बीड

बीड

रामचंद्र दीक्षितांचा वाडा

मंजरथ हे गाव बीड जिल्ह्यातील माजलगाव या तालुक्याच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर गोदावरी व सिंधुफेणा या नद्यांच्या संगमावर वसले आहे. ते मार्जारतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या गावाचे रामचंद्र दीक्षित. त्यांचा अडीचशे-तीनशे वर्षांचा जुना वाडा मंजरथ येथे उभा आहे! मंजरथ हे गाव टेकडीवजा थोड्या उंचीवर वसले आहे. गावाची लोकसंख्या तीन-साडेतीन हजार असेल. सतराव्या शतकात जेव्हा वाडा बांधला गेला तेव्हा गावाची लोकसंख्या तीनशेच्या दरम्यान असावी.  रामचंद्र दीक्षितांचा वाडा पूर्वाभिमुखी आहे. त्याला भव्य दरवाजा आहे. दगडी भव्य रेखीव आठ फूट उंच व सहा फूट रुंद अशी चौकट आहे. क्रमश:

दासोपंतांची पासोडी

मराठी साहित्यशारदेचे महावस्त्र   पासोडी सध्या मात्र कुणीही हात लावला तरी तुकडे पडतील अशा जीर्णावस्थेत आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती  राजेंद्रप्रसाद यांनी दिलेल्या काचेच्या कपाटात अंबाजोगाई येथे पासोडी ठेवलेली असली तरी पुरातत्त्व विभागाने वेळीच लक्ष घालून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, इतिहासाचा तो दुवा वाचवण्याची गरज आहे. दासोपंत हे पंधराव्या शतकातील संत! मध्ययुगातील नाथपंचक म्हणजे एकनाथ, जनीजनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंदन आणि संतसर्वज्ञ दासोपंत हे होय. त्या पंचकातीलच नव्हे तर एकूण संतकाव्यात सर्वाधिक व प्रचंड काव्यनिर्मिती करणारे संत क्रमश: