अफलातून भालचंद्र नेमाडे

प्रतिनिधी 27/06/2012

भालचंद्र नेमाडेप्रा. भालचंद्र नेमाडे हे एक अफलातून तर्‍हेवाईक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे ख्यातकीर्त लेखक व तेवढेच मर्मग्राही समीक्षक म्हणून महाराष्ट्रातला सुजाण वाचक आदराने पाहतो. त्यांनी त्यांच्या 1962 साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोसला’ कांदबरीपासून वेळोवेळी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिलेली आहे. त्यांनी पाश्चात्य वाड.मयातील अनेक कलाकृतींचे कोडकौतुक केले असले तरी पाश्चात्य वर्चस्ववादी वृत्तीला त्यांचा प्रखर विरोध आहे. ते तौलनिक भाषाशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तीन वर्षे इंग्लंडला होते. त्यांना तेथे वर्णवर्चस्ववादाचे जे अनुभव आले ते त्यांनी परत येताच प्रकटपणे मांडले. किंबहुना त्यामधून त्यांचा देशीवाद जन्माला आला. ते सध्या कादंबरीकार म्हणून जेवढे माहीत आहेत तेवढेच किंवा त्यापेक्षा अधिक देशीवादाचे प्रवर्तक म्हणून लौकिकप्राप्त आहेत. नेमाडे यांच्याइतका प्रभावी साहित्यकार गेल्या अर्धशतकात मराठीमध्ये झाला नसेल. त्याचे एकच लक्षण सांगायचे तर नेमाडे यांच्या नावाने त्यांच्या जिवंतपणीच पंथ (कल्ट) तयार झाला आहे. त्यांच्या विचारपद्धतीचे व लेखनशैलीचे अनुकरण मराठीतील रंगनाथ पठारे यांच्यापासून प्रवीण बांदेकर यांच्यापर्यंतचा लेखकवर्ग करत असतो.

शुल्बसूत्रे - वेदकाळातील मोजमापे


वेदकाळात भूमापन दोरीने होत असे. दोरीवर मोजमाप करण्याकरता सम अंतरावर काही खुणा असत, त्यांना मात्रा म्हणून संबोधत. ह्याच शुल्बसूत्रांच्या आधारे भूमापन, वास्तू, रंगमंच, मंदिरे, प्रासाद व अनेक शिल्पे यांचे मापन होऊन त्यानुसार ती बांधली जात असत. त्याच बरोबरीने शुल्बशास्त्राचा खरा उपयोग झाला तो वैदिक काळात: यज्ञवेदी बांधणे, यज्ञकुंडाचे मोजमाप करणे व यज्ञमंडपाचे मोजमाप करणे यासाठी. यज्ञवेदीचे व चितीचे आकार हे चौकोनी, त्रिकोणी व वर्तुळ असे असत, किंवा यज्ञवेदी पक्षाच्या आकाराच्यादेखील असत. जरी आकार निरनिराळे असले तरी ते समक्षेत्रफळाचे असावेत असा दंडक होता, निरनिराळ्या यज्ञांकरता वेगवेगळ्या वेदी बांधल्या जात असत व जसा यज्ञाचा हेतू तसे त्यांचे आकारमानही मोठे होत जाई, प्रचंड अशा वेदी बनवाव्या लागत. क्षेत्रफळ वाढत असे पण त्याचे प्रमाण मात्र ठरलेले असे, वेदी प्रमाणाच्या बाहेर गेल्‍या, की ज्या कारणाकरता यज्ञ आखला गेला असे, ते कारण वा तो हेतू मुळी साध्यच होत नसे. त्यामुळे वेदी किंवा चिती आखण्याचे काम अतिशय प्रमाणबध्द असे.

 

अशी ही शुल्बसूत्रे, की ज्यांमध्‍ये अनेक प्रमेये तयार झाली, त्यांच्यासाठी सूत्रांची रचना झाली. ही प्रमेये खगोलविज्ञान, यज्ञशास्त्र, अवकाशशास्त्र यांतील लांबी, रुंदी, व्यास, परीघ, त्रिज्या ठरवणे, गतीची गणिते करणे यांसाठी वापरली गेली.
 

अहिराणी – खानदेशची मध्यवर्ती बोली


महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्‍या थोड्या वेगळ्या स्‍वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची पोटभाषा म्हणून समजली जाणारी ही बोली सर ग्रिअर्सन संपादीत ‘लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’च्या नवव्या खंडाच्या तिस-या भागात अहिराणीचा उल्‍लेख आला असून त्‍यांनी या भाषेचा भिल्‍लांची भाषा म्‍हणून उल्‍लेख केला आहे.

डॉ. दामोदर खडसे

प्रतिनिधी 27/09/2011

इंग्रजीचा भडिमार असणार्‍या आणि विद्यापीठांमधील भाषाविभाग ओस पडत असलेल्या काळातही खडसेसर हिंदी भाषेच्या भवितव्याबद्दल आशावादी आहेत. त्यांच्याकडे भाषासंवर्धनासाठी ‘लँग्वेज इंजिनीयरिंग’ चा भक्कम पर्याय आहे. कालौघात आपली भाषा जिवंत, रसरशीत ठेवायची असेल, तर तिचं रूपही काळानुसार बदलत राहिलं पाहिजे आणि हे बदल खुलेपणानं स्वीकारले पाहिजेत असं खडसेसरांचं म्हणणं आहे. टीव्ही, जाहिराती, सिनेमा, इंटरनेट, पत्रकारिता अशा अनेक माध्यमांना हिंदी भाषातज्ज्ञांची व लेखकांची गरज सतत असते. भाषेचं क्षेत्र हे अनुवाद ही पूर्णवेळ करिअर करता येण्याइतकं विस्तारलेलं आहे. ‘सी डॅक’ सारख्या माहिती तंत्रज्ञान कंपनीत दीड हजारांहून अधिक हिंदी भाषा व्यावसयिक आहेत. वेगवेगळ्या भाषांसाठी खास सॉफ्टवेअर बनवली जात आहेत. अशा परिस्थितीत भाषेचं काय होणार ही चिंता करण्यापेक्षा भाषांमधील उत्तम करिअरची माहिती अधिकाधिक लोकांपर्यत पोचली पाहिजे असं खडसेसर आवर्जून नमूद करतात.

भाषेच्या सद्यस्थितीबद्दल भाष्य करण्याचा अधिकार खडसेसरांना आहे. खडसेसरांचा जन्म छ्त्तीसगडमध्ये असलेल्या सरगुजा संस्थानात 11 नोव्‍हेंबर 1948 रोजी झाला. तिथंच शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अकोल्यात म्हणजे त्यांच्या मूळ गावी एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर शिक्षकी पेशात असताना. नागपूरातून बी.एड., एम.एड. ह्या पदव्या आणि हिंदी भाषेतील डॉक्टरेट संपादन केली

श्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखा

प्रतिनिधी 09/09/2011

श्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखाझाडे जशी दिवसउजेडात कार्बनडाय ऑक्साइड घेतात आणि इतर सजीवांसाठी आवश्यक प्राणवायू सोडून त्यांचे जीवन शक्य करतात; तसे श्यामसुंदर देवीदास जोशी त्यांच्या वाचनप्रेमाच्या छंदाने त्यांच्या स्वत:बरोबरच सभोवतालच्या माणसांची वाचनाची भूक वाढवतात आणि शमवतातदेखील! त्या झाडांसारखी.. निरलस भावनेने.. प्रौढी न मिरवता. सभोवतालच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून दरवेळी प्रवाहाच्या विरुद्धच पोहायला हवे असे नाही, तर प्रवाहाबरोबर राहतानासुद्धा आपल्याला हव्या त्या दिशेला जाता येते, हे काही माणसे आपल्या कृतीतून दाखवून देतात.

'ओपिनीयन'ला निरोप देताना...

प्रतिनिधी 26/07/2011

अजून ज्याला तारुण्य लाभायचे आहे अशा होतकरू किशोराचे अचानक निधन झाले हे ऐकून मनात जसे सुन्न वाटते; तसेच, 'ओपिनीयन' हे गुजराथी मासिक बंद पडणार ही वार्ता ऐकून वाटले. त्याचे 'एकला चलो रे' असे व्रत घेतलेले संपादक श्री. विपुलभाई कल्याणी यांच्याबद्दल खूप खंत वाटली. त्यांनी अतिशय आटापिटा करून पंधरा वर्षे 'ओपिनीयन'ला जोपासले, पण अखेर छपाई, टपालव्यवस्थेतील अंदाधुंदी व अपुरी ग्राहकसंख्या ह्या कारणांस्तव त्यांना आपला नाद सोडून देणे अपरिहार्य ठरले.

वेम्बली(इंग्लंड)हून प्रसिध्द होणारे, सर्वसामान्य स्वरूप असलेले एक असामान्य मासिक मार्च 2010 पासून कागदोपत्री प्रकाशित होणे बंद झाले. एप्रिल 2010 पासून त्याची केवळ 'इलेक्ट्रॉनिक' आवृत्ती प्रसिध्द होऊ लागली! विपुलभाईंशी बोलताना, त्यांनी 'ओपिनीयन' बंद करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण सांगितले. ते म्हणजे सर्वसामान्य गुजराती माणसाची भाषा व साहित्य यांबद्दलची तोकडी आसक्ती! ते म्हणाले, की शिक्षित, मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या घरी गेल्यास हॉलमधील कॉफीटेबलवर निदान दोन-तीन मासिके व शेल्फवर दोन-चार कादंब-या अवश्य दिसतात. सर्वसामान्य गुजराती घरांतून ह्या गोष्टी खूप कमी दिसतात. सांगायचे तात्पर्य असे अजिबात नाही, की गुजराती माणसाला वाड्ःमयाची आवड किंवा भाषेबद्दल आपुलकी नाही. परंतु अशी आवड व आपुलकी असलेली माणसे एकंदर (शिक्षित) लोकसंख्येच्या खूप अल्पांश आहेत.
 

‘श्यामची आई’ म्हणजे मधाचं पोळं


(‘श्यामची आई’ या पुस्तकास पंचाहत्तर वर्षे झाली, त्या निमित्ताने)

साने गुरुजींच्या जीवनात आचार आणि विचार यांचं सौंदर्य त्यांच्या आईनं निर्माण केलं. हळुवार भावना, निसर्गावरील प्रेम, नक्षत्रांचं आकर्षण, माणसाविषयी कणव हे सर्व सदगुण म्हणजे आईची देणगी. ती कृतज्ञ भावनेनं व्यक्त करणं हाच मनाचा मोठेपणा आहे. साने गुरूजी हे अशा आदर्शाचं मूर्तिमंत उदाहरण होतं.

त्यामुळे ‘श्यामची आई’ हे पुस्तक पाऊण शतक टिकलं. त्याच्या लक्षावधी प्रती संपल्या. ज्यांना वाचनाची आवड लागते त्या मुलांनी प्रारंभी ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचलं असावं, असं खुशाल समजावं.

हे पुस्तक वाचताना डोळ्यांतून अश्रू वाहिले नाहीत असा वाचक विरळा, अनेक प्रसंगांतून श्यामला धडा मिळतो. मात्र त्या प्रसंगात कृत्रिमता नसते. उपदेशामृत पाजण्याचा आव नसतो. गुरूजींची ही शैली वाचकाला मंत्रमुग्ध करते.

कृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो

प्रतिनिधी 16/05/2011

फादर दिब्रिटो हे कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. त्यांचा जन्म वसईतील मराठी भाषिक ख्रिस्ती कुटुंबातील. विरार-आगाशी परिसरातील नंदाखाल हे त्यांचे जन्मगाव. मराठी साहित्यातील एक सिध्दहस्त लेखक, संपादक, पर्यावरण रक्षणार्थ झटणारा व दहशतवादाविरुध्द आवाज उठवणारा सजग कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 1972 मध्ये धर्मगुरूची दीक्षा घेतली. दीक्षित धर्मगुरुपदासाठी आवश्यक शिक्षण घेताना फादर दिब्रिटो यांनी ख्रिस्ती धर्माचे तत्त्वज्ञान व चर्चच्या इतिहासाचा अभ्यास केला. तसेच, त्यांनी इतर धर्मांचाही अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या विचारांना चौरस बैठक लाभली. ते निष्ठावंत कॅथलिक असले तरी त्यांची धर्मनिष्ठा आंधळी किंवा भाबडी नाही. तेव्हापासून त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाच्या कार्याला गती मिळाली. त्या आधीपासून त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीची सुरुवात झालेली आहे; ती चालूच आहे.