इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर

ऊर्जाप्रबोधक - पुरुषोत्तम कऱ्हाडे

आयुष्यात काही अनवट वाटा धुंडाळताना स्वत:चे संस्कार व बौद्धिक शक्ती यांचे संमीलन करून त्याचा उत्कृष्ट परिपोष करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरुषोत्तम कऱ्हाडे होय! कऱ्हाडे इलेक्ट्रिकल इंजिनीयर असून त्यांना ‘ऊर्जा’ या विषयामध्ये विशेष आस्था आहे. त्यांनी सौर ऊर्जा व ऊर्जासंवर्धन यांवर बराच अभ्यास केला असून ते ऊर्जाप्रबोधनाचे कार्य करत असतात. पुरुषोत्तम कऱ्हाडे मूळ अंबाजोगाईचे, त्यांचे बालपण तेथेच गेले व माध्यमिक शिक्षणही तेथेच झाले. त्यामुळे त्यांना अंबाजोगाई गावाचा आध्यात्मिक, धार्मिक व शैक्षणिक वारसा लाभला आहे. ती शांतता व ते समाधान त्यांना जीवनकार्यात क्रमश: