उद्योजक गौरी चितळे : क्षमता आणि जिद्द यांचा समन्वय
30/03/2016
गौरी चितळे माहेरच्या स्मिता लोंढे! त्यांचे शिक्षण दहावी पास, एवढेच. त्यांनी आईवडिलांना आर्थिक मदत म्हणून नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून हॉस्पिटलमध्ये नोकरी स्वीकारली. त्यांचे गाव सुधागड तालुक्यात आहे. त्या खेडेगावातून खोपोली येथे नोकरीसाठी ये-जा करत असत. त्यांनी सज्ञान होण्याआधीच घराची थोडी जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यांच्या क्षमता आणि जिद्द दोन्ही गुणांत आत्मनिर्भरतेचे बीज आहे. त्या गुणांच्या बळावरच त्यांनी स्वतःच्या उद्योगाची सुरूवात केली.