होलिकोत्सव
22/03/2016
होळी हा लोकोत्सव होय. तो वर्षाच्या मासातील अंतिम उत्सव. या उत्सवाची होलिकोत्सव, धुलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजेच होळी, धुळवड व रंगपंचमी अशी स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी तो एकत्रितरित्या साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत या पाच सहा दिवसांत हा उत्सव काही प्रांतात दोन दिवस तर काही ठिकाणी पाच दिवससाजरा केला जातो. होळीच्या दुस-या दिवशी धुलीवंदन (धूळवड) साजरी केली जाते तर पाचव्या दिवशी रंगपंचमी.