सिताफळांचा बादशहा - नवनाथ कसपटे


नवनाथ कसपटे यांचे कर्तृत्व असे, की त्यांचे नाव घेतल्याबरोबर लोकांना सिताफळाची आठवण यावी! ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे रहिवासी आहेत. नवनाथ कसपटे यांचा जन्म 1 जून 1955 रोजी बार्शी तालुक्यातील गोरमाळे या गावी झाला. वडिलांचे नाव मल्हारी आणि आईचे नाव पार्वती. कसपटे यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले. त्यांना दोन मुले आहेत. एका मुलाचे शिक्षण बारावी  पर्यंत झाले  आहे तर दुसऱ्या मुलाने डी. फार्मसी केले आहे.

कसपटे यांच्या लहानपणी त्यांच्या आईवडिलांची पस्तीस एकर शेती होती. त्यांनी शेतात चिकू, पेरू, आंबा व पपई यांची लागवड केली. त्यांच्या शेतात, 1985 मध्ये बोअरवेलला पाणी लागले. तत्पूर्वी त्‍यांच्‍या शेतात कोरडवाहू भुसार पिके घेतली जात असत. मात्र पाणी लागल्यानंतर कसपटे फळबागांकडे वळले आणि शेतीत परिवर्तन सुरू झाले. कसपटे यांनी वीस एकर शेतात द्राक्षे लावली, चांगले उत्पन्न येऊ लागले. इतके, की कसपटे द्राक्षे निर्यात करू लागले! त्यांनी जवळ जवळ पंचवीस वर्षे द्राक्षे निर्यात केली. त्यांच्या द्राक्षांच्या निमित्ताने त्यांना ‘युरोगॅप  सर्टिफिकेशन’ सोलापूर जिल्ह्यात प्रथमच मिळाले! शेतक-यांकडून शेतामध्ये पॅकिंग शेड, संडास बाथरूम, वॉश बेशिन इत्यादींची उभारणी केली जाते का? तसेच मजुरांची आरोग्य तपासणी, सर्व औषधांचे फवारणी वेळापत्रक या सर्व गोष्टींची नोंद ठेवणे, अशा सर्व गोष्टी शेतकरी नियमाप्रमाणे करतात का याची शेतावर जाऊन सर्व पाहणी करून ऑडिट केले जाते. त्यानंतर ज्याप्रमाणे कारखान्यांना 'आयएसओ' प्रमाणपत्र दिले जाते त्याचप्रमाणे शेतातील रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष पाहणी करून 'युरोगॅप सर्टिफिकेशन' दिले जाते. कसपटे यांनी शेतावर मजुरांसाठी खोल्या बांधल्या असून निवाऱ्याची चांगली सोय केली आहे. 'युरोगॅप सर्टिफिकेशन'मुळे कसपटेंना नावलौकिक मिळाला. त्यांची सर्वाधिक द्राक्ष निर्यात झाल्यामुळे महाराष्ट्रातून एकमेव निवड करून त्यांना मार्केटिंगच्या अभ्यासासाठी 'महाग्रेप'ने लंडनला पाठवले.

पासष्ट बोअरवेल झाले तरीसुद्धा शेतात पाणी खूपच कमी प्रमाणात होते. काही पर्यायी करावे असे कसपटे यांना वाटू लागले. दिवसेंदिवस ती इच्छा बळावत गेली. बार्शीचे कृषी अधिकारी वि.ग. राऊळ यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणले, चर्चा होऊ लागल्या. चर्चेच्या मंथनातून काही चांगले प्रकट झाले व 'अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघ' स्थापन झाला. त्याचे फळ म्हणजे राज्यात साठ हजार हेक्टर जमिनीत सिताफळाची लागवड करण्यात आली.

'अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघ', पुणे ही NGO संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. संघाचे वर्षातून एकदा महाराष्ट्रात कोठेही राज्यव्यापी सीताफळ चर्चासत्र घेतले जाते. संघाने कृषिमंत्री शरद पवार यांच्या कडून सीताफळ संशोधन केंद्राकरिता आठ कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्याचपैकी चार कोटी रुपये बीड येथील आंबेजोगाई संशोधन केंद्राच्या बळकटीसाठी देण्यात आले, तर उर्वरित चार कोटी पुरंदर तालुक्यातील जाधववाडी येथे नवीन सीताफळ संशोधन केंद्रास दिले. जगातील पहिला सिताफळ संघ ऑस्ट्रेलियात तर दुसरा संघ भारतात आहे. सिताफळ संघातील वीस सदस्यांनी ऑस्ट्रेलिया येथील जागतिक सीताफळ चर्चासत्रात सहभाग घेतला होता. त्‍यांनी तेथील सीताफळांच्‍या शेतात जाऊन अभ्यास केला. सीताफळ संघात एकट्या बार्शी तालुक्यातील दीडशे सभासद आहेत. दीडशेपैकी दहा ते पंधरा लोक सिताफळाची शेती करणारे आहेत.

कसपटे हे कार्यक्षम व अभ्यासू आहेत. त्यांची सिताफळाची बाग बघून थक्क व्हायला होते. त्यांच्या कष्टांची पाहणाऱ्याला कल्पना येते. त्यांच्या शेतात बत्तीस जातींची सिताफळे आहेत. नवनाथ कसपटे यांनी निरीक्षणातून NMK1 (गोल्डन) व NMK2, NMK3 आणि फिंगर प्रिंट या चार जाती विकसित केल्या. कसपटे यांनी सिताफळांच्या नव्या जातींना नावे देताना स्वतःच्या 'नवनाथ मल्हारी कसपटे' नावातील आद्याक्षरांचा वापर केला. त्या जातींपैकी NMK1 (गोल्डन) ही सीताफळाची जात सर्वोत्तम आहे. कसपटे यांची सिताफळ उत्पादनात स्पेशालिटी झाली आहे. त्यांनी विकसित केलेल्या जातींच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

कसपटे सिताफळांची निर्यात परदेशी करतात. मात्र मुंबई ही त्यांची मुख्य बाजारपेठ आहे. NMK1 (गोल्डन) हे सिताफळ दुसऱ्या सिताफळांपेक्षा मोठे देखणे व चवीला गोड आहे. इतर सिताफळांच्या तुलनेत NMK1 (गोल्डन) या सीताफळात बिया कमी असतात. झाडावरून पिकलेले फळ पडले तर ते दबते, पण फुटत नाही. फळ झाडावर पंधरा दिवस व झाडावरून काढल्यावर आठ दिवस टिकते. दुसऱ्या जातीच्या सिताफळांत तीस ते पस्तीस टक्के गर असतो, तर NMK1(गोल्डन) सिताफळात पन्नास टक्के गर असतो. सिताफळांचा एकरी खर्च लागवडी नंतर दरवर्षी पंधरा हजार ते वीस हजार रुपये इतका येतो, तर उत्पन्न चार ते साडेचार लाख रुपयांपर्यंत येऊ शकते. सिताफळांना पाणी कमी लागते.

नवनाथ कसपटे यांनी 2002 पासून नर्सरी चालू केली आहे. रोपांची लागवड बारा महिने केली जाऊ शकते. पण सिताफळांच्या लागवडीचा काळ जुन -जुलै हा योग्य मानला जातो.

आफ्रिकेतील काही लोकांनी इंटरनेटवर पाहून कसपटे यांच्या शेतीला भेट दिली व  2014 साली सिताफळांची रोपे घेऊन गेले आहेत.

कसपटे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांपैकी पुढील काही –

1. सोलापूर जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार  -1994
2. सर्वाधिक द्राक्षे निर्यातीचा महाग्रेपचा   पुरस्कार – 1997-98
3. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ पुरस्कृत कृषिभूषण राज्य पुरस्कार – 2008
4. गुजरात सरकारचा श्रेष्ठ किसान पुरस्कार, गांधी नगर, गुजरात – सप्टेंबर 2013
5. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA) अंतर्गत सिताफळ लागवड आणि पणन तंत्रज्ञान प्रसार व प्रचार प्रकल्प.
6. कै . वसंतराव नाईक कृषी माल निर्यात पुरस्कार . 2004
7. औरंगाबाद गुनीजन साहित्य संमेलनात बळीराजा  पुरस्कार. 2006-07
8. बळीराजा  मासिकाचा लेखन गौरव पुरस्कार . 2005
9. पुणे येथील भगवंत मित्रमंडळाचा भगवंतरत्न पुरस्कार .
10. सुरज क्रिडा व संस्कृतिक मंडळ बार्शी यांचा जीवन गौरव पुरस्कार . 2005-06
11. रोटरी क्लब सोलापूर शेती क्षेत्रातील कामगिरीबाबत पुरस्कार . 2005-06

नवनाथ कसपटे सिताफळांविषयी भरभरून बोलतात. त्यातून त्यांचा सिताफळ पिकाविषयीचा व्यासंग, अभ्यास व त्यांची त्या विषयाची रुची लक्षात येते. कसपटे जेवढे अभ्यासू वृत्तीचे तितकेच नम्रही आहेत. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रयोगांमध्ये आस्था वाटते. कसपटे यांच्या शेतीतील प्रयोगांचे अनुकरण करून इतर अनेक शेतक-यांनी स्वतःचा उत्कर्ष साधला आहे. त्यापैकी बार्शीचे राजेंद्र देशमुख (09822248478) आणि उस्मानाबादमधील भागवत गोडसे (07875774952) या यशस्वी शेतक-यांची नावे उदाहरणादाखल सांगता येतील.

कसपटे यांचे शेतीतील प्रयोग आणि त्‍यांची सिताफळे यांची ख्‍याती सर्वदूर पसरलेली आहे. पंजाब नॅशनल युनिव्हर्सिटीमधून योगेश गुप्ता (09041074172) हा विद्यार्थी कसपटे यांच्‍या सिताफळांचा अभ्‍यास करण्‍यासाठी त्‍यांच्‍याकडे आला. तो तीन वर्षे कसपटे यांच्या शेतावर राहिला आणि त्याने त्याची NMK1 (गोल्डन) या सीताफळाच्या जातीवर पीएच.डी. पूर्ण केली!

नवनाथ कसपटे
09822669727,
nmkaspate@yahoo.com

- उज्ज्वला क्षीरसागर

लेखी अभिप्राय

सिताफळाच्या आपल्या यशस्वीतेबाबत, प्रयोगशील कृतीबाबत मी भारावलो आहे. अापली शेती बघण्याची, NMK1gold सिताफळ लावण्याची माझी इच्छा आहे.आपले मला मार्गदर्शन हवे. कसे मिळेल? माझा फोन नं.9822740555.आपला फोन नं कळल्यास मी आपल्याशी संपर्क साधतो. काही साहित्य असल्यास कळवावे. ते मला हवेत. त्‍याची किंमत मी देईन. माझा पत्ता - प्रकाश बोंबटकर,गिताईनगर,गोपुरी,वर्धा (महाराष्‍ट्र)

प्रकाश वसंतराव…11/10/2015

खूप छान! आणि मला पण वाटतं सिताफळ लावावीत. कृपा करुन रोपे अन् लागवड याबद्दल मार्गदर्शन करावे. :-) माझा पत्ता - मु पो नायगाव, ता. कळंब, जी. उस्मानाबाद. - 7875719229

संजय शितोळे18/01/2016

सर तुम्ही केलेले प्रयोग आणि सिताफळाचे व्यवस्थापन हे खूपच छान आहे. आमच्याकडे डोंगराळ भाग आहे व सर्व जिरायत क्षेत्र असल्याने आम्ही 25 शेतकरी मिळून सिताफळ लागवड करण्याचे ठरवले आहे. तरी आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे.

ओंकार चव्हाण …25/01/2016

मला सिताफळ लागवड करायची आहे. चोपण जमिनीवर सिताफळ लागवड करता येईल का? माहिती द्यावी ही विनंती. 9421001270.

सानप गणेश केशवराव05/02/2016

बाळानगर जातीचे ५ एकर आहे. आणखी ८ एकर लावायची आहे तरी nmk1 ला पाणी जादा लागते. कोणती जात लावावी? मो. ९५४५३९६९८१ बाळानगरचे रोपे मिळतील.

अंबरीष भाउसाहे…13/02/2016

छान

अरूण मुनघाटे14/02/2016

मला nmk1 gold जाती सिताफळ रोपे हवी आहेत. nmk1 ला आवश्‍यक असलेल्‍या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती हवी आहे.

दिनेश राजपुत 24/02/2016

मला सिताफळाचे पिक शेतात घ्यायचे आहे. कोणत्या जातीचे सिताफळ लावावे याबद्दल मार्गदर्शन हवे. मो. न. 9371783388.

अरविंद पंढरपुर…31/03/2016

मला पण सिताफळांची लागवड करावयाची आहे. मार्गदर्शन करावे ९५६१५९७०५१.

सुदशंन तात्याबा यादव21/05/2016

Sitafalachi rope (nmk) gold kothe miltil?

sameer shivaji KALE27/06/2016

मला सीताफळ लागवड करायची आहे. मार्गदर्शन हवे.

बाळासाहेब बोरक…29/06/2016

मी मु. पो. चिंचपूर पांगुळ ता. पाथर्डी जि. अहमदनगर येथे राहतो. मला सिताफळांची लागवड करायाची आहे. कोरडवाहू जमिनित सदर लागवड करता येईल काय? त्यासाठी कोणत्या जातीची निवड करावी व ती रोपे कोणत्या ठिकाणी मिळतील?

संजय जनार्धन ब…30/06/2016

खूप चांगली प्रगती आहे. मी हे आपण विकसित केलेले सीताफळ पाहिले. खूप मोठे आहे .सुंदर आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा!

संतोषभोईर मु, …30/06/2016

मला सिताफळ लागवड करायची आहे तर गोलड़न आणि आणेणा 2 विषयी माहीती हावी

कांतिलाल अरूण …31/07/2016

Nmk1 सिताफळ रोप मिळेल का

मंगेश भुजबळ ९९…12/08/2016

मला सीताफळ लागवड करायची आहे , कोणती प्रजाती लावावी

जगदीश विठ्ठल भाकरे16/08/2016

सिताफळ शेतकरी

तुकाराम पानखडे27/08/2016

मला पन नविन शिताफळ लागवड करायची आहे काळीची जमीन चालते का

शेखर साळुंके 18/09/2016

खुप दीवसा पासन लावाची ईच्छा आहे आणी आज सापडले थोडी मदत करा?

रामदास फाटे19/09/2016

खुप छान मला n m k 1 जातीचे पाणी नियोजन व लागवडी नंतर फळे कधी येतात. फळांचे वजन सरासरी किती असते माहीती हवी आहे .मो.8805723591.

विठ्ठल निलक दे…20/09/2016

माझ्या बागेतील 1 झाडालासीताफळ लागली असुन ती काळी पडतात कृपया उपाय सांगा .

प्रविण सयाजी भ…21/09/2016

Khupach chhan

thorat shivaji…02/10/2016

मला एनएमके1 गोल्‍ड या जातीचे बियाणे पाहीजे कोठे मिळेल या बाबत माहीती सांगा.९७६३८६६६९९

पुरुषोत्‍तम मन…03/10/2016

मला पण सिताफळांची लागवड करावयाची आहे. मार्गदर्शन करावे ९४०४४९३४३९

सागर पाटील04/10/2016

मला सीताफळ लागवड करायची आहे, माझी जमीन काळी आहे, कोणती जात लावावी कृपया आपले मार्गदर्शन मिळावे. मो ७८७५४४५३२५

वैभव 08/10/2016

This is wonder farm

Sudhir Dilip jadhav11/10/2016

तुम्ही निर्माण केलेल्या सिताफळ फार छान आहे मला तीन एकर वर बाग निर्माण करायची आहे आपले मार्गदर्शन आणि कलमे पाहिजे.कलमा चे दर आणि केव्हा मिळेल.

डाॅ. शिवराज देशमुख16/10/2016

तुम्ही निर्माण केलेल्या सिताफळ फार छान आहे मला तीन एकर वर बाग निर्माण करायची आहे आपले मार्गदर्शन आणि कलमे पाहिजे.कलमा चे दर आणि केव्हा मिळेल.

डाॅ. शिवराज देशमुख16/10/2016

शेतीचे फोटो हवे होते

सुधीर जाधव31/10/2016

सिताफळविषयी सविस्तर माहिती मिळाली.
लागवडीसाठी रोप कोठे मिळतील व दरविषयी अधिक माहिती हवी

गणेश पवार 942046132203/11/2016

नमस्कार nmk 1 लागवड करावयाची आहे. त्यासाठी माहिती मिळाली तर बरे होईल आणि पाणी किती लागेल

हिमत बाळासाहेब लाड 21/12/2016

मी माझ्या शेतात (ॲनोना-2)जातीच्या सिताफळाची लागवड केली आहे . पहील्यांदा खूप अडचणीला सामोरे जावे लागले.
पण नंतर मला भरपूर फायदा झाला.
address - at.pusra Tq.Wadwani
Dist.Beed
Mo.9673974402
9049874793

submitted by- Ganesh Naikwade
Date:-31-12-2016

Naikwade Ganes…31/12/2016

मला NMK 1 (Gold ) ह्या सितारा की लागवड करायची आहे आपले सुंदर मार्गदर्शन हवे आहे माझा पत्ता जिल्हा:- नाशिक

अनिल आंबादास उ…02/01/2017

सिताफळ लागवडी बदल माहीती दयावी 9765334446

संदीप करंडे08/01/2017

माझी शेती भूरमूठी आहे मला सीताफळ लावायचा आहे तरी मला माहीत हवी

योगेश पीराजी ग…08/01/2017

1हेक्टर साठी किती रोपांची लागवड करावी लागेल ?

नारायण राठोड 10/01/2017

सऱ मला सिताफळाची लावगड करायची आहे. आपले मागरदरषन हवे आहे.

शिवशांत आढळकर…12/01/2017

सीताफल लागवड करायची आहे मध्यम साधारण जमीन आहे

श्री कैलास विज…14/01/2017

सीताफळ खत व्यस्थापन बद्दल माहिती द्यावी

संतोष रामचंद्र…31/01/2017

गाव: करकंब ता पंढरपूर येथे आमची १५ ऐकर
बाळानगर सिताफळाची बाग आहे जोपासणे
बाबत मला जरूर माहीती मिळावी
मो.७०५८७५२५८४

सुरज मुकुंद व्यवहारे28/02/2017

सिताफळाची लागवड करायची आहे कोण्या जातीची करावी वआपल्या कडेरोपे आहेका याची माहिती द्या

दिलीप पाटिल मो…12/03/2017

मला सीताफळ लावायचे आहे कोणती जात व रोप कुठे मिलातील. कृपया माहिती द्या मो ९६७३८८९३७९ / ९६६५२६८१२९

भूषण बोरसे14/06/2017

मलाही सिताफळ लागवड करायची आहे तरी मला रोपे पाहिजेत माझी शेती फलटण तालुक्यात आहे तरी फलटण जवळपास कोठे रोपे भेटतील कृपया मला सहकार्य करा मो.9665471125

dhekale bhiva …29/06/2017

very nice indeed am proud of you and I like it.

santosh phadatre26/08/2017

mala 1200 balanagar sitafal Zade lavayachi krupaya bhav VA kashi poch milel

NIRANJAN VIJAY…02/09/2017

मला सिताफल हवे आहेत रोज 5000 किलो

manoj sonune25/09/2017

मला NMK1 (गोल्डन) या जातीचे बियाणे ठाणे -पालघर या भागात लागवड व रोपे तयार करून विकण्यासाठी ठेवायची आहेत. तरी हे बी व लहान रोप कुठे मिळेल याही माहिती द्यावी. ८०८७०२०८७९

TUKARAM PASHTE27/09/2017

एन.एम.के १ गोल्डन या जातीचे बियाणे मुंबई-ठाणे येथे कुठे मिळेल, किमान १००० रोपे खरेदी करायची असल्यास कुठे संपर्क करावा याची माहिती द्यावी.

TUKARAM PASHTE27/09/2017

माजी शेती dongral bhagat आहे. सीताफल गेता येइल का

Raju pawar 02/10/2017

NMK1 (गोल्डन) या सीताफ रोपे हवी आहेत mob no 9545700047 Baswaraj Tanwade

Baswaraj Tanwade08/10/2017

सर, मला सिताफळ लावय़ाची आहे त्या करीता तुमचे मार्गदशन खुप महत्वाचे आहे. माझी विनंति आहे तुम्हाला माझा मो. 9822233737

किरण गदादे28/10/2017

mala custer apple chi rope kuthun miltil me nashik yethe rahato krupaya mahiti dyavi.

pravin jadhav03/11/2017

mala sitafal lagvad karaychi aahe tumi shetat yeun margdarshan dyal kay plz
8975886964

suvarna09/11/2017

गावरान व नवीन जातीचे सिताफळाच्या लागवड बाबत मार्गदर्शन करावे.ही नम्र विनंती

रावसाहेब इंगळे 16/11/2017

सर मला शिताफळा लागवड करायची
मला माहीती द्या

सुरज बांदल 19/12/2017

Mala sitaphal lagwad karaychi ahe .
Mo. 9623436922

Mayur kadam21/12/2017

चार एकर सीताफळ लावायचे आहे .जमीन साधारण मुरमाड आहे .मार्गदर्शन करावे ही विनंती .

विलास नागोराव मुळे03/01/2018

Very good

Prajakta08/01/2018

नमस्ते सर, पारंपारीक शेतीचा कंटाळा आलाआहे सर मि सिताफळ लागवड करण्याचे ठरवले आहे तरी मला NMK1 जातीची जून2018ला 400 रोपे हवी आहेत.

रमेश लाडाणे13/01/2018

मला MNK1या जातीची 400 रोपटी हवी आहेत9096757750

रमेश लाडाणे22/01/2018

मी जि.प. शिक्षक असून मला माझ्या तीन एकर कोरडवाहू शेतात सीताफळाची लावगड करायची आहे. सिताफळाची जात कोणती लावावी. कारण माझ्या शेतात पाण्याची सोय नाही. पाण्याविना रोपे जगतील का. कृपया मार्गदर्शन करावे. राहुल नरवाडे मो.न. 9595909791,9689028390

राहुल नानाराव …27/04/2018

धंन्यवाद खूप छान माहिती मिळाली माझी पण सिताफळ लागवड करावी इच्छा आहे रोपे कुठे मिळतील माझी कोरडवाहू शेती आहे पाणी नियोजन कसे करावे मो. ९१७५४२८२२३

अमित कोष्टी09/05/2018

mala sitaphalachi lagvad karaychi tari aamachya bhagat water problem aahe march paryant tari pani tikte trai plz aaple margdarshan milave
cont. 9762986240 sattishshelke

satishshelke27/05/2018

MAST... HATS OFF TO THE NMK..

THANK YOU UJWALAJI .. DUE TO YOU ONLY WE CAME TO KNOW ABOUT THE BRILLIANCY.

SHRIKANT GAIKWAD28/05/2018

Khup changle ahe Kami kharchat ani mehanitun aapan viswa Norman keel manacha mujara

Talekar Vilas …29/05/2018

Mala mnk 600 zade pahije

Pandit mohite06/06/2018

मला सीताफल लागवड करायची आहे.कोणती जात लावावी.मार्गदर्शन करावे

Sachin Madane09/06/2018

मला सीताफल लागवड करायची आहे.कोणती जात लावावी.मार्गदर्शन करावे
किशोर नवले
9860649498

किशोर नवले12/06/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.