स्किझोफ्रेनिया

मानसिक आजार - माणुसकीची गरज

प्रकृतीमध्ये काही कारणाने विकृती निर्माण होणे ही नैसर्गिक घटना होय. विकृती म्हणजे आजार. माणसाच्या बाबतीत आजार दोन पातळ्यांवर उद्भवतात. एक म्हणजे शारीरिक आजार आणि दुसरा प्रकार म्हणजे मानसिक आजार. शारीरिक आजारांची कारणे विज्ञानामुळे मानवाला चांगली परिचित झाली आहेत. त्यामुळे रूग्णाबद्दल सहानुभूती वाटणे, त्याला समजून घेणे, दिलासा देणे, सेवाशुश्रूषा करणे आणि सर्व प्रकारची मदत करणे या गोष्टी माणसांकडून घडतात. शरीर-आजारी रूग्णाबद्दल माणसांना वाटणारी सहानुभूती आणि आत्मीयता यांमुळे माणसे त्या रूग्णासाठी काहीतरी करण्यास प्रवृत्त होतात. समाजाकडून आणि शासनाकडूनही शारीरिक- क्रमश:

स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (...

पुण्याची 'सा' ही संस्था स्किझोफ्रेनिया व इतर मानसिक आजार यांच्यासाठी काम करते. [स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA)] कॅनडाचे रहिवासी डॉ. जगन्नाथ वाणी यांनी १९९७ साली त्या संस्थेची स्थापना केली. 'सा'ची सेवाभावी संस्था म्हणून अधिकृत नोंदणी १९९८ मध्ये झाली. जगन्नाथ वाणी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कॅनडातील कॅलगरी येथे स्किझोफ्रेनियासाठी संस्था प्रथम स्थापन केली. भारतातही अनेक लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत, परंतु त्या आजारांविषयीची जाणीवजागृती समाजात कमी असल्यामुळे व त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था फारशा अस्तित्वात नसल्यामुळे आजारी क्रमश: