-
डॉ. हर्षदीप कांबळे (I.A.S., उद्योग विकास अायुक्त, महाराष्ट्र राज्य) अाणि दंतवैद्य विजय कदम या दोघांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती' स्थापना केली. त्या समितीमार्फत त्या दोघांनी एकशेसव्वीसावी आंबेडकर जयंती वेगळ्या ढंगात साजरी केली. त्यांनी भावनेत आणि उत्साहात अडकलेला 14 एप्रिलचा जयंती दिन बाहेर काढला आणि त्या उत्सवाला कालानुरूप समर्पक…
-
वैशाख शुध्द तृतीया ही तिथी अक्षय तृतीया या नावाने ओळखली व साजरी केली जाते. तो हिंदू धर्माच्या धारणेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय या शब्दाचा अर्थ क्षय न पावणारे, म्हणजे नाश न होणारे असा आहे. पुराणानुसार त्रेतायुगाचा प्रारंभ अक्षय तृतीयेपासून झाला. तो दिवस कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन मानला जातो.…
-
प्रकाश नारकर यांनी 'थिंक महाराष्ट्र'वर सादर केलेला कोकणातील दैवतांचा अभ्यास वैशिष्ट्यपूर्ण आहे. मी सूर्यविषयक माहिती गोळा करत असताना अमेरिकास्थित जय दीक्षित यांचे ‘ए ट्रिब्युट टू कोकणस्थ’ हे पुस्तक वाचले होते. त्यांनी कोकणस्थ ब्राह्मणांच्या दैवतांबद्दल माहिती देताना कोकणातील ह्या जातीच्या मुळांचा शोध घेतला आहे. त्यांनी नमूद केले आहे, की कोकणातील…
-
आज जेव्हा या प्रश्नाचा विचार जेव्हा मी करतोय की ही 'कैद केलेले कळप’ ही कादंबरी मी का लिहिली तेव्हा मुळात मी लिहितोच का या प्रश्नाचे उत्तर शोधणे मला आवश्यक आहे.
बऱ्याच वर्षांपूर्वी मी दिवाळी वा मे मधील सुटीची वाट बघत असे आणि जर मुंबईला बहिणीकडे जायचे ठरले तर अाणखी एका कारणामुळे मला आकर्षण असायचे – मला मुंबई भेटीत विजय तेंडुलकर भेटत. ते होते माझ्या…
-
'कैद केलेले कळप' ही डॉ. अरुण गद्रे यांची कादंबरी 2015 साली प्रसिद्ध झाली. तिची दुसरी आवृत्ती 2016 साली, म्हणजे वर्षभरात प्रसिद्ध झाली. गद्रे ती कादंबरी लिहिण्यास का प्रवृत्त झाले? त्यांनी त्याविषयी सविस्तर मनोगत लिहिले आहे. कादंबरी त्यांच्या स्वतःच्या सामाजिक कामातील अनुभवांवर आधारलेली आहे. आम्ही त्या कादंबरीची पुरस्कारासाठी शिफारस करताना मुख्यतः…
-
मतिन भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात पाटी-पुस्तक दिले आहे. त्या मुलांनी शिकारीची हत्यारे आणि फासे टाकून हातात पेन पेन्सिल धरली आहेत. मतिनकडे तशी साडेचारशे मुले आहेत. मतिनच्या शाळेचे नाव आहे 'प्रश्नचिन्ह!'
प्रश्नचिन्ह ही आदिवासी आश्रमशाळा. ती अमरावती जिल्ह्याच्या नांदवाग खंडेश्वर तालुक्यात अाहे. नागपूर-औरंगाबाद आणि अमरावती-यवतमाळ हे…
-
प्रशासकीय सेवेतील हर्षदीप कांबळे नावाचे अधिकारी आणि मालाड येथील दंतवैद्य विजय कदम यांच्या सहकार्यातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ मालाड येथे स्थापन करण्यात आली आहे. समितीने एकशेसव्वीसावी आंबेडकर जयंती 2017 साली वेगळ्या ढंगाने साजरी केली. त्यांनी भावनेत आणि उत्साहात अडकलेला 14 एप्रिलचा जयंती दिन बाहेर काढला आणि त्या उत्सवाला…
-
सर जमशेटजी टाटा यांचे नाव भारताचे आद्य उद्योगपती म्हणून घेतले जाते. न्या. महादेव गोविंद रानडे, दादाभाई नौरोजी अशांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी भारत देशाला औद्योगिक क्रांती गरजेची असल्याचे नेहमीच सांगितले होते. परंतु तो विचार प्रत्यक्षात उतरवला सर जमशेटजी यांनी.
टाटा यांचे मूळ घराणे गुजराथच्या नवसारीचे. जमशेटजी यांचा जन्म पारशी धर्मोपदेशकांच्या घरात…
-
वसंत नरहर फेणे यांचा मृत्यू 6 मार्च 2018 रोजी, एक दिवसाच्या आजाराने झाला. फेणे एक्याण्णव वर्षांचे होते. ते त्या दिवसभरात सतरा तास ‘आयसीयु’त जरी होते तरी त्यांनी खाल्ले-प्यायले-क्रिकेटची मॅच पाहिली, ते दुसऱ्या दिवशी सकाळी चहा प्यायले; आणि त्यानंतर त्यांचे हृदय अचानक थांबले! डॉक्टरांच्या टिमने त्यात चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला, तथापी तो निष्फळ ठरला…
-
‘फालतू’ हा मराठी भाषेत रोजच्या वापरातील शब्द आहे. तो ‘आजचा चित्रपट अगदीच फालतू होता’, ‘फालतू गप्पा मारू नको’, ‘अमूल्य वेळ फालतू गोष्टीत वाया घालवू नका’, ‘माझ्याशी फालतुपणा करू नको’ अशा अनेक वाक्यांतून नेहमी कानी पडत असतो. जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती त्याचा वापर करत असते. ‘फालतू’ या शब्दाचे वाईट, बेकार, निरर्थक, वाह्यातपणा, चिल्लर, क्षुद्र, हलक्या…
-
पोपटरावांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी राज्य सरकारने आदर्श गाव योजना सुरु केली होती. त्यामुळे त्यांच्या नियोजित कामासाठी लागणारा निधी कोठून आणायचा, ती समस्या पोपटरावांपुढे नव्हती. त्यांना फक्त एक काम करणे होते, ते म्हणजे नशाबंदी, नसबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी व श्रमदान ही पंचसूत्री आचरणात आणण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने…
-
यक्षदेवता व वीरयक्ष हेच दक्षिण कोकणात प्रामुख्याने ग्राम व नगर संरक्षक देव मानले जातात, ते गावाचे संरक्षण करतात ही लोकांची श्रद्धा आहे. यक्षोपासनेची चिवट परंपरा पिढ्यान् पिढ्या सातत्यपूर्ण चालू आहे. म्हणूनच भैरव (गस्ती करणारा) हा लोकप्रिय क्षेत्रपाल देव प्रसिद्ध आहे. त्याच्या कौल, नवस, गाऱ्हाणे, बळी या उपासनेतून गाव बांधिलकी असणे, अरिष्टापासून…
-
ज्या इंग्रजी शब्दांचा समाजाच्या रोजच्या संवादातील वापर लक्षात येण्याजोगा गेल्या काही वर्षांत वाढला आहे त्यात ‘इनोव्हेशन’ या शब्दाचा उल्लेख करावा लागेल. नव्या संकल्पना, पद्धती किंवा नवी उत्पादने वा उपकरणे यांच्या माध्यमातून स्थापित व्यवस्थेत बदल घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे इनोव्हेशन. चाकोरी भेदून, वहिवाट सोडून, मळलेली वाट नाकारून नव्या पद्धतीचा…
-
प्रा.भालचंद्र माधव उदगावकर यांचे वर्णन समाजाचे भान असणारा वैज्ञानिक असे करणे योग्य ठरेल. उदगावकर 14 सप्टेंबर 1927 रोजी जन्मले. ते दादरच्या महापालिका शाळेत आणि नंतर राजा शिवाजी महाविद्यालयात शिकले. मॅट्रिकला ते बोर्डात पहिले आले होते. नंतर ते एमएस्सीलाही मुंबई विद्यापीठात पहिले आले. उदगावकरांचे नाव ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या श्रेयनामावलीत भाभा,…
-
राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. विषय होता, ‘कचरा व्यवस्थापन’. मला त्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्या विषयाची तयारी करत असताना अभ्यासण्यात आलेली Reduce, Reuse, Recycle ही त्रिसूत्री काही माझ्या मनातून जाईना. मी शिक्षक म्हणून अनेक लहान-लहान गोष्टी करू…
-
अण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण गाजले नाही. त्याची फलनिष्पत्तीदेखील अण्णांचे कार्यकर्ते व सरकार यांच्याकडून खूप उत्साहाने व्यक्त झाली नाही, त्याचे एक कारण म्हणजे अण्णांनी सरकारने आश्वासने न पाळल्यास उपोषणास पुन्हा बसण्याचा इशारा दिला आहे. सरकारला एवढ्या अल्पावधीत कोणत्याही आश्वासनांची पूर्तता करता येणार नाही. त्या परिस्थितीत अण्णांची तब्येत कशी…
-
आमची जुनी पिढी भाग्यवानच म्हणावी लागेल! आम्ही चिमण्यांना अंगणात दाणे वेचताना पाहिले आहे. झाडांवर, रस्त्यांच्या कडांवर, टेलिफोनच्या वायरीवर समूहाने मुक्त विहार करताना, कधी चिवचिवाट तर कधी नुसताच लपंडाव. शाळकरी मुलांना तर चिमण्यांचा फारच लळा असे. बांबूच्या कामटीने टोपली तिरकी उभी करायची. कामटीला दोरी अडकवायची. टोपलीखाली ज्वारी-बाजरीचे दाणे टाकायचे.…
-
छायाचित्रकार अथर्व दीक्षित या कल्याणमधील (ठाणे जिल्हा) युवकाने त्याच्या अमित बाळापुरकर आणि मयुरेश देसाई या मित्रांसह 'प्रकृती कला मंच' संस्थेची स्थापना केली आहे. हौशी कलाप्रेमींना त्यांची कला सादर करता यावी, त्यांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश संस्था स्थापन करण्यामागे आहे. संस्थेच्या कार्याला छायाचित्रे व चित्रे यांचे एकत्रित असे…
-
अण्णा हजारे यांनी त्यांच्या राळेगण सिद्धी या मूळ गावात पावसाचे नाल्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून आणि जमिनीच्या पोटात ढकलून नंतर ते गावातील विहिरींमार्फत शेतीसाठी उपयोगात आणण्याचा धडाकेबंद कार्यक्रम ऐंशीच्या दशकात यशस्वी रीत्या राबवला. त्या उपक्रमामुळे राळेगण सिद्धी गावाचा कायापालट झाला. एका ओसाड दुष्काळग्रस्त गावाचे रुपांतर बहरलेली शेती…
-
अण्णा हजारे यांच्यावर होणाऱ्या विकृत टीकेमधून एक वेगळाच मुद्दा लक्षात आला. आम्ही सामाजिक व्यक्तींना कठोरपणे तपासतो व त्याउलट राजकारण्यांत सद्गुण शोधतो! महिन्यापूर्वी झालेल्या राज ठाकरे-पवार मुलाखतीनंतर दोघे किती उमदे, किती रसिक यांबद्दलच्या पोस्ट वाहत होत्या. पण त्यांनी त्यांच्याजवळ दिसते तितकी संपत्ती कशी जमवली असेल हा प्रश्नही पडला नाही आम्हाला…
वाचकांच्या प्रतिक्रिया
मयूर आडकर...धन्यवाद...!
ज्येष्ठ साहित्य सम्राट श्री न चि केळकर यांच्या जन्मभूमीत माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे.
मोडनिंब गावचा इतिहास खरच दैदिप्यमान आहे,मोडनिंबची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Nice.
उत्कंठावर्धक लेख. अतिशय प्रेरणादायी
सुंदर लेख.
The great thing
मी बेळगाव मधून आहे माझे माहेरचे आडनाव रोकडे व सासरे आडनाव रणखांबे आहे आमच्या दोन्ही कडच्या कुटुंबातील लोकांनी त्याची कुलावळ व कुलदैवत माहिती नाही त्यामुळे काही देवकार्य करताना अडचणी येतात तर कृपया हेळवी समाजात आता ही माहिती सांगत असतील तर त्याचा पत्ता आणिनबर द्यावा मी मुळी सोलापूर आणि सासरे अर्धी तालुक्यातील आहे
अप्रतिम