समाजमाध्यमे आणि मी


_Samajmadhyam_Aani_Mi_1.jpgलेखन आणि संगणक या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यात एकाच वेळी आल्या. मी पहिली कविता इयत्ता सहावीत असताना लिहिली. संगणक त्याच वर्षी शाळेत आले. ती घटना १९८९-९० सालची. माझा इंटरनेटशी परिचय झाला, ते साल १९९९चे. मला याहू चॅटिंग, हॉटमेल, याहू ग्रूप्स, हिंदी-इंग्रजी साहित्याची काही संकेतस्थळे त्याच वर्षी माहीत झाली. ऑर्कूट पुढे सुरू झाले, नंतर हायफाइव्ह. त्याच वेळी लिंकडइन आले. मग इतरही सोशल साइट्स येत गेल्या. मी त्यांच्यावर खाती उघडत गेलो - अगदी ट्वीटरपासून इन्स्टाग्रामपर्यंत, पण रमलो ते फेसबुक आणि व्हॉट्सॲप या दोन स्थळांवर. मला ती दोन्ही माध्यमे वापरण्यासाठी सोयीची व सोपी वाटली.