अहमदनगर

अहमदनगर

उपेक्षित जेऊरकुंभारी हवामान केंद्र

अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगांव तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर जेऊरकुंभारी या गांवी पाटबंधारे विभागाच्या नाशिक येथील जलविज्ञान प्रकल्पांतर्गत हवामान केंद्र आहे. त्या केंद्राचे वर्गीकरण टी-२ असे करण्यांत आले आहे. ते ब वर्ग सरितामापन केंद्र आहे. भूपृष्ठावरील जलगुणवत्ता पर्यवेक्षण कार्यप्रणाली असे तिचे नाव आहे. त्या कार्यालयाची स्थापना पंचवीस वर्षांपूर्वी, १९८९ मध्ये करण्यात आली. शासनाने लाखो रुपयांची यंत्रणा त्या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे. त्यांच्या देखभालीसाठी व निगराणीसाठी सध्या खलाशी म्हणून नानासाहेब पारवे यांना तेथे नेमण्यांत आलेले आहे. केंद्रामार्फत कोपरगांव क्रमश:

बाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज!

बाळ भैरवनाथांचे देवस्थान अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे आहे. तो अष्ट भैरवनाथांपैकी एक. त्या ठिकाणी गुढीपाडव्यानंतर पंधरा दिवसांनी दोन दिवस यात्रा भरते. यात्रेत बाळ भैरवनाथ व जोगेश्वरी यांचे लग्न यथासांग होते. बाळभैरवनाथांच्‍या त्‍या देवस्‍थानाचे एक वैशिष्‍ट्य आहे. गावच्‍या परंपरेनुसार गुढीपाडव्‍याला तेथील ग्रामस्थ एका विशिष्ट पद्धतीने येणाऱ्या हवामानाचा-पाऊसपाण्याचा अंदाज बांधतात. त्याला एक वेगळेच पंचांगवाचन म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीच्या किनारी परिसर दंडकारण्याने व्यापलेला होता. त्या परिसरात पुरातन क्रमश:

दक्षिणकाशी पुणतांबा

नगर जिल्ह्याच्या कोपरगांव तालुक्यातील पुणतांबा गावाला धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक परंपरा आहे. गाव गोदातीरी वसले आहे. पुणतांब्याचा उल्लेख महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक क्षेत्रांत होतो. त्या गावाचे नाव पुण्यस्तंभ अथवा नगर असे होते. ती राजा विक्रमादित्याची राजधानी. पुणतांबा गावाला पूर्ण तटबंदी असून गावाला अकरा वेशी आहेत. बऱ्याच ठिकाणी तटबंदी ढासळली आहे. विक्रमादित्य राजाने त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण कालखंड पुणतांबा येथे व्यतीत केला. महायोगी चांगदेव महाराजांची समाधी तेथे आहे. त्याला त्याच्या विद्वत्तेचा व तपसामर्थ्याचा गर्व झाल्याने ते ज्ञानेश्वर माऊलींच्या क्रमश:

ग्रामदैवत खंडेराव महाराज

श्री खंडोबाराय हे लोकदैवत आहे. खंडेराव हे साळी, माळी, कुणबी, कोळी, सुतार, सोनार, महार-मांग, धनगर, ब्राह्मण, मराठा, लोहार, कहार, चांभार, मेहतर या अठरापगड जातींचे लाडके दैवत, जातिनिर्मूलन झाले असले तरी संबंधित सर्व जाती-पोटजातींचे भाविक श्री. खंडेरायाचे कुळधर्म, कुळाचार करताना दिसतात. मुसलमानदेखील त्या दैवताला भजतात. अहमदनगर जिल्‍ह्यातील कोपरगाव तालुक्यात खंडेराव महाराजाचे मंदिर आहेत. कोपरगाव रेल्‍वेस्‍टेशन महामार्गावर महात्‍मा गांधी जिल्‍हा चॅरिटेबल ट्रस्‍ट लगत असलेले ते देवस्‍थान तेथील ग्रामदैवत म्‍हणून ओळखले जाते. खंडोबा देवस्थानातील क्रमश:

भातवडीची लढाई - गनिमी काव्याचा...

अहमदनगरमधील दौला-वडगाव गावाजवळ असलेल्या भातवडी या गावी मेहेकर नदीच्या काठी जुने नरसिंह मंदिर आहे. विस्तृत जागेत असलेल्या त्या मंदिराच्या भोवती दगडी चिरेबंदी भिंत आहे. एका बाजूस ओव-या व नदीच्या बाजूस षट्कोनी आकाराचे दोन बुरूज आहेत. मंदिराच्या कळसावर दशावताराचे शिल्प आहे. ते पाहणा-याचे मन वेधून घेते. भातवडी हे गाव तेथे १६२४ मध्ये घडलेल्या रणसंग्रामामुळे प्रसिद्धीस तर पावलेच, सोबत त्‍या गावाचे नाव शहाजीराजांच्या पराक्रमाशीही जोडले गेले. भावडीची लढाई - शहाजहानच्या दक्षिणेमध्ये स्वा-या झाल्या 1617 ते 1621 या दरम्यान. शहाजहानचे सैन्य तेथे निजामशाही व आदिलशाही क्रमश:

दौला-वडगावची निजामशाही गढी

दौला-वडगाव इतिहासप्रसिद्ध भातवडी गावानजीक आहे. तेथे ब-यापैकी अवस्थेत एक निजामशाही गढी पाहण्यास मिळते. ते ठिकाण भातवडी गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. गावास दौला-वडगाव हे नाव का पडले याचे कारण कदाचित त्या विभागाच्या निजामशाहीतील सरदाराचे नाव दौलाखान किंवा दौलतखान असावे. गढी गावाच्या उत्तरेस आहे. तिचे चाळीस फूट उंचीचे महाकाय बुरूज व तटबंदी भक्कम आहेत. बुरूजांचे खालचे बांधकाम दगडी असून वरील बांधकाम विटांचे आहे. त्यामुळे ते अतिशय सुबक, रेखीव आणि देखणे दिसते. भव्य दरवाजा, सुबक कमान, घडीव दगडांच्या बाजू आणि वर विटांच्या बांधकामातील कमानीने सजलेला सज्जा हे सारे उत्तम क्रमश:

अळकुटी गावचा सरदार कदमबांडे यांचा...

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यात अळकुटी गावी सरदार कदमबांडे पाटील यांचा ऐतिहासिक भुईकोट गढीचा वाडा उभा आहे. सरदार कृष्णाजी कदमबांडे व व्यंकोजी कदमबांडे हे शहाजीराजांच्या कारकिर्दीत निजामशाहीतील मातब्बर सरदार होते. ते दोघे निजामशाहीचा अस्त झाल्यावर मोगल सत्तेकडून अळकुटी गावी जहागीरदार म्हणून कारभार पाहू लागले. त्यांनी साधारणतः अठराव्‍या शतकात अळकुटी या गावी चार एकरांवर देखणा आणि मजबूत गढीचा वाडा बांधला. त्या भुईकोटाचे प्रवेशद्वार भव्य असून ते पूर्वाभिमुख आहे. दरवाजाच्‍या कमानीवर कमळपुष्‍पे कोरलेली आहेत. दरवाजावर विटांनी केलेल्‍या बांधकामाची क्रमश:

अक्षरमित्र - विवेकी विचारांची पेरणी

‘अक्षरमित्र’ ही अहमदनगरमध्ये सुरू झालेली आगळीवेगळी वाचन चळवळ आहे. वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मुल्ये आणि विवेकी विचार यांचा प्रसार करणे हे त्या चळवळीचे मुख्य सूत्र! लोकांना वाचनाची आवड असते, पण त्यांना नेमके काय वाचायचे ते ठाऊक नसते. काय वाचायचे ते ठाऊक असले तरी तो वाचनाचा जामानिमा कोठून मिळवायचा ते ठाऊक नसते. म्हणूनच ‘अक्षरमित्र’ ही चळवळ वाचक आणि पुस्तके यांच्यामधील दूवा होण्याचे काम करत आहे. चळवळीचा उद्देश केवळ वाचक मिळवणे किंवा वाचकांपर्यंत पोचणे; किंबहुना, पुस्तकांची ‘विक्री’ करणे एवढाच नाही, तर शालेय स्तरातील मुलांमध्ये उत्तम क्रमश:

पंपकीन हाऊस – निराधारांचे घर

‘पंपकीन हाऊस’ या संस्थेच्या आवारात आईवडील नसलेली, पालकांकडे सांभाळ करण्याची क्षमता नसलेली साठ ते पासष्ट अनाथ-निराधार मुले- रमली आहेत. ते ठिकाण अहमदनगरजवळील आरणगाव रस्त्यावरील विद्यानगरजवळ आहे. प्रेमाच्या व मायेच्या शिक्षणाने मुलांना आपलेसे केले आहे. मुले त्यांच्या स्वत:च्या पायांवर उभे राहण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईपर्यंत तेथेच राहणार आहेत. अहमदनगर येथील पिल्ले परिवाराचा तो उपक्रम. स्टेला पिल्‍ले व मॅन्यूअल पिल्ले हे दांपत्य त्या अनाथ मुलांचा सांभाळ करत आहे. पंपकीन हाऊस म्हणजे लाल भोपळ्याचे घर. भोपळा हे मुलांचे आकर्षण असते. त्यांनी क्रमश:

बहादुरगड उर्फ पेडगावचा भुईकोट

अहमदनगरच्या श्रीगोंद्यापासून वीस कोसांवर भीमा नदीच्या काठावर बहादूरगड हा किल्ला उभा आहे. मोगलांचा दक्षिणेचा सुभेदार बहादुरखान याने १६७२ साली पावसाळ्यात भीमा नदीच्या काठावर पेडगाव येथे छावणी टाकली. बहादूरखान हा औरंगजेबाचा दूधभाऊ. औरंगजेबाने त्याला सुभेदार म्हणून दक्षिणेत पाठवले. त्याला बहादूरखान कोकलताश अशी पदवी दिली होती. पेडगाव येथे वास्‍तव्‍यास असताना बहादुरखानाने तेथे भुईकोट किल्ला बांधून त्यास बहादुरगड असे नाव दिले. तो किल्ला चाळीसाहून अधिक वर्षांपर्यंत पुणे प्रांतातील मोगल सैन्याची युध्दसामुग्री साठवण्याचे मुख्य ठिकाण होते. बहादुरगड हे त्या किल्ल्याचे क्रमश:

श्रमदानातून ढगेवाडीचा कायापालट

संगमनेर-भंडारदरा रस्त्यावर अकोल्याच्या जवळ डोंगरांच्या रांगेमध्ये ‘ढगेवाडी’ हा पाडा वसलेला आहे. ढगेवाडीला जायचे असेल तर तीन डोंगर ओलांडून, चढ चढून वर गावात जावे लागे. तीस वर्षांपूर्वी त्या पाड्यावर पन्नास-साठ कच्च्या झोपड्या होत्या. पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरून पाच किलोमीटर अंतर चालून जावे लागत होते. पावसाळ्यात तेथे थोडीफार शेती होई. पण नंतर गावातील लोक मजुरीसाठी दूर जात असत. ते रस्तादुरुस्ती, बांधकाम, ऊसतोडणी अशा कामांच्या शोधात वणवण फिरत. त्यांच्या मागे पाड्यावर म्हातारी-कोतारी आणि लहान मुले राहत. ढगेवाडीतला एक तरुण, भास्कर पारधी हा त्या क्रमश:

Pages