माझ्या आयुष्याचा अर्थ - दिनकर गांगल यांची मुलाखत

Think Maharashtra 14/11/2019

_vijayawad_kumarketakar_gangal‘थिंक महाराष्ट्र’चे प्रवर्तक दिनकर गांगल एका वेगळ्याच तऱ्हेने 26 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता प्रकटत आहेत. गांगल यांची प्रकट मुलाखत ‘चैत्रचाहूल’ उपक्रमाने त्यांच्या ‘गंभीर व गमतीदार’ मासिक सादरीकरण सत्रात योजली आहे. मुलाखत घेणार आहेत -‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार आणि ‘ऍड फिझ’चे विनोद पवार. स्थळ – रवींद्र नाट्यमंदिर, मिनी थिएटर

गांगल यांची वैचारिक झेप -

(दिनकर गांगल यांची साहित्यसंस्कृती क्षेत्रातील कारकीर्द मोठी, म्हणजे जवळजवळ पाच दशकांची आहे. त्यांनी ‘केसरी’, ‘सकाळ’ यांमध्ये पत्रकारिता केली. त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ची रविवार पुरवणी वीस वर्षें, भालचंद्र वैद्य यांच्याबरोबर संपादित केली.)

• दिनकर गांगल यांनी सुधीर नांदगावकर यांच्याबरोबर ‘प्रभात चित्र मंडळा’ची (फिल्म सोसायटी) स्थापना जुलै 1968 मध्ये केली.

• दिनकर गांगल यांनी अरुण साधू, कुमार केतकर, अशोक जैन अशा त्यांच्या चौदा मित्रांसह 1975 साली ‘ग्रंथाली’ला जन्मास घातले. 

• दिनकर गांगल यांनी एकनाथ ठाकूर, कुमार केतकर, दिलीप महाजन, उषा मेहता वगैरेअशा त्यांच्या मित्रांबरोबर 1989 साली वाचन परिषद घेऊन वाचनाचा जाहीरनामा लिहिला. 

• दिनकर गांगल यांनी 1995 च्या सुमारास जाहीरपणे लिहिले, की - ‘छापील शब्दाचा महिमा संपला’! 

_ivitation

• दिनकर गांगल यांनी दीपक घारे यांच्या सहकार्याने 2001 मध्ये ‘ग्रंथाली ज्ञानयज्ञ’ नावाने छोट्या पुस्तिकांची मालिका निर्माण केली व स्थानिक इतिहासाचे महत्त्व अधोरेखित केले.
 
• दिनकर गांगल यांनी 2005 मध्ये ‘मराठी विद्यापीठ डॉट कॉम’ नावाची साईट निर्माण करून आम समाजातील ज्ञानस्रोतांची महती कथन केली. 

• दिनकर गांगल यांनी 2009 मध्ये ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ नावाचे वेबपोर्टल निर्माण करून स्थानिक व जागतिक (ग्लोकल), क्राउडसोअर्सिंग अशा आधुनिक संकल्पनांच्या आधारे संस्कृतिकारणाचे अनन्य महत्त्व प्रतिपादले. 

• दिनकर गांगल गेली पाच वर्षे म्हणत आहेत, की - महाराष्ट्रात तालुक्या तालुक्यात ‘रिनेसान्स’ घडत आहे. उपक्रमशील व्यक्तींचा संचार सर्वत्र आहे. मात्र त्यांचा आणि प्रस्थापितांचा ‘कनेक्ट’ राहिलेला नाही. परिवर्तन हे निर्मितीच्या प्रेरणांनी भारल्या गेलेल्या त्या माणसांकडून होणार आहे. ‘आप’ हे त्याचे प्रतीक होते, पण त्या नावाचे संघटन रूढ राजकारणात लडबडले. माणसांच्या सदसद्विवेकाची संस्कृती मागे पडली.

• दिनकर गांगल यांनी 2017 साली जाहीरपणे लिहिले, की - अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा नव्या माणसाच्या राहिलेल्या नाहीत. मग त्याला काय हवे आहे - ‘नव्या युगाचा नवा अजेंडा’! तो कसा आखावा? ते विचारी व संवेदनाशील लोकच ठरवू शकतात; राजकारणी नव्हे.
 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.