मुंबई व उपनगर

मुंबई व उपनगर

ऊर्जाप्रबोधक - पुरुषोत्तम कऱ्हाडे

आयुष्यात काही अनवट वाटा धुंडाळताना स्वत:चे संस्कार व बौद्धिक शक्ती यांचे संमीलन करून त्याचा उत्कृष्ट परिपोष करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरुषोत्तम कऱ्हाडे होय! कऱ्हाडे इलेक्ट्रिकल इंजिनीयर असून त्यांना ‘ऊर्जा’ या विषयामध्ये विशेष आस्था आहे. त्यांनी सौर ऊर्जा व ऊर्जासंवर्धन यांवर बराच अभ्यास केला असून ते ऊर्जाप्रबोधनाचे कार्य करत असतात. पुरुषोत्तम कऱ्हाडे मूळ अंबाजोगाईचे, त्यांचे बालपण तेथेच गेले व माध्यमिक शिक्षणही तेथेच झाले. त्यामुळे त्यांना अंबाजोगाई गावाचा आध्यात्मिक, धार्मिक व शैक्षणिक वारसा लाभला आहे. ती शांतता व ते समाधान त्यांना जीवनकार्यात क्रमश:

ज्येष्ठराज जोशी – जगातील शंभर...

प्रा.ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचे नाव भारतातील नामवंत रसायन अभियंत्यांमध्ये सन्मानाने घेतले जाते. ज्येष्ठराज हे उत्तम शिक्षक व तसेच संशोधक आहेत. ते रासायनिक कारखाने चालवताना येणा-या अडचणी सोडवण्यासाठीचे उत्तम मार्गदर्शक आहेत आणि उत्तम व्यवस्थापकही आहेत. त्यांच्या ठायी रसायन विद्या व तिची उपयोगिता या संदर्भात एवढे गुण आहेत! स्वाभाविकच, जोशी यांच्याकडून रसायन अभियांत्रिकीमध्ये विविध स्वरूपाचे मोठे कार्य घडून आले आहे. त्याबद्दल ज्येष्ठराज यांची 'अमेरिकन केमिकल सोसायटी’ने २००७ सालापूर्वीच्या चाळीस वर्षांतील शंभर उत्कृष्ट संशोधकांत गणना केली. भारत सरकारने क्रमश:

साहित्य सम्राट न.चिं. केळकर...

ग्रंथालयांचे, वाचनालयांचे अस्तित्व हे शहरात सांस्कृतिकपणा जिवंत असल्याचे लक्षण असते. त्यात ते ग्रंथालय दुर्मीळ संदर्भग्रंथांनी समृद्ध असेल तर मौल्यवान पाचू, माणके, हिरेच त्या शहराने निगुतीने सांभाळून ठेवले आहेत असे समजावे. मुंबईतील मुलुंड हे उपनगर सांस्कृतिकदृष्ट्या असे सुसंस्कृत आणि श्रीमंत आहे. मुलुंडमध्ये मोठी म्हणावी अशी तीन ग्रंथालये आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्र सेवा संघा’चे ‘साहित्य सम्राट न.चिं. केळकर ग्रंथालय’. ‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ ही मुंबईच्या पूर्व उपनगरात सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली एकोणऐंशी क्रमश:

नीळकंठ श्रीखंडे - भारताच्या...

मुंबईचे ज्येष्ठ अभियंता, कन्सल्टिंग इंजिनीयर नीळकंठ श्रीखंडे हे भारताच्या अभियांत्रिकी विश्वातील कर्तृत्ववान व जबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या न्यायी, शांत, विनम्र व मितभाषी स्वभावाने अनेक चांगली माणसे जोडली. ते वयाच्या सत्‍त्‍याऐंशीव्या वर्षीही उत्साहाने व हिरिरीने नव्या गोष्टींना सहज सामोरे जातात. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व सांगीतिक क्षेत्रांतही भरीव कार्य केले आहे. त्यामुळे त्या माणसात यंत्र आणि संस्कृती एकत्र नांदते असे म्हणतात. नीळकंठ श्रीखंडे यांनी डिझाइन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, उड्डाणपूल, निवासी क्रमश:

मनश्री सोमण - अंधारवाटेवरील...

जन्मत: अंध असलेल्या मनश्री सोमणची बोटे हार्मोनियम-सिंथेसायझरवर सराईतासारखी चालतात! ती त्या जोडीला गाऊ लागली, की ऐकणारा मनुष्य मंत्रमुग्ध होऊन जातो. गाणे हा मनश्रीचा श्वास आहे. ती कला हे तिचे वैशिष्ट्य तर आहेच, मात्र ती आत्मसात करताना मनश्रीने स्वतःच्या अंपगत्वावर केलेली मात आदर्शवत आहे. तिचा दुर्दम्य आत्मविश्वास तिला वयाच्‍या चोवीसाव्‍या वर्षातच मोठेपण प्राप्त करून देणारा ठरला आहे. मनश्री इतरही काही शारीरिक व्यंगे घेऊन जन्माला आली. मात्र तिच्या ठायी असलेल्या तल्लख बुद्धिमत्ता, हुशारी व नवीन शिकण्याची आवड अशा गुणांनी त्या उणिवा भरून काढल्या आहेत. तिने क्रमश:

ज्योती पंडित यांचा पाचवारी पसारा

साडी हा स्त्रियांचा हळवा कोपरा. तो पेहेराव चापून-चोपून साडी नेसणा-या पारंपरिक प्रौढांपासून ते साडी ‘ड्रेप’ करणा-या अत्याधुनिक राहणीमानाच्या मुलीपर्यंत सर्वांना खुणावत असतो. साडी दैनंदिन वापराच्या मराठी वस्त्रप्रावरणांतून हद्दपार झाली आहे, तरी तिचे भावनिक वास्तवात मूल्य कायम आहे. त्या भांडवलाच्या जोरावर ज्योती पंडित यांच्या साडी व्यवसायाचा डोलारा उभा राहिला आहे! ज्योती पंडित दादरच्या त्यांच्या राहत्या घरी साडीविक्रीचा व्यवसाय बावीस वर्षें करत आहेत. त्यांचा प्रवास नोकरी करणारी सामान्य स्त्री ते एक स्वतंत्र उद्योजक असा आहे. “‘माझ्या नोकरीला तळवलकर्स क्रमश:

डॉ. राजेंद्र बडवे - आनंदी कॅन्सर...

'कर्करोगा'च्या हजारो रुग्णांना संजीवनी देऊन त्यांचा आजार केवळ बरा करणारे नव्हे; तर कोलमडून पडलेल्या काही रुग्णांना फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेण्याचे बळ देणारे धन्वंतरी म्हणजे पद्मश्री डॉ. राजेंद्र बडवे! बडवे हे आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेले कुशाग्र संशोधक आणि निष्णात शल्यवैद्यक (सर्जन) आहेत. त्यांनी स्तनांच्या कर्करोगावर केलेल्या संशोधनामुळे त्या आजाराने होणाऱ्या मृत्यूचा दर पंचवीस टक्क्याखाली घटला. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे UICC तर्फे २००३ साली Reach to Recovery International Medal मुंबई मेडिकल क्रमश:

संतोष हुलावणे आणि त्‍याचा...

मुंबईतील गोरेगाव येथे राहणाऱ्या व हार्डवेअर नेटवर्क इंजिनीयर असलेल्या संतोष हुलावले या पस्तीस वर्षांच्या तरुणाने भारतातील पहिला साडेसहा फुटी ह्युमेनॉइड रोबोट बनवण्याची किमया केली आहे! ‘इंड्रो’ची उंची साडेसहा फूट असून, तो पंचावन्न किलो वजनाचा आहे. त्याची वजन उचलण्याची क्षमता दीडशे किलोपर्यंत आहे. त्याला बनवण्यासाठी वीस लाख रुपयांचा खर्च आला. ‘इंड्रो’ची निर्मिती ही वर्कशॉप वा लॅबोरेटरी येथे झालेली नाही, तर अवघ्या शंभर फुटांच्या खोलीमध्ये ह्युमेनॉइड रोबोट साकार केला गेला. स्क्रू-ड्रायव्हर, सोल्डर मशीन, हॅण्ड कटर, हातोडी, वेगवेगळ्या पकडी अन चार-पाच क्रमश:

भाजीपाल्याचे वाळवण – शेतकऱ्यासाठी...

वैभव तिडके, डॉ. शीतल सोमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सोलर कंडक्शन ड्रायर’ हे भाजीपाला वाळवून तो टिकवून ठेवण्याचे साधन विकसित केले आहे. भाजीपाला आणि अन्नधान्य खराब होऊन वाया खूप जाते. त्यासाठी ते साठवून ठेवण्याचे किफायतशीर साधन आहे ते. भाजीपाला टिकवता आला तर मध्यम आणि लहान शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशा विचाराने प्रेरित होऊन वैभवने ते काम साधले. वैभवने मुंबईच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’(ICT) मधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्याच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘सायन्स फॉर सोसायटी’ या संस्थेत डॉ. शीतल सोमाणी, डॉ.शीतल क्रमश:

अनुराधा प्रभुदेसाई यांचे कारगिल ‘...

अनुराधा प्रभुदेसाई. मध्यम वयाच्या. चुणचुणीत. स्मार्ट. चेहऱ्यावर व एकंदर देहबोलीत आत्मविश्वास. त्या जे बोलल्या त्यात उत्कटता होती, कारण त्या जे सांगत होत्या, ते त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले होते! अनुराधा यांच्या आयुष्याला २००४ साली कलाटणी मिळाली. अनुराधा, त्यांचे यजमान गुरुनाथ, त्यांचे मित्र विक्रम व त्यांची पत्नी अपर्णा असे चौघेजण लडाखला सहलीला गेले होते. अनुराधा सांगतात, “आम्ही लडाखला पोचल्यावर जेव्हा आपापले सामान उचलून चालू लागलो, तेव्हा भराभर चालवेना. धाप लागल्यासारखे जाणवू लागले. त्या क्षणीच त्या वातावरणातील वेगळेपणा जाणवला. मला त्या भागाविषयी काहीच माहिती क्रमश:

कुंकवाची उठाठेव

कुंकू किंवा कुमकुम ही सर्व भारतीयांना परिचित अशी वस्तू आहे. ती हिंदू धर्मीयांच्या पूजाअर्चेतील आवश्यक बाब आहे. कुंकवाचा रंग लाल. त्यात भगव्या किंवा केशरी रंगाची छटा. पुरुषांनी लावल्यावर त्याला गंध किंवा टिळा म्हणतात. पण जागा कपाळच! कपाळ किंवा भुवयांच्या मधोमध. कुंकवाला स्त्रीच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व. ते भांगात भरले, की बहुधा कुंकवाचे सिंदूर होते. गतिमान जगात ‘टिकली’ने स्त्रियांचे हृदय जिंकले असले तरी हळदीकुंकू समारंभात कुंकवाचे स्थानमहात्म्य टिकून आहे. देवदेवतांच्या पूजेतून कुंकवाला कोणत्याही दुसऱ्या वस्तूने हटवलेले नाही. रंग हा भारतीय सण क्रमश:

Pages