कल्‍याण तालुका

काका हरदास - वर्तुळ पूर्ण झाले!

काका व कल्याण शहर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काका हरदास यांच्या समाजजीवनाचा प्रारंभ अर्धशतकापूर्वी झाला. पंचविशीत असलेले काका म्हणजे ऊर्जेचा प्रचंड स्रोत होता. त्‍यांनी वयाचा अमृतमहोत्सव ओलांडला, तरी त्यांची ऊर्जा तशीच ‘तरुण’ आहे. काका हरदास यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये दोन आहेत. एक तर ते संवेदनशील आहेत व दुसरे म्हणजे ते खंबीर आहेत. मात्र त्यांच्या संवेदनशीलतेला भाबडेपणाचा स्पर्श नाही आणि त्यांच्या खंबीरपणाला ‘सुजाण’पणा लाभला आहे. त्यामुळे ते सामाजिक काम करत असताना कार्यनाश होणार नाही याची दक्षता प्रथम घेतात. काका ज्या क्रमश:

दिलीप दोंदे यांचा सागर पृथ्‍वी...

वर आकाश- खाली पाणी. क्षिति़ज पराकोटीचं दूर. नजर पोचेल तिथं पाणीच पाणी. ह्या किंतानावर सतरा मीटर लांब, पाच मीटर रूंद आणि पंचवीस मीटर उंच डोलकाठी, अशी शिडाची होडी. त्यावर एक माणूस. कामात सतत दंग. खाण्या-चघळण्यासाठी मध्येच काहीतरी तोंडात टाकतो. आकाशाकडे बघतो. दूर क्षितिजाकडे नजर टाकायचा प्रयत्न करतो. त्याची होडी समुद्रात भरकटली तर नाही ना! तसं नसावं. कारण त्याच्या हालचालींत आत्मविश्वास दिसतो. समुद्र शांत आहे. तो कुकरमध्ये तीन भांडी लावतो, हसतो. दोन-तीन दिवसांनी झकास साग्रसंगीत जेवण घेऊया असा बेत मनात आखतो. छान संगीत लावतो. स्वारी आनंदात आहे. तो मानेमागे हात गुंफून थोडा क्रमश: