधणं कठिण असावं. त्‍यामुळे विभागांची नावं (पहिला विभाग वगळता) थोडी ढोबळ भासतात. मात्र त्‍यास पर्याय नसावा!

पहिल्‍या विभागात डॉक्‍टर लागूंनी लिहिलेली ‘गणूचा सदरा’ ही मार्मिक एकांकिका आहे. या एकांकिकेत माणसानं सभोवतालच्‍या उद्वेगजनक आणि असह्य गोष्‍टींनी अस्‍वस्‍थ व्‍हावं, की तात्‍पुरते उपचार करून त्‍याच्‍या मनाला आतून लागणारी बोच बोथट करून टाकावी असा सवाल उपस्थित करण्‍यात आला आहे. या एकांकिकेतून डॉक्‍टर लागू यांची नाट्याची सूक्ष्‍म जाण ध्‍यानात येतेच, पण त्‍यांच्‍यातल्‍या कलावंताचं भोवतालच्‍या प्रश्‍नांनी अस्‍वस्‍थ होणंही जाणवतं. डॉक्टरांनी त्‍यानंतरच्‍या काळात सामाजिक प्रश्‍नांवर ज्‍या भूमिका घेतल्‍या त्‍या विचारप्रक्रियेची छटा या लेखनात दिसून येते. (अशा छटा पुस्‍तकातील इतर लेखांतही आढळतात.)

शम्स जालनवी - कलंदर कवी


महम्मद शमसोद्दीन ऊर्फ शम्स जालनवीजालना शहर पूर्वीपासून जसे व्यापारउदीम आणि उद्यमशीलता यांसाठी प्रसिद्ध आहे तसे ते उर्दू कवी आणि मुशायरे यांसाठीही परिचित आहे. एकेकाळी उर्दू मुशायरे गाजवणारे रामकृष्ण ऊर्फ शोला यांच्या नावाचा चौक शहरात आहे. त्याच शहरातील महम्मद शमसोद्दीन ऊर्फ शम्स जालनवी हे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या अर्धशतकापेक्षा अधिक काळ मुशायरे गाजवत आहेत.

त्यांच्या वयाची पंच्याऐंशी वर्षे उलटून गेलेली आहेत. जवळपास पावणेसहा फुटांची उंची, पांढरीशुभ्र दाढी... ‘शम्स’ यांची प्रकृती तंदुरुस्त आहे. ते रोज सकाळी पाच वाजता उठून सायकलवरून बसस्थानकात पोचतात. शहरभर सायकलवर फिरून उर्दू वृत्तपत्रवितरण करणे हा त्यांच्या चरितार्थाचा व्यवसाय. त्यांनी एका ऑईल मिलमध्ये नोकरी करून पाहिली, परंतु ते काही त्यांना जमेना म्हणून ते वृत्तपत्रवितरणाच्या कामास लागले. त्यांच्या दोन मुलांपैकी एक त्या व्यवसायात त्यांच्या मदतीला आहे. शम्स याचा अर्थ सूर्य. म्हणूनच बहुधा अरुणोदय होण्याच्या आधीच एवढ्या वयातही शम्स सायकल घेऊन जालना शहराच्या रस्त्यावर असतात!

शम्स यांनी शायरीत अधिक रस घेण्यास सुरुवात केली ती थोरल्या भावामुळे. तो शिक्षक होता. त्यांची पहिली रचना एका हिंदी मासिकात छापून आली, त्यास जवळपास पंचावन्न वर्षे उलटून गेली आहेत. ती आठवण ‘शम्स’ यांच्या मनात ताजी आहे.

जहर-ए-कातील है, अगर
हुस्न तो अमृत भी है
एक तवायफ की सोचो
वो औरत भी है। (१९५८)

त्यांचे वडील पहेलवान होते आणि तो कित्ता ‘शम्स’ यांनीही बालपणापासून गिरवला होता. त्यांच्या तंदुरुस्त प्रकृतीचे रहस्य शरीरसंपत्तीकडे बालपणापासून लक्ष दिलेल्या व्यायामातही आहे.

गो. म. कुलकर्णी - चिकित्सक चिंतनशील

अज्ञात 06/01/2014

गो. म. कुलकर्णी (छायाचित्र - लोकमत वृत्‍तपत्रातून साभार)गो. म. कुलकर्णी गेले त्यालाही पुरी बारा वर्षं झाली. एक तप. आणि आता हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचं. १९१४ चा त्यांचा जन्म. काळ फार भराभर सरकत जातो आहे. सार्वजनिक जीवनावरून, पुस्तकांवरून, आपल्यावरूनही वाड्मय व्यवहारात सतत वावरलेली, प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली, वाचनात आणि चर्चेत असलेली माणसेही काळाने पाहता-पाहता विस्मरणाच्या छायेत सरकवून दिली आहेत. मग गो. मं. सारख्या शांत, मितभाषी समीक्षकांची गोष्ट काय!

फार साधे, सौम्य होते गो. म.! साहित्याच्या जगातले एखाद-दोन अपवाद वगळता बहुतेक कुलकर्णी जसे होते तसेच, गंभीर प्रकृतीचे. सद्भिरुची असणारे. वाड्मयव्यवहारातल्या मौजमजेच्या कार्यक्रमांना किंवा उत्सवांना त्यांची उपस्थिती फारशी नसायची. इचलकरंजी-सांगली भागात ते शिकले आणि नंतर पुण्यात आले. एम्. ए. झाले. शिक्षकही झाले. मराठी आणि संस्कृत हे त्यांचे प्रेमाचे विषय. नंतर महाविद्यालयांमधून शिकवताना विजापूर, कर्हाकड, वाईला राहिले आणि अखेरचा काळ पुन्हा पुण्यात येऊन स्थिरावले.

फार चढ-उतार नसलेला आयुष्यक्रम. नेमस्त, सत्वशील असं जगणं भोवतालच्या माणसावर ठसा उमटे तो त्यांच्या अनाग्रही पण चिकित्सक, मार्मिक अशा वाड्मयीन दृष्टीचा. १९८० च्या आसपास ते आमच्या घरी येऊ लागले. विश्वरनाथराव शेट्ये यांच्याबरोबर माझ्या वडिलांच्या अमृत महोत्सवी गौरवग्रंथाचं संपादन ते करत होते तेव्हा. नंतर मग पुण्यात राहायलाच आले आणि सपत्निक घरी येत राहिले. घरगुती, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये वडीलधा-या माणसांसारखी त्या दोघांची उपस्थिती असायची.

ओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ


लोकमान्‍य टिळकप्लेगचे कारण घेऊन पुण्याच्या कमिशनरांनी काही पाचपोच न ठेवता लोकांच्या घरात शिरून लोकांचा छळ आरंभला होता तेव्हा "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा अग्रलेख ‘केसरी’त लिहिणारे लोकमान्य.

माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा निराशाजनक असल्यामुळे, ‘उजाडलं, पण सूर्य कुठे आहे’ हा ‘केसरी’त अग्रलेख लिहिणारे लोकमान्य.

मंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’सारखा ग्रंथ लिहिणारे लोकमान्य…

पण लोकमान्य टिळक हे गृहस्थ मुळात मोठे अभ्यासू होते. गणित आणि खगोल-विज्ञान हे त्यांचे प्रिय विषय. अभ्यासात मग्न होऊन संशोधन करावे आणि शास्त्रज्ञ बनावे अशी त्यांची इच्छा होती. ते संस्कृत भाषेतसुद्धा पारंगत होते. त्यांचे भक्त बंगाल प्रांतात तर होतेच; पण लखनौ, लाहोर येथेही होते. बॅ. जिना यांच्याशी त्यांचे सख्य होते. त्यांनी जोतिबा फुले यांच्याशी (चिपळूणकरांप्रमाणे) वितंडवाद घातला नाही. ते जगले असते तर त्यांनी आंबेडकरांशीही जमवून घेतले असते.

त्यांनी लिहिलेल्या इंग्रजी ग्रंथांपैकी The Orion आणि The Arctic Home in the Vedas हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी दुसरा ग्रंथ बराच परिचित आहे व त्याच्या शीर्षकावरून, तो न वाचताही त्याचा आशय काय असावा याची कल्पना येते. पण Orion ची कल्पना येत नाही. मात्र, ‘गुगल’मध्ये शोधल्यास The Orion या ग्रंथाच्या मूळ प्रतीची फोटोकॉपी मिळते!