कला

महाराष्‍ट्रातील कलात्‍मक प्रतिभा, त्‍याचा इतिहास आणि वर्तमान!

सुभाष शहा यांची परमार्थाची सुरावट

सुभाष शहा यांनी सध्या जो ध्यास घेतला आहे तो त्यांच्या व्रतस्थतेचा अधिक निर्देशक आहे. ते ठाण्याच्या सोसायट्यांमध्ये अथवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या जागी जातात आणि ‘बासरी वाजवू का?’ असे विचारतात. त्यांचे वसाहतींमध्ये जाऊन असे तासाभराचे कार्यक्रम करण्यामागे धोरण आहे. ते म्हणतात, की सर्व माणसे हल्ली फार गडबडीत असतात; कोणाला म्हणून निवांतपणा नसतो. त्यामुळे सोसायट्यांत बाहेर क़ोणी येत नाही, एकमेकांना कोणी भेटत नाही. मी तेथे सुटीच्या दिवशी जातो, तासभर बासरी वाजवतो, गप्पा मारतो. बासरीने आल्हाद तयार होतो. चार माणसे जमतात-संवाद सुरू होतो.   उपजीविका माझी क्रमश:

बालगंधर्वांचे पत्र

माझ्या मुंजीत मला आशीर्वाद देण्यासाठी बालगंधर्व आले होते. माझी मुंज भरवस्तीतल्या ब्राह्मणसभेत होती. मी आठ वर्षांचा असल्याने मला काही कळत नव्हते. बालगंधर्व आले आहेत असे कळल्यावर त्यांना पाहणा-यांची अतिशय गर्दी जमली होती. ते माझ्या मुंजीला येण्याचे कारण म्हणजे माझे वडील विष्णुपंत मराठे हे गंधर्वांचे परमभक्त. ते स्वतःही गात असत. गंधर्व मंडळीचा बडोद्यात मुक्काम असला की विष्णुपंत प्रत्येक खेळाला हजर असत. त्यातून त्यांची ओळख झाली होती. एकदा गंधर्वांचा चेहरा थोडा खिन्न असता विष्णुपंतांनी विचारले, 'नारायणराव, काय अडचण आहे ती मोकळेपणानं सांगा'. तेव्हा ते म्हणाले क्रमश:
पटवर्धन यांनी चितारलेली श्री गणेशाची विविध रूपे

तीच ती चित्रे...

माझे वय ८०वर्षे पूर्ण आहे. मी १९४६ साली ‘इंटरमिजिएट् ड्रॉइंग’ व त्यापूर्वी एलिमेंटरी ड्रॉइंग परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. या परीक्षांसाठी केलेल्या पूर्वतयारीचा फायदा स्थापत्यशास्त्रातील पदविका मिळण्यासाठी झाला. नोकरीमधील जून १९५५ ते सप्टेंबर १९९० या कालावधीत मला ड्रॉइंग कलेकडे कधीही लक्ष देण्याची आवश्यकता/निकड भासली नाही.मी निवृत्तीनंतर, १९९६ मध्ये मुलाकडे अमेरिकेत शिकागो येथे सहा महिने वास्तव्यास गेलो. तिथे त्याच्या मित्राचा अडीच वर्षांचा मुलगा रोज दुपारी दोन तास आमच्याकडे येऊन आम्हा उभयतांबरोबर खेळत बसे. त्यावेळी मी त्याच्यासाठी चित्रे काढू लागलो व अशा क्रमश:

पद्मजा फेणाणी-जोगळेकर - जीवन-एक...

कार्यक्रमांतून गात नसते तेव्हा आल्बमच्या ध्वनिमुद्रणात व्यग्र असते किंवा ती महाराष्ट्रातून कुठून कुठून येणा-या वेगवेगळ्या वयांच्या विद्यार्थ्यांची गाण्याची शिकवणीही एखाद्या अस्सल पंतोजीसारखी घेत असते! किंवा कुणा आजारी माणसाच्या औषधोपचारासाठी पदरमोड करून धावत असते. घरात असते तेव्हा ती खाण्यावरही गाण्याइतकेच प्रेम करते! नॉनव्हेज प्रेमाने खाते! डोशावर सारस्वती पध्दतीने मध भरपूर ओतून डोसा चवीने खाते. चवीने खातात ते चवीचे जीवन जगतात हेच खरे! पद्मजाचे जीवनच एखाद्या सुग्रास मेजवानीसारखे आहे! खरे तर, तिचे जीवन ही एक मैफल आहे! पद्मजाचा जन्म गळ्यात देवदत्त स्वर घेऊन कलावंत क्रमश:

टायपोग्राफी डे आणि शांताराम पवार

सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अँप्लाईड आर्ट व आयडीसी-आयआयटी (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने 27 व 28 फेब्रुवारी 2010 रोजी ‘टायपोग्राफी अँड आयडेंटिटी’ या विषयावर नॅशनल कॉन्फरन्स व वर्कशॉप आयोजित केले गेले होते. शनिवारी सकाळी जे.जेच्या आवारात पसरलेल्या कागदांवर सामूहिक रीत्या विविध भारतीय लिप्यांमधील अक्षरे रंगवण्यात आली. या ‘हॅपनिंग’नंतर कॉन्फरन्सचे बीजभाषण, बोधचिन्हांसाठी प्रसिद्ध असलेले सुदर्शन धीर यांनी केले. दुपारच्या सत्रात मुद्राक्षरतज्ञ महिंद्र पटेल यांचे भाषण झाले. दोन्ही सत्रांमध्ये सादर करण्यात आलेले पेपर्स अक्षररचना, विविध क्रमश:

Pages