नाशिक

नाशिक

इगतपुरीचा नवरा-नवरीचा डोंगर

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कुशेगावजवळ नवरा-नवरीचा डोंगर प्रसिद्ध आहे. गिर्यारोहणासाठी लोकांना आवडेल असे ते ठिकाण आहे. ‘डोंगराच्या कुशीत वसलेले’ म्हणून त्या गावाचे नाव कुशेगाव. नाशिकहून वाडीवऱ्हे फाटा येथून वळले, की पश्चिमेकडे वीस किलोमीटर अंतरावर कुशेगाव लागते. गाडी कुशेगावला पार्क करून डोंगराच्या दिशेने पायी जावे लागते. डोंगर दुरून विलोभनीय दिसतो. कुशेगावाच्या उत्तरेला पूर्व-पश्चिम पसरलेली डोंगररांग आहे. त्या डोंगररांगेच्या पूर्व टोकावर दोन सुळके आहेत. ते सुळके म्हणजे जणू नवरा-नवरी जोडीने उभे आहेत असे वाटते. म्‍हणून त्या सुळक्यांना क्रमश:

झोडगे गावचे माणकेश्वर मंदिर

यादव घराण्याचे राज्य महाराष्ट्रदेशी नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत होते. तो काळ संपन्न, समृद्ध आणि कलाप्रेमी असा मानला जातो. राजांनी त्यांच्या राजवटीत देखणी, शिल्पसमृद्ध मंदिरे बांधली. तसेच, एक सुंदर माणकेश्वर मंदिर उभे आहे मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या झोडगे या गावी. ते गाव नाशकातील मालेगावपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. माणकेश्‍वरचे ते मंदिर सुंदर असूनसुद्धा दुर्लक्षित राहिले आहे. माणकेश्वर मंदिराची रचना ही बरीचशी सिन्नर शहरातील गोंदेश्वर मंदिरासारखी आहे. झोडगे येथील मंदिर त्रिदल म्हणजे तीन गाभारे असलेले आहे. ते पश्चिमाभिमुख आहे. मंदिराची रचना क्रमश:

दिग्विजय कला-क्रीडा केंद्र - वाचक...

नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्‍यात वडांगळी नावाचे गाव आहे. गावाची लोकसंख्या काही हजारांत. त्या लहानशा गावातील साहित्यप्रेमी तरुणांनी लोकांना वाचनाची आवड लागावी म्हणून केलेल्या प्रयत्नांची ही गोष्ट. त्यांच्या धडपडीतून वाचक चळवळ ही वाचनापुरती सीमित न राहता, त्यांनी स्थापन केलेल्या ‘दिग्विजय कला क्रीडा केंद्रा’च्या रुपाने सांस्कृतिक चळवळीत रूपांतर झाले आहे. रवींद्र खुळे, किरण भावसार, प्रकाश खुळे व अशोक घुमरे हे समविचारी मित्र एकत्र आले आणि त्यांनी वीस वर्षांपूर्वी गावकऱ्यांची वाचनवृत्ती वाढीस लावण्यासाठी त्या लहानशा गावात वाचनालय सुरू करण्याचे ठरवले. क्रमश:

श्री क्षेत्र कावनाई

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनाई हे ठिकाण पर्यटन आनंदासाठी अनेक दृष्टींनी परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबर गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो. कावनाई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे. ते तीर्थ अकरा लाख बत्तीस हजार वर्षें प्राचीन तीर्थस्थान आहे असे मानले जाते. त्या वेळी त्या तीर्थावर प्रथम कुंभमेळा झाला, म्हणे. कावनाई येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत क्रमश:

भाजीपाला रोपवाटिकेतून हरितक्रांती...

नाशिक जिल्ह्यामधील सातपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर बेळगावढगा नावाचे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. तेथे दत्तुभाऊ ढगे नावाचा हाडाचा शेतकरी माणूस राहतो. त्याचे वय एकोणचाळीस वर्षें. त्याचे एकत्र कुटुंबपद्धत अवलंबणारे वीस–बावीस माणसांचे मोठे घर. शेती हा त्यांच्या उपजीविकेचा परंपरागत उद्योग. दत्तू हे चार भावंडांपैकी एक. घरातील माणसे सतत शेतीउद्योगात व्यस्त असत. मुलांचे लहानपण शाळेत शिकण्याबरोबरच वडीलमंडळींना शेतकामात मदत करण्यात गेले. दत्तुभाऊंना लहानपणापासून रोपे बनवण्याचा छंद होता. दत्तुभाऊंनी मानसशास्त्रात पदवी नाशिकमधील महाविद्यालयातून घेतली, पण मातीची ओढ क्रमश:

निवृत्ती शिंदे - खडकमाळेगावचे...

निवृत्ती महाराज शिंदे ह्या समाजाला वाहून घेतलेल्या एका अवलिया व्यक्तीची भेट नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात खडकमाळेगाव गावात झाली. ते स्वार्थापासून निवृत्त झालेले व परमार्थासाठी जीवन जगणारे, नावातच निवृत्ती असलेले शिंदे. निवृत्ती शिंदे एक सर्वसामान्य शेतकरी आहेत. वडिलोपार्जित जमीन त्यांच्या वाट्याला थोडी आली. ते ती कसतात. साहजिकच, कुटुंब कष्टाळू, मेहनती आहे. परंतु नेकीने जीवन जगते. निवृत्ती तीन-चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईने त्यांचे संगोपन, पालनपोषण केले. आईने मोलमजुरी करून त्यांना वाढवले. निवृत्ती यांना समज आल्यावर त्यांना एक जाणवले, की क्रमश:

भरत कावळे - पाणी जपून वापरण्‍...

नाशिक जिल्ह्यातील ओझरचे भरत कावळे पाण्याच्या वितरणाचे प्रश्न समाधानकारक पद्धतीने सोडवण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांपासून झटत आहेत. हे पाणी धरणाचे. त्याचे वाटप शेती, उद्योग व घरगुती वापर यासाठी प्रथम होत असते. शेतीच्या वाट्याला आलेले पाणी कळले, की कावळे यांचे काम सुरू होते. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या ‘पाणी वापर’ संस्था निर्माण केल्या आहेत. तशी तरतूद कायद्यात आहे. कावळे त्या कामामध्ये योग्यता आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. पाणी वितरण करण्याचे नियोजन व ते प्रत्यक्ष वितरीत करण्याची पद्धत योग्य नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्या पाण्याची खूप हानी व चोरी होत आहे क्रमश:

अविनाश दुसाने - शब्द कमी कार्य...

चंद्राचे चांदणे शीतल व आल्हाददायक असते. त्याला तेज असते पण त्याने डोळे दीपून जात नाहीत. तसे विंचूरचे अविनाश दुसाने. अगदी शांत, साधे व मितभाषी. त्यांना ते विशेष, वेगळे, दखल घेण्याजोगे काही करतात ह्याची दखल आहे असेदेखील त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नाही. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कसलाही अभिनिवेश नाही. असे ऋजू, निगर्वी व संयत व्यक्तिमत्त्व. अविनाश दुसाने नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील विंचूर गावाचे रहिवासी. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ते दहावीला उत्तर महाराष्ट्रात ‘मराठी’मध्ये पहिले आले होते. दहावीला ८६ टक्के मार्क होते. पण त्यांनी त्यांना क्रमश:

दिलीप कोथमिरे - विंचूर गावचे...

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील विंचूर गावचे जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक दिलीप कोथमिरे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. प्राथमिक शिक्षकसुद्धा मनात आणले तर कितीतरी विधायक गोष्टी करू शकतात आणि मुख्यत:, त्यांनी त्यांच्या हाती असलेल्या लहान मुलांना जाणिवपूर्वक घडवले तर कधी कधी, त्यांच्या विजयाची पताका दूरवर झळकू लागते ह्याचे दिलीप कोथमिरे हे उत्तम उदाहरण आहे! दिलीप कोथमिरे प्रथम १९९१ साली निफाड तालुक्यातील ‘माळीवस्ती शाळे’मध्ये रूजू झाले. ती दोन शिक्षकी शाळा होती. पण त्यांची एकट्याचीच त्या शाळेत नेमणूक झाली होती. त्यामुळे ते एकटे दोन्ही क्रमश:

Pages