ठाणे

दीडशे वर्षांचे कल्याण सार्वजनिक...

कल्याणच्या सांस्कृ्तिक जीवनाचा गेली दीडशे वर्षें सतत अविभाज्य भाग होऊन गेलेली संस्था म्हणजे ‘कल्याण सार्वजनिक वाचनालय’. संस्थेने ३ फेब्रुवारी २०१३ रोजी दीडशे वर्षें पूर्ण केली. तो समारंभ थाटात झाला. रावबहाद्दूर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी ‘कल्याण सार्वजनिक वाचनालया’ची स्थापना १८६४ साली केली. ते ग्रंथालय, तेथील पुस्तकांचा ठेवा आणि तेथे राबवले जाणारे उपक्रम यांमुळे कल्याणचेच नव्हे तर आजुबाजूच्या परिसराचे सांस्कृतिक केंद्र कित्येक दशके बनून गेले होते. आता मात्र शहरी गजबजाटात वाचनालयास ती महती उरलेली नाही. उपक्रम रीतसर चालू असतात. कार्यकर्ते क्रमश:

राधिका वेलणकर स्वतःच्या शोधात

राधिका वेलणकर ही बायोमेडिकल डिझाइन इंजिनीयर. ती अॅम्प्लिट्यूड ऑर्थो या कंपनीत दोन वर्षे काम करत होती. राधिका नोकरी करताना माहितीपट किंवा इतर कार्यक्रम यांना आवाज पुरवण्याचेही काम करत असे. त्यातून तिला कलात्मक आनंद लाभे. मात्र तिला त्या आनंदाला नोकरीच्या बंधनामुळे मोकळेपणाने सामोरे जाता येत नव्हते. तिला तिचा ‘आवाज’ अस्वस्थ करत होता. ती नोकरी आणि इतर अॅक्टिव्हीटी यांमध्ये गुंतलेली असली तरी तिला स्वतःचे ध्येय गवसल्याची भावना झाली नाही. म्हणून तिने नोकरीचा राजिनामा दिला! राधिकापुढे ‘आता काय’ असा प्रश्न होता. तिने ‘वनवासी कल्याणाश्रम क्रमश:

पॉप बॉयज् क्रू - नृत्यातून समाजसेवा

‘पॉप बॉयज् क्रू’ हा डान्स ग्रूप ठाण्यामध्ये बाळकुम या छोट्या गावामधील एकत्र आलेल्या व समान वैचारिक पातळी असलेल्या; तसेच, नृत्यकलेची व समाजसेवेची आवड असलेल्या युवकांचा आहे. त्या ग्रूपचे कोअर मेंबर व प्रशिक्षक अमित पाटील, निलेश पाटील, भूपेंद्र पाटील, राज धिंगाने व सागर मोरे हे आहेत. ते युवक एकिकडे टीव्हीवरील रिअॅलिटी शो पाहात असत. दुसरीकडे समाजामध्ये अनेक समस्या चालू असल्‍याचे त्‍यांच्‍या पाहण्‍यात येई. त्‍यासंदर्भातील विचारातून त्‍यांनी नृत्याच्या माध्यमातून मनोरंजन व जनजागृती साधण्याचा विचार केला. त्यांच्या ग्रूपमध्ये अक्रोबेटिक क्रमश:

विद्यादात्या विद्या धारप

विद्या धारप या सेवानिवृत्त क्‍लार्क. निवृत्तीनंतर त्या स्वतःचा वेळ सत्कारणी लागावा आणि इतरांनाही त्याचा फायदा व्हावा या हेतूने काम पाहू लागल्या‍. त्या शोधात त्या येऊन पोचल्या  कल्या‍णच्या डंपिंगग्राऊंड शेजारच्या अण्णाभाऊ साठेनगरच्या झोपडपट्टीत. तेथे कचरा वेचणारे लोक राहतात. धारप यांनी तेथील कच-याचे ढिग, वाहणारी गटारे, प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी अशी हलाखीची परिस्थिती पाहिली. तेथे शिक्षणाविषयी कमालीची अनास्था असल्याचे त्यांना जाणवले. शिक्षणाचा गंध नसलेल्या त्या वस्तीत धारपांनी विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासवर्ग’ घेणे सुरू केले. गेली आठ वर्षे क्रमश:

डोणे गावचा राणे-इनामदार वाडा

मुंबई-पुणे महामार्गावरील शीळ फाट्याहून कर्जत मार्गावरून कल्याणला जाणाऱ्या रस्त्यावर कर्जतच्या उत्तरेला दीड किलोमीटर अंतरावर राणे-इनामदारांचा भव्य वाडा पाहण्यास मिळतो. एकर/दीड एकर जागेवर विस्तारलेला तो वाडा म्हणजे अडीचशे वर्षांपूर्वीच्या वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. वाडा उल्हास नदीच्या काठावर उभारलेला आहे. वाड्याचा आकार ६०१×९०१ असा आयताकृती आहे. वाडा दुमजली असून, चारपाकी कौलारू छपराने आच्छादला आहे. त्या सुबक रचनेच्या छपरामुळे जाणवणारा वाड्याचा रुबाब मराठा वीराच्या बेडर आणि निधड्या वृत्तीच्या थाटाला साजेसा आहे. वाड्याला पूर्वी गोल खापरी नळीची कौले होती. क्रमश:

वसई मोहिमेचा दिग्विजय

मराठ्यांच्या इतिहासातील वसईचा दिग्विजय ही महत्त्वाची विजयश्री मानली जाते. त्या काळी पोर्तुगीजांचा अंमल कोकणपट्टीतील साष्टी प्रांतावर होता. तेथील प्रजा पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळली होती. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न केले होते. त्यामुळे पोर्तुगीज बरेच नमले होते. छत्रपतींच्या महानिर्वाणानंतर शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांना पुन्हा एकदा पोर्तुगीजांना धडा शिकवणे गरजेचे ठरले. मराठ्यांचे प्रशासन कल्याण प्रांतात इसवी सन १७१९ मध्ये सुरू झाले. तेव्हापासून मराठ्यांचा पोर्तुगीजांशी पुन्हा संघर्ष सुरू झाला. उत्तर फिरंगाण १७३७ क्रमश:

Pages