पुणे

पुणे जिल्हा     महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून पुणे जिल्हा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिमेस ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, दक्षिण-पूर्वेस सोलापूर जिल्हा तर उत्तर-उत्तरपूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.
पुणे जिल्हा ही संत तुकारामांची जन्मभूमी व कर्मभूमी होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. संत ज्ञानेश्‍वरांची समाधही पुण्‍यातच आहे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्र्वनाथ यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकीर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
पुणे जिल्ह्यातून भीमा, मांडवी, कुकडी नदी ,मीना ,घोड नदी ,भामा ,इंद्रायणी नदी,पवना नदी, मुळा नदी, मुठा नदी, कऱ्हा ,नीरा या नद्या वाहतात. भीमा ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे.
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे. ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुण्‍यात एकूण १४ तालुके असून जिल्‍ह्याचे क्षेत्रफळ १५,६४२ कि.मी.² आहे.

गणिताचे विद्यार्थी घडवणारे - एम....

एम. प्रकाशसर अर्थात प्रकाश मुलबागल हे गणित विषयाचे अध्‍यापक. त्‍यांनी 'गणित ऑलिम्पियाड स्पर्धे'त भारताला सुवर्णपद मिळवून देण्‍याच्‍या इर्षेने गणित विषयात विद्यार्थी घडवण्‍याचे काम अनेक वर्षे केले. त्‍या स्‍पर्धेत भारताला मिळालेल्या एकूण शंभर पदकांपैकी पंचवीसपेक्षा जास्त विद्यार्थी एकट्या प्रकाशसर यांचे आहेत. अविवाहित राहून, कोणत्याही आमिषांना बळी न पडता संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेतलेले आणि प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिलेले प्रकाशसर शिक्षकी पेशातील अनेकांसाठी खरे हिरो आहेत. प्रकाशसरांना कानपुरच्या आयआयटीमध्ये मेकॅनिकल क्रमश:

विवेक सबनीस - जुन्या पुण्याच्या...

'स्मरणरम्य पुणे' किंवा 'पुणे नॉस्टॅल्जिया' हे कॅलेंडर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांत तयार केले गेले आहे. पुणे शहर काळाच्या ओघात बदलत गेले. ते कॅलेंडर जुन्या काळच्या आठवणी जागवण्याचे काम करते. त्यावेळी पुणे शहर बकाल नव्हते, तेथे रहदारी नव्हती, स्वच्छता आणि शांतता नांदत होती. विवेक सबनीस यांची ती निर्मिती. सबनीस म्हणतात, की “पुस्तकांपेक्षा कॅलेंडर सर्वसामान्य माणसांपर्यंत चांगल्या रीतीने पोचते. ते भिंतीवर सतत डोळ्यांपुढे राहते.” सबनीसांचे कॅलेंडर म्हणजे केवळ जुने फोटो नव्हेत तर ते जुन्या पुण्याची भेट शब्दांमधूनही घडवून देते. सबनीस यांनी क्रमश:

विश्वास येवले यांच्या ध्यासाची...

विश्वास येवले. पेशाने डॉक्टर. नामांकित स्त्री-रोगतज्ज्ञ. पण त्यांनी त्यांच्या बालपणापासून पाण्याशी झालेल्या मैत्रीतून, पाण्यावर असलेल्या निस्सीम भक्तीतून आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी सुरू केली. तिला २०१६ साली पंधरा वर्षें होऊन गेली. दिंडी दर वर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या रविवारी निघते आणि बारा दिवसांच्या जलप्रवासानंतर पंढरपूरला पोचते. त्यातून नदिस्वच्छतेच्या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म असा त्रिवेणी संगम म्हणजे येवले यांची जलदिंडी असे वर्णन करता येईल. त्यांच्या त्या उपक्रमाचे लोण महाराष्ट्रात स्थिरावले असून चक्क क्रमश:

बहुगुणी सिनेमावाले नानासाहेब...

नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार हे भारतीय चित्रपटसृष्टीचे आरंभकाळातील एक शिल्पकार होते. नानासाहेबांचा जन्म ११ फेब्रुवारी १८९६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ते नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले, पण त्यांचे मन शिक्षणात रमले नाही. ते वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’त जाऊन राहिले. त्यावेळी त्यांचे वय तेरा वर्षांचे होते. त्यांनी तेथे ‘वत्सलाहरण’, ‘सैरंध्री’, ‘दामाजी’ या नाटकांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका क्रमश:

शुभदा लांजेकर व आवाबेन नवरचना...

शुभदा लांजेकर यांचा जन्म पुण्यातील. बालपण बरे गेले. त्या अकरावीपर्यंत शिकल्या. वडील अतिशय कडक शिस्तीचे. आई प्रेमळ, मनमिळाऊ, पाककलेची आवड असणारी गृहिणी होती. दुसऱ्यांना अडीअडचणीत मदत करणे हा आई-वडिलांचा स्वभाव होता. त्यामुळे शुभदा प्रेमात पण कडक शिस्तीत वाढल्या. त्यांनी शिक्षण चालू असताना थोडे अर्थार्जन केले. त्या साड्यांवर टिकल्या भरणे, साडीच्या पदराला जाळी गोंडे करणे अशी कामे करत. त्यांना त्या कामांत आई मदत करत असे. तयार माल दुकानात पोचवण्याचे काम करावे लागे. ते काम वाढले तेव्हा त्यांनी आजुबाजूच्या गरीब गरजू महिलांना काम दिले. वीसपर्यंत महिला ते काम करत एवढा व्याप क्रमश:

स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (...

पुण्याची 'सा' ही संस्था स्किझोफ्रेनिया व इतर मानसिक आजार यांच्यासाठी काम करते. [स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA)] कॅनडाचे रहिवासी डॉ. जगन्नाथ वाणी यांनी १९९७ साली त्या संस्थेची स्थापना केली. 'सा'ची सेवाभावी संस्था म्हणून अधिकृत नोंदणी १९९८ मध्ये झाली. जगन्नाथ वाणी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कॅनडातील कॅलगरी येथे स्किझोफ्रेनियासाठी संस्था प्रथम स्थापन केली. भारतातही अनेक लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत, परंतु त्या आजारांविषयीची जाणीवजागृती समाजात कमी असल्यामुळे व त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था फारशा अस्तित्वात नसल्यामुळे आजारी क्रमश:

शुभांगी साळोखे - कृषी संशोधक

डॉक्टरकी, इंजिनीयरिंग, विमानसेवा, अंतराळभ्रमण, कॉम्प्युटर, आयटी... भारतीय नारी सगळ्या क्षेत्रांमध्ये स्थिरावली आहे. ती नवनवीन क्षेत्रे धुंडाळत आहे. परंतु भारत देशाचा पारंपरिक आणि सर्वात मोठा व्यवसाय म्हणून जो ओळखला जातो त्या शेतीमध्ये मात्र आधुनिक शिक्षण घेणाऱ्या स्त्रिया संख्येने कमी आहेत. खरे तर, स्त्रियाच प्रत्यक्ष शेतीमध्ये पेरणी, निंदणी, खुरपणी इत्यादी बहुतांश कामे करत असतात. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर शेती कशी करता येईल, शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा दर्जा वाढवता कसा येईल याचा विचार करणाऱ्या स्त्रिया दुर्मीळ आहेत. डॉ. शुभांगी साळोखे या शेतीमध्ये क्रमश:

ज्ञानेश्वर बोडके - अभिनव प्रयोगशील...

भारतीय समाज शेतीकडे ‘डबघाईला आलेला व्यवसाय’ म्हणून पाहत असताना ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांना शेतीतून प्रत्येकी लक्षावधींचे उत्पन्न मिळवण्याची ‘सिस्टिम’ शोधून काढली आहे! ती यशस्वीपणे राबवली जात आहे. त्यांच्या प्रयत्नाचा परिणाम असा, की त्यांच्याशी जोडले गेलेले महाराष्ट्रातील आणि देशभरातील पंचेचाळीस हजार शेतकरी गेल्या सतरा वर्षांच्या काळात सुस्थित झाले आहेत. सर्वांच्या गाड्या आहेत, सर्वांचे परदेश दौरे झाले आहेत. ज्ञानेश्वर बोडके हे पुण्यात मुळशी तालुक्यातील हिंजवडी परिसरात राहतात. मुळशी तालुका सगळा भाताचा पट्टा मानला जातो. ज्ञानेश्वर यांचे क्रमश:

सुरंजन खंडाळकर - गाणारा मुलगा

सुरंजन खंडाळकर याच्या घरी गाणे हॉलभर जणू भरून राहिलेले आहे. हॉलमध्ये मृदुंग, तबला, वीणा, हार्मोनियम तर शोकेसमध्ये लहानमोठी सन्मानचिन्हे आणि भिंतीवर संगीतातील दिग्गजांसह सुरंजन आणि शुभम् या भावंडांची छायाचित्रे! त्यातूनच त्या मुलांच्या भरीव वाटचालीचे दर्शन होते. सुरंजनचा जन्म पुण्याजवळ आळेफाटा येथे आजोळी ३० सप्टेंबर १९९३ला झाला. त्याचे बालपण पुण्यात गेले. त्याचे वडील पं. रघुनाथ खंडाळकर हे गायक. त्यांनी मधुसूदन कुलकर्णी आणि जसराज यांच्याकडे शिक्षण घेतले. रघुनाथ खंडाळकर वयाच्या सोळाव्या वर्षांपासून संगीत शिकत आणि शिकवत आहेत. महाराष्ट्रातील जवळजवळ पाच हजार क्रमश:

संजीव वेलणकर - पंच्याण्णव व्हॉटस्...

माझा मित्र किरण भिडे याने मला संजीव वेलणकरांबद्दल सांगितले आणि मी अक्षरशः उडालो! तो माणूस तब्बल पंच्‍याण्‍णव व्हॉट्सॲप ग्रुप्सचा ॲडमीन आहे. किरण म्हणाला “वेलणकर पुण्यात असतात, तू फोनवर त्यांची मुलाखत घेऊ शकतोस.” पण तशा वल्लीशी फक्त फोनवर बोलून माझे समाधान होण्यासारखे नव्हते. मी वेलणकरांच्या भेटीसाठी पुण्याला गेलो. मी सकाळी दहा वाजता शिवाजीनगर स्टेशनला उतरलो. वेलणकरांचे ऑफिस तेथून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. शिवाजीनगर बस डेपोसमोरच्या गल्लीत ‘रमारमण मंगल कार्यालय’ आहे. वेलणकर ते कार्यालय चालवतात. तेथेच त्यांचे ऑफिस आहे. हॉलच्या क्रमश:

Pages