अरण गावचे हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय

अज्ञात 11/08/2016

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अरण येथील ‘हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालया’ची स्थापना एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दिवशी, शनिवार, १ जानेवारी २००० रोजी करण्यात आली. ग्रंथालयामध्ये नऊ हजार पुस्तके आहेत. वाचनालयाने सुरुवातीपासून वाचकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. वाचनालयाच्या वतीने १८ एप्रिल २००३ या दिवशी पुस्तकप्रेमी अरणभूषण हरिभाऊ नाना शिंदे यांची ग्रंथतुला करण्यात आली. ती सोलापूर जिल्ह्यातील पहिली ग्रंथतुला असल्याचे त्यावेळी बोलले गेले. वाचनालय ‘ब’ वर्गात आहे.

वाचनालयाने वाचकांना पुस्तके, नियतकालिके व वृतपत्रे उपलब्ध करून देण्याबरोबर विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम योजले. वाचनालयाने ग्रंथप्रदर्शन, काष्ठशिल्प प्रदर्शन, नाना स्पर्धा, मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, गुणवंतांचे सत्कारसोहळे; तसेच, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करून व वाचनालयाच्या वतीने इंटरनेट सेवा उपलब्ध करून देऊन ग्रामस्थांच्या मनामध्ये आस्थेचे स्थान निर्माण केले आहे.

वाचनालयाच्या वतीने ग्रंथालय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने ‘रणजितसिंह मोहिते-पाटील आदर्श ग्रंथालय’, ‘ग्रंथालय सेवक’, ‘ग्रंथालय कार्यकर्ता’ व ‘साहित्य पुरस्कार’ देण्यास २००४ पासून सुरुवात झाली आहे. हे पुरस्कार २००४ या वर्षी  जिल्हा पातळीवर देण्यात आले, ते २००५ या वर्षी पुणे विभागीय पातळीवर देण्यात आले, तर २००६ या वर्षापासून प्रत्येक वर्षी राज्यपातळीवर देण्यात येत आहेत. पुरस्कार वितरणाच्या सातत्यपूर्ण दिमाखदार सोहळ्यांमुळे अरणच्या ‘हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालया’ची ओळख राज्यभर निर्माण झाली आहे.

विलास शहा - कथा त्र्याऐंशी वर्षांच्या तरुणाची!


सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण वाचनालय चळवळीचे अध्वर्यू , कत्तलखान्याला निघालेल्या  तब्बल सतरा लाख मुक्या पशूंना त्यांच्या ‘टीम’च्या सहकार्याने जीवनदान देणारे गांधीवादी समाजसेवक, साने गुरुजींच्या सहवासात राहून 'राष्ट्र सेवा दला'चे विचार नसानसात भिनलेला कार्यकर्ता आणि खायच्या अन्नाची व गुंडाळायला कपड्यांची भ्रांत असणा-या देशातील गरिबांची पदोपदी आठवण राहवी म्हणून दररोज एकदाच अन्न घेणारा व वर्षातून केवळ चार पांढ-या बंड्या व पायजमे ही त्यांनी स्वत:ला घालून दिलेली मर्यादा... शिवाय, पदोपदी त्यांच्यातील धावून जाणारा लोकसेवक. शब्द कमी पडतील अशी ही ओळख!

जिल्हा सोलापूर. त्यात माढा नावाचे आटपाट गाव. विलास शिवलाल शहा हे या युवकाचे नाव. वय अवघे त्र्याऐंशी वर्षांचे! तुम्ही त्यांच्या वयावर जाऊ नका. कसलाही काठीचा आधार नाही, विश्रांती नाही, कोठली व्याधी नाही की कोठला आजार नाही. तरुणपणाचा तोच ठणठणीतपणा आणि तीच उमेद.

गोवत्स बारसेला जन्मदिन (२६ ऑक्टोबर १९३२) असणारा हा देवमाणूस गाई-गुरांच्या आयुष्यात जीवनदाता बनून पुढे यावा हा महाराष्ट्रातील समाजसेवेच्या इतिहासातील किती मोठा योगायोग असावा! त्यांचा जन्म माढ्यात पण त्याच तालुक्यातील लव्हे हे त्यांचे आजोबा रामचंद शहा यांचे मूळ गाव. लव्ह्याच्या शेकडो एकर जमिनी रामचंदभाईंना पूर्वजांच्या सावकारीतून मिळाल्या होत्या. मात्र विलासभाईंचे वडील शिवलाल यांनी सगळ्या जमिनी गरीब शेतक-यांना परत केल्या! पुढे, शिवलाल शहा माढ्याला स्थायिक झाले व तेथे १९२८ सालापासून कापडविक्रीचा व्यापार करू लागले. प्रामाणिकपणा व अल्प नफा आकारून, घासाघीस न करता 'एकच भाव' तत्त्वाने व्यवहार सुरू ठेवला. त्यामुळे त्यांना पंचक्रोशीत ‘एकबोले’ या नावाने ओळखले जाऊ लागले. व्यवसायाची तीच प्रामाणिक परंपरा विलासभाई यांचे पुत्र विकास, विशाल व विवेक यांनी पुढे चालू ठेवली आहे. 

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान

अज्ञात 22/06/2015

मन, मनगट, मेंदू - तीन मकारांचा 'उत्कर्ष'!

'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान' म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सातत्याने दुष्काळी असणा-या सांगोला तालुक्यात महिलांनी उभी केलेली समाज परिवर्तनाची चळवळ. या महिलांजवळ आहे अंत:प्रेरणा, तळमळ आणि जिद्द. शिक्षण, आरोग्य, अन्याय-अत्याचाराविरुद्ध संघर्ष, आर्थिक स्वावलंबन आणि पर्यावरण साक्षरता या पंचसूत्रीच्या साहाय्याने ग्रामीण समाजाच्या विकासासाठी संस्थेचे कार्य 1979 पासून सुरू आहे.

माणगंगाकाठचा पायी प्रवास : शोध आणि बोध


आम्ही वर्षानुवर्षे वाहणा-या माणगंगेच्या वास्तवात झालेल्या बदलाचे गेल्या पन्नास-साठ वर्षाचे साक्षीदार आहोत. त्यातून माणगंगेचा पायी प्रवास करून, पाहणीतून काही निष्कर्ष काढले. माणगंगा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील माण-दहिवडी तालुक्यातील कुळकजाई या गावच्या परिसरातील डोंगररांगातून होतो. माणगंगा एकशेपासष्ट किलोमीटर लांबीच्या पात्रातून वाहते. ती भिमा व कृष्णा या नद्यांची उपनदी आहे. ती सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतून वाहते. माण नदीच्या परिसराला माणदेश म्हणून ओळखले जाते. एकशेपासष्ट किलोमीटरच्या अंतरात असणारी गावे, मनुष्य-प्राणी, पशू, पक्षी, निसर्ग, शेती आणि पर्यावरण यांचा समतोल माण नदीवर अवलंबून आहे. माण नदीच्या अस्तित्वावर आम्हीच संकट आणले आहे. त्यामुळे माणदेशावर वारंवार येणारी संकटे ही अस्मानी आणि सुलतानी, अशा दोन्ही प्रकारची आहेत.

तळेगाव-दाभाडे ‘ब्रेन स्टार्मिंग’ सेशन


('सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या डिसेंबर 2014 मध्‍ये राबवण्‍यात आलेल्‍या मोहिमेच्‍या पार्श्‍वभूमीवर तळेगाव-दाभाडे येथे फेब्रुवारी 2015 मध्‍ये 'ब्रेनस्‍टॉर्मिंग सेशन' आयोजण्‍यात आले. त्‍या चर्चेचा हा वृत्‍तांतवजा लेख.)

 

संस्कृती हा शब्द गोंधळात टाकणारा आहे, परंतु तद्विषयक दोन दिवसांची तळेगावच्या मैत्रबनातील चर्चा त्या संकल्पनेबाबत बरीचशी स्पष्टता आणणारी ठरली. चर्चेसाठी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांतील बेचाळीस प्रतिनिधी जमले होते. चर्चा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलने ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेचा आढावा घेण्यासाठी योजली होती. स्वाभाविकच, प्रतिनिधींमध्ये सोलापूर जिल्ह्यातील आणि मुंबई-पुण्याकडील मंडळींचा भरणा अधिक होता. मार्गदर्शन करण्यासाठी अरुणा ढेरे, दिलीप करंबेळकर, वैजयंती बेलसरे, अरुण खोरे असे विषयतज्ज्ञ होते.

चर्चेला पार्श्वभूमी म्हणून अतुल तुळशीबागवाले, यश वेलणकर, दिलीप करंबेळकर व दिनकर गांगल यांची टिपणे सर्व सहभागींना पाठवली होती. त्यामध्ये युरोपमधील ‘रिनेसान्स’च्या धर्तीची ज्ञानप्रकाश चळवळ व विवेकी विचारपद्धत या दोन गोष्टींवर ढोबळपणे भर होता. ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेमधील माहिती संकलन, जनजागरण व संस्कृतिविषयक विचारविनिमय यांबाबतची माहितीही सहभागींमध्ये आधी प्रसृत केली होती. चर्चेचा रोख अभिजन संस्कृती व बहुजन संस्कृती यांचा मेळ शक्य आहे का यावर होता.

मेळघाटातील पोषणबागांचा माळी - मनोहर खके


पोषण बागेद्वारे कुपोषणावर मात करण्याचा अनोखा प्रयोग

 

मनोहर खकेमेळघाटातील कुपोषण हटवण्याच्या व तेथील जनतेच्या विकासाच्या कार्याला आपापल्यापरीने दिशा देण्याचे काम व्यक्तीगत पातळीवर काही लोकांनी केले आहे. त्यात पुण्यातील कृषितज्ज्ञ डॉ. मनोहर खके यांचा अनोखा शेती प्रयोग उल्लेखनीय आहे.

विदर्भातील मेळघाट हा परिसर गेली कित्येक वर्षे गाजतोय तो तेथील कुपोषणाच्या समस्येमुळे. कुपोषणाचा संबंध नेहमी आरोग्य व गरीबीशी तसेच साधनांच्या अभावाशी जोडला जातो. पण मेळघाटात त्या जोडीला इतरही अनेक समस्या असल्याने हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.

मेळघाट
 
विदर्भात सातपुड्याच्या पर्वतरांगांतील विविध घाटांचा मेळ! धारणी, हातरू, बैरागड, हिराबंबई, रुई पठार इत्यादी भाग मेळघाटात येतात. थंड हवेचे ठिकाण म्हणून विदर्भात प्रसिद्ध असलेले चिखलदरा हे देखील मेळघाटातच आहे. घनदाट जंगलांनी वेढलेला तो परिसर व्याघ्रप्रकल्पांतर्गत अभयारण्य म्हणून घोषित झालेला आहे. ‘कोरकू’ ही तेथील वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी जमात व भाषासुद्धा. त्याशिवाय, गोंड, कोलाम यांसारख्या जमातीदेखील त्या भागात आहेत. सिपना व खंडू नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या मेळघाटातील आदिवासी लोक मुख्यत: शेती व जंगल संपत्तीवर गुजराण करतात. ते लोक त्यांची प्राचीन संस्कृती जपून आहेत.

अत्यंत विषम व तीव्र हवामान हे मेळघाटचे आणखी एक वैशिष्ट्य. थंडीत पाच अंश तर उन्हाळ्यात पंचेचाळीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान आणि पावसाळ्यात धुवांधार पर्जन्यवृष्टी व पूर असे टोकाचे निसर्गाविष्कार मेळघाटवासीयांना नित्याचे. अशा प्रतिकूल परिस्थितीच्या जोडीला दळणवळण व संपर्क साधनांचा अभाव, शैक्षणिक व आरोग्य सुविधांची कमतरता, दूर दूर अंतरावरील आदिवासी गाव/पाडे, अंधश्रद्धा व शासकीय पातळीवरील अनास्था यांमुळे मेळघाट वर्षानुवर्षे कुपोषणाच्या समस्येने ग्रस्त आहे.

अशी असावी शाळा!

अभय बंग 05/01/2015

अमृत बंगसोबत अभय बंग आणि राणी बंगशिक्षण व शाळा कशा असाव्यात याबाबत निर्णय करण्याचा अधिकार कोणाचा? सध्या, तो अधिकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नाही. तो शिक्षक-शाळांचे चालक-शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण खात्यातील नोकरशाही यांच्या हातात पूर्णपणे एकवटला आहे. त्यांची शिक्षणावर एकाधिकारशाही आहे. ते पुरवतील तो माल, तेच शिक्षण मुकाट्याने घेतल्याशिवाय विद्यार्थी व त्यांचे पालक यांना गत्यंतर नाही. शाळा व शिक्षण हे पुरवठा करणाऱ्यांच्या मर्जीने व हितासाठी चालत आहेत, मग ते कसे बदलणार?

आमच्या घरी एक छोटासा प्रयोग घडला. घडला यासाठी म्हणतो, की तो जाणून-बुजून, योजनाबद्ध रीत्या नाही केला. तो घडला. आमचा छोटा मुलगा अमृत सध्या आठवीत आहे. त्याने पहिलीपासून शाळेत जाण्याप्रती नावड दाखवली; विद्रोहच पुकारला. सुदैवाने, त्याच्या शाळेचे शिक्षक व शिक्षणाधिकारी यांनी त्याच्या बाबतीत अपवाद करून, त्याने वाटल्यास घरीच अभ्यास करावा, पण परीक्षा मात्र शाळेत द्याव्या अशी व्यवस्था मान्य केली. त्यामुळे अमृतचे आठवीपर्यंतचे बहुतेक शिक्षण घरी झाले. तो फार कमी दिवस शाळेत जातो. त्याला कोणतीच शिकवणी लावली नाही. तो स्वत:च शाळेच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम घरी पूर्ण करतो. पण परीक्षांमध्ये सहसा जिल्ह्यातून पहिला येतो. त्यामुळे त्याचे शिक्षक व शाळा त्याला दिलेली मोकळीक सार्थ मानत. मित्रांची आठवण आली, क्रिकेट खेळावेसे वाटले, शाळेत स्नेहसंमेलन असले, की त्या दिवशी तो शाळेत जातो. अन्य दिवशी त्याची स्वत:ची शाळा तो स्वत: घरी भरवतो. त्याचे कारण तो असे द्यायचा, की “शाळेत सहा-आठ तासांत जे शिकवतात ते मी घरी दोन तासांत शिकतो. मग सहा तास मला इतर सर्व गोष्टी करायला वेळ मिळतो. मग मी शाळेत का जाऊ?”  शाळेचे ओझे नसल्याने अवांतर वाचन, छंद, जिज्ञासा, खेळ, कला या सर्व गोष्टींसाठी त्याला भरपूर वेळ मिळतोदेखील. त्याचे बालपण हेवा वाटण्यासारखे आहे.

वंदना करंबेळकर : समाजसेवेतील आनंद

अज्ञात 28/07/2014

वंदना करंबेळकरवंदना करंबेळकर या, ‘त्यांनी स्वार्थापोटी समाजसेवेचा मार्ग पत्करला’ असे प्रामाणिकपणे व नि:शंकपणे सांगतात! त्या म्हणाल्या, की  स्वत:साठी आनंद मिळवणे हा माझा स्वार्थ आहे आणि तो आनंद मिळवण्यासाठी मी जे उपद्व्याप करते त्याला जर का कोणी ‘समाजसेवा’ म्हणत असेल, तर तो त्याचा प्रश्न आहे. त्याला रोखणारी मी कोण? वंदना अशा शेलक्या शब्दांत ‘समाजसेवेची झूल’ पांघरण्यास नकार देतात. त्यातच वंदना यांचे वेगळेपण उठून दिसते.

वंदना करंबेळकरत्यांनी कोकणच्या सावंतवाडी परिसरात ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी निरामय विकास केंद्राच्या माध्यमातून कार्य चालवले आहे. सामाजिक प्रवाहापासून दूर गेलेल्या सावंतवाडीतील लाखे समाजासाठी त्यांच्या वस्तीवर जाऊन करत असलेले कार्य, मुलांसाठी बालदरबार, ग्रामीण भागातील मुलींसाठी जीवनकौशल्य वर्ग, शाळेतील मुलांसाठी सुंदर मन घडवण्याकरता पुस्तक प्रदर्शने, जबाबदार पालकत्व, शारीरिक आरोग्यजागृती इत्यादी योजना...  असे बहुविध कार्यक्रम वेळोवेळी हाती घेत वंदना जवळपास पाच ते सहा हजार मुलांपर्यंत पोचल्या आहेत. त्यांचे कार्य प्रसिद्धीपासून चार हात दूर राहत केलेले असते. त्यांनी त्यांचा टार्गेट ग्रूप ‘सहा ते सव्वीस’ या वयोगटातील मुले-मुली हा निवडला आहे. त्यांनी त्यांच्या कार्याचा फोकस प्रबोधन करणे, विचार देणे, ज्ञान देणे व आनंदी प्रवृत्तीने जगणे यावर ठेवला आहे.

वंदना श्रीकृष्ण करंबेळकर या पूर्वाश्रमीच्या घाणेकर. त्यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेत पंचवीस वर्षे सेवा बजावली. नंतर त्यांनी त्यांच्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले. कारण काय तर, ‘आत्मिक समाधान मिळवण्या’साठी! मग त्यांनी समाजसेवेस वाहून घेतले. त्यांचा तो निर्णय अचूक ठरला. त्यांचे कामही जिद्दीने झाले व त्यामुळे त्यांच्या कार्याच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात ग्रामीण भागातील घराघरात पोचलेले असे ते अभ्यासू व्यक्तिमत्त्व ठरले!

वैशाली रुईकर - आपली फ्लॉरेन्स नाइटिंगेल


वैशाली रुईकर - आपली प्लॉरेन्स नाइटिंगेल सिस्टर वैशाली रुईकर हे नाव मनात घर करून बसले आहे. त्या एका कार्यक्रमात भेटल्या. वैशाली मूळ कागलच्या. एकत्र कुटुंबातील बालपण. आईचे छत्र लवकर नाहीसे झाले. वडील जुन्या काळातील वैद्य, अनेक रुग्णांच्या वेदना दूर करणारे; त्यांना पाहत वैशाली वाढल्या. एकदा वैशालींचा एकुलता एक भाऊ तापाने फणफणला. वडिलांनी औषधोपचार केले. दुस-या डॉक्टरांचे मत घेतले पण उतार पडला नाही. शिरेतून इंजेक्शन देण्यासाठी नर्सला बोलावले पण ती वेळेवर येऊ शकली नाही आणि त्यांच्या भावाचे निधन झाले! त्या घटनेचा वैशाली यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. नर्स वेळेवर आली असती तर भाऊ वाचला असता असे त्यांच्या मनाने घेतले आणि त्यांचे नर्स होण्याचे पक्क ठरले. पण घरून तीव्र विरोध झाला. त्यांना अनेक कारणे सांगून त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांच्या ‘ठाम’ निर्णयापुढे कोणाचे काही चालले नाही. त्या ‘घटप्रभेला’ नर्सिगसाठी दाखल झाल्या. त्यांचा तीन वर्षांचा शिक्षणक्रम पूर्ण झाल्या झाल्या विलास रुईकर यांच्याशी विवाहबद्ध होऊन, त्या त्यांच्या ड्रेसिंग किटसह पुण्यात हडपसरला आल्या. काही दिवस एका हॉस्पिटलमध्ये नोकरी केली, पण त्यांचे ध्येय स्वतंत्र नर्सिग प्रोफेशन करायचा हे होते आणि म्हणून त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. परिसरातील लोकांना त्या ड्रेसिंग करणे, कॅथेटर लावणे, एनिमा देणे, इंजेक्शन देणे अशी मदत करू लागल्या. त्यांनी चिघळलेल्या जखमांचे ड्रेसिंग करणे किंवा गँगरिनने त्रस्त झालेल्या रुग्णांचे ड्रेसिंग करणे हे कष्टप्रद आव्हानदेखील सहज पेलले. त्या ‘बेडसोर्स’ ब-या करणा-या सिस्टर म्हणून पुण्यात परिचित आहेत.

अंधांच्या वाचनासाठी कार्यरत


सुखदा पंतबाळेकुंद्रीअंधांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्य वाचायला मिळावे यासाठी धडपडणाऱ्या ठाण्याच्या सुखदा पंतबाळेकुंद्री, पुण्‍याचे उमेश जेरे आणि त्यांच्या तीनशेहून अधिक सहकाऱ्यांनी मराठीतील तीनशेहून अधिक पुस्तकांचा खजिना ब्रेलमध्ये रूपांतरित केला आहे. त्या साहित्याला आणि अभ्यासाला पूरक अशा मराठी ते मराठी या शब्दकोशाचेही रूपांतर ब्रेलमध्ये करण्यात आले आहे.

सुखदा पतबाळेकुंद्री आणि उमेश जेरे हे दोघे मुंबई-पुण्‍यात आपापल्‍या परिने अंधांसाठी मराठीतील साहित्‍य ब्रेलमध्‍ये आणण्‍याचे काम करत होते. कामाच्‍या ओघात दोघांचा परस्‍परांशी संपर्क झाला. उमेश जेरे पुण्‍यातून तर सुखदा मुंबईतून काम करत आहेत. त्‍यांनी मोठ्या प्रमाणात बालसाहित्‍य ब्रेलमध्‍ये आणले आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या कामाचा रोख मोठ्यांसाठीची पुस्‍तके ब्रेलमध्‍ये आणण्‍याकडे वळवला आहे.