वेध जलसंवर्धनाचा - औरंगाबाद तालुका

प्रतिनिधी 27/11/2016

'थिंक महाराष्‍ट्र'ची माहिती संकलनाची नवी मोहीम

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने जलसंवर्धनाच्या कामात महाराष्ट्रभर गुंतलेल्या व्यक्ती-संस्थांची व त्यांच्या कार्याची तपशीलवार माहिती संकलित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेचा आरंभ औरंगाबाद तालुक्यात ९ डिसेंबर २०१६ ला होत आहे. दोन माहिती संकलक कार्यकर्ते त्या तालुक्यात तीन-चार दिवस मुक्काम ठोकतील आणि तेथील पाणी निर्माण करण्याच्या, पाणी साठवण्याच्या व पाणी वितरण करण्याच्या कामाच्या बारीकसारीक नोंदी टिपतील.

गेल्या वर्षी पाण्याचा तीव्र दुष्काळ पडला होता. त्या संकटात अनेक सत्प्रवृत्त व्यक्ती व संस्था पुढे झाल्या आणि त्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामे करू लागल्या. ना त्यांना मनुष्यबळ कमी पडले ना पैशाचे पाठबळ. समाजातील या चांगुलपणाची यथार्थ नोंद व्हावी, त्यापासून अन्य लोकांना स्फुरण मिळावे आणि समाजाचे जागृत झालेले हे सकारात्मक बळ कायम टिकावे यासाठी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा हा खटाटोप आहे.

जलसंवर्धनाच्या या कार्याच्या तालुकावार व्यवस्थित नोंदी झाल्या, त्या मागील प्रेरक व्यक्ती व संस्था यांची माहिती कळली तर एकूण समाजाची उमेद वाढेल. त्यापासून अन्य व्यक्तींना स्फुरणही येऊ शकेल. शिवाय, त्या कामांची नोंद ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेबपोर्टलवर कायम स्वरूपी केली जाईल. एवढेच नव्हे तर त्यांचे अपडेट मिळवण्याचा प्रयत्न सतत राहील.

महाराष्ट्रात मार्च ते जून २०१६ या काळात गावोगावी जलसंवर्धनाची अनेक कामे व्यक्तिगत अथवा सामुहिक पातळीवर उभी राहिली. नदी-तळ्यातील गाळ काढ, शेततळी खोद, छोटे बंधारे बांध, भूमी समतल कर... अशी विविध कामे घडून आली. त्याची चित्रे आपण टिव्हीवर व वर्तमानपत्रांत पाहिली. विशेषत:, पाऊस सुरुवातीला दणक्यात आला. त्यामधून अशा सर्व कामांच्या ठिकाणी जलसाठे तयार झाले आणि नंतर जेव्हा पावसाने तीन आठवडे ओढ घेतली, तेव्हा मात्र सर्वत्र चिंतेचे वातावरण तयार झाले. त्या वेळी ते जलसाठे व त्या भोवतीची हिरवाई स्थानिकांना दिलासा देती झालीच, पण शहरभागात राहणाऱ्या आपल्यासारख्या मंडळींना विलक्षण नेत्रसुखद वाटली आणि आपला लोकसामर्थ्यावरील विश्वास वाढला.

योजना अशी, की प्रत्येक तालुक्यात दोन माहिती संकलक व्यक्तीने जाऊन तेथे चार दिवस राहून जलसंवर्धनाच्या कामास, तेथे प्रत्यक्ष भेट देऊन, आवश्यकतेनुसार फोटो/फिल्म काढून-ध्वनिमुद्रण करून ती सर्व माहिती वर्णनात्मक स्वरूपात ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ऑफिसकडे पाठवायची आहे. या मोहिमेत अपेक्षा अशी आहे, की जलसंवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्ती-संस्थांनी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडे संपर्क साधून माहिती कळवावी. तसेच, ज्या माहितीसंकलक कार्यकर्त्यांना या मोहिमेत सामील व्हायचे असेल त्यांनी देखील ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडे संपर्क साधावा.

संपर्क -
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'
२२, पहिला मजला, मनुबर मेन्शन,१९३ आंबेडकर रोड,
चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई - ४०० ०१४
९०२९५५७७६७, (०२२) २४१८३७१०
info@thinkmaharashtra.com

लेखी अभिप्राय

Mala ya think maharas ya madhe samil vayach ahe mhnun apanas hi vinanti ahe ki mla yamdhe samil karun ghy

Hi vinanti

praful jayram bhoye 01/12/2016

किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात.

लेखकाचा दूरध्वनी

9029557767

प्रफुल भोये, तुम्‍ही आम्‍हाला 9029557767 या क्रमांकावर संपर्क करावा किंवा स्‍वतःचा क्रमांक द्यावा.

किरण क्षीरसागर13/12/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.