संत सावता माळी आणि त्यांची समाधी


संत सावता माळी यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र झाले. अरणभेंडी येथे ज्या मळ्यात सावता माळी भाज्या पिकवता पिकवता विठ्ठलभक्ती करत, त्या मळ्यातच विठ्ठलाला पाहत. त्यांनी त्यांचा देहदेखील त्या मळ्यातच विठ्ठलाचे नाम घेत ठेवला. त्या ठिकाणी समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. पंढरपूरला जाताना भक्तमंडळी आवर्जून अरणभेंडी येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत सावता माळी यांनी त्यांच्या अभंगांमधून आणि जगण्यामधून कर्म हाच ईश्वर हा संदेश महाराष्ट्राला दिला.

संत सावता माळी यांनी हे सांगितले, की परमेश्वराची आराधना करताना भाव महत्त्वाचा असतो. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांपेक्षा भक्तिभाव हा खरा. त्यांनी मानवता धर्म हा महत्त्वाचा मानला.

सावता माळी यांनी त्यांचा ‘माळ्या’चा धर्म आचरत, शेती करत करत परमेश्वराची आराधना केली. शेतात भरपूर कष्ट करावेत, लोकांना खरा मानवता धर्म समाजावून सांगावा. त्यांच्या मनातील अंधश्रद्धांचे तण उपटून काढून समाजमनाची मशागत करावी, समाजात जागृती करावी या हेतूने सावता माळी अभंग लिहीत, कीर्तन करत. सावता माळी हे बंडखोर, कर्ते सुधारकच होते असे म्हणावे लागेल.

सावता माळी यांच्या गावाजवळ पंढरपूर आहे, परंतु ते कधीही पंढरपूरला जात नसत. सावता यांना तेथील संतांच्या मांदियाळीत सामील होण्याची इच्छा झाली नाही. त्यांना वाटे, की ते जातीचे माळी आहेत. त्यामुळे त्यांनी मनापासून शेतीत-मातीत राबावे, पिकांची मशागत करावी, गाईगुरांना प्रेमाने सांभाळावे. शेतीला पाणी द्यावे, चांगले भरघोस पीक काढावे, अडल्यानडल्यांना मदत करावी हीच खरी पांडुरंग भक्ती आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे ते शेतीत रमत. ते शेती सोडून कुठेच कधी गेले नाहीत.

एके दिवशी, पंढरपूरला जाणाऱ्या वारक-यांची दिंडी त्यांच्या शेताजवळच्या रस्त्यावरून चालली होती. सावता माळी यांनी त्यांच्या भजनांचा, टाळमृदंगाचा आवाज ऐकला आणि ते शेतातून बाहेर आले. त्यांनी त्या वारकऱ्यांची पाणी, भाकरी, फळे, फुले देऊन पूजा केली. निघताना सावता यांनी त्यांच्या पायांवर डोके टेकवले व ते म्हणाले, “पंढरपूरला निघाला आहात. पांडुरंगाला माझाही नमस्कार सांगा.” वारकरी चकित झाले. त्यांना वाटले, अरणभेंडी तर पंढरपूरच्या वाटेवरच, किती जवळ आहे, मग ते त्यांच्याबरोबर का येत नाहीत? त्यांनी त्यांच्या मनातील शंका सावता यांना विचारली. तेव्हा सावता माळी उद्गारले, “मी कसा येऊ? मी आलो तर देव माझ्यावर रुसेल. मला रागवेल.” वारक-यांनी विचारले, “का रागावेल?” त्यावर सावता माळी यांनी सांगितले, “अहो, माझा पांडुरंग या शेतात राहतो. या शेतात-मळ्यात राबणे, भाज्या-फळे पिकवणे, वाटसरूला भाकरी देणे हीच माझी विठ्ठलभक्ती. हा मळा हेच माझे पंढरपूर! ही ज्वारीची ताटे म्हणजे माझ्या पांडुरंगाची कमरेवर हात ठेवलेली जिवंत रूपे आहेत. ही सळसळणारी पाने, ही उडणारी पाखरे, हे झुळझुळ वाहणारे पाणी विठ्ठलभक्तीचीच तर गाणी सदासर्वदा गात आहेत. हे सर्व येथे, या मळ्यात आहे, तर मी पंढरपूरला येऊन काय करू? ”

त्यांचे हे बोल ऐकून वारकरी खजील झाले. पांडुरंग केवळ मूर्तीत नाही तर आपण जे रोजचे काम करतो ते हसतमुखाने, मनापासून करण्यात पांडुरंगाची खरी भेट होते. असा संदेशच सावता माळी यांनी त्यांना दिला होता!

कांदा, मुळा, भाजी | अवघी विठाई माझी ||
लसुण, मिरची, कोथिंबिर | अवघा झाला माझा हरी ||
अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आमुचि माळियाची जात | शेत लावू बागाईत ||
आम्हा हाती मोट नाडा | पाणी जाते फुलझाडा ||
चाफा, शेवंती फुलली | प्रेमे जाईजुई व्याली ||
सावताने केला मळा | विठ्ठल देखियला डोळा ||

असे अभंग गात सावता महाराज त्यांच्या मळ्यात अखंड काम करत असत. पिकांना पाणी देताना, खुरपताना मुखाने अखंड हरिनाम घेत असत, म्हणून त्यांच्या जीवनात शांतता होती.

अरणभेंडी गावात त्यांच्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. ती दंतकथा अशी आहे, की पैठणच्या कूर्मदास या अपंग भक्ताच्या बोलावण्यावरून प्रत्यक्ष विठ्ठल त्याला भेटण्यास निघाले असताना, वाटेत ते सावतोबाच्या मळ्यात थांबले. त्यांनी बरोबर संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांनाही घेतले होते. विठ्ठलाच्या मनात नामदेवांना भक्तीची पराकाष्ठा किती असते ते दाखवायचे होते. विठ्ठल त्या दोघांची नजर चुकवून सावता माळी यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी सावतोबांना घट्ट मिठी मारली. म्हणाले, “सावतोबा, माझ्या मागे दोन चोर लागलेत. मला पटकन् कोठेतरी लपव.” त्यावर सावतोबा म्हणाले, “देवा, अशी कोणती जागा आहे, जेथे तू कोणाला दिसणार नाहीस?” विठ्ठल म्हणाले, “मग तू मला तुझ्या उदरात लपव.” त्याबरोबर सावता माळी यांनी खुरपे घेऊन आपले पोट फाडले व देवास त्यात लपवले! इकडे, देवाचा शोध घेत घेत ज्ञानदेव, नामदेव सावता महाराजांपाशी आले आणि म्हणाले, “आमचा देव पाहिला आहे का तुम्ही?” सावता माळी यांनी काहीच उत्तर दिले नाही. नामदेवांनी देवाचा धावा सुरू केला. ते विठ्ठलभेटीसाठी व्याकूळ झाले. विठ्ठलाला ते पाहवेना. त्यांनी सावतास सांगितले, “काढ रे मला बाहेर, माझ्या वियोगाने त्याचा जीव जाईल.” तेव्हा सावतोबाने पुन्हा खुरप्याने पोट फाडून पांडुरंगास बाहेर काढले! सावतोबांना त्यांच्या उदरात प्रत्यक्ष विठ्ठलाने वास केला याचा परमानंद झाला. त्यांनी तो

‘सर्व सुखाचे सुख निर्मळ | कैसे दिसत आहे श्रीमुख निर्मळा ||
सावत्या स्वामी परब्रम्हपुतळा | तनुमनाची कुरवंडी ओवाळा ||’

अशा शब्दांत व्यक्त केला.

संत सावता महाराज आजारी पडल्यावर, त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि ते अखंड नामस्मरण करू लागले. त्यांनी त्यांचा देह पांडुरंगाला अर्पण करण्याचा निश्चय केला आणि ते शके 1217 मध्ये आषाढात पांडुरंगचरणी विलीन झाले! अरणभेंडी या गावात सावता महाराजांच्या शेतातच त्यांचे समाधिमंदिर बांधण्यात आले. त्यांनी मळ्यात जेथे देह ठेवला तेथेच त्यांच्या स्मृती जतन करून ठेवल्या गेल्या.

सावता यांच्यासारख्याच साधेपणाने त्यांचे समाधिमंदिर उभे आहे. गाभाऱ्यात विठ्ठल-रखुमाईची आणि सावता महाराजांची प्रसन्न मूर्ती आहे. सावतोबांचे अभंग भिंतीवर चारी बाजूंनी कोरलेले आहेत. वीणाधा-याच्या वीणेच्या झंकारात अहोरात्र मंदिर भरून जाते. लोक विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतात, सावता महाराजांच्या मूर्तीच्या पायांवर मस्तक टेकवतात, वीणाधाऱ्याच्या पुढे झुकतात आणि प्रसादाचे साखरफुटाणे खात खात, सावतोबांच्या अभंगांचे वाचन करतात. प्रपंच आणि परमार्थ एकच असल्याचे म्हणणारे, कांदा-मुळा, भाजीत विठ्ठल पाहणारे, मोट-नाडा-विहीर-दोरी यांनी अवघी पंढरी व्यापली आहे असे म्हणणारे सावता माळी त्यांना अभंगा अभंगातून भेटत राहतात. देवळातून मागच्या दरवाज्यात आले, की सावता यांच्या हिरव्यागार शेताच्या, निळ्याभोर आभाळाच्या पार्श्वभूमीवर भलामोठा वृक्ष सळसळत असलेला त्यांना दिसतो आणि त्या वृक्षावर किलबिलाट करत थव्याथव्यांनी उतरणारे पोपट, इतर पक्षी बघून आणि तेथील नीरव, शांत, प्रसन्न वातावरणात केवळ त्या वृक्षाची सळसळ आणि पक्ष्यांची गोड किलबिल ऐकत माणसे घटका-दोन घटका समाधिमग्न होतात. जणू तो मळा, ते आकाश, ती भल्यामोठ्या वृक्षाची सळसळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट यांतून त्यांना सावता माळी यांचा पांडुरंगच भेटायला आलेला असतो!

- अंजली कुळकर्णी

लेखी अभिप्राय

आपण संग्रहीत केलेल्या या माहीती मूळे आम्हाला आमचे आराध्य देवता सावता माळी यांची माहीती मिळाली आणी ती आमच्यासाठी फार महत्वाची आहे
मी आपले फार आभार मानतो
धन्यवाद

राजू माळी08/08/2015

चांगली माहिती दिलीत धन्यवादः

शंकर रासकर 05/09/2015

Nice

Dnyaneshwar ch…24/10/2015

मला संत सावता महाराज यांची माहिती मिळाली. मी एक माळीच आहे. धन्यवाद.

राम जाधव16/12/2015

खूप चांगली माहिती मिळाली. माझा माळी समाजात जन्म झाला याचा मला अभिमान आहे.

लक्षमण भानवसे(…01/01/2016

संत सावता माळी यांचे अभंग लेखन करणारे काशिबा गुरव यांच्याविषयी माहिती द्या.

प्रमोद गायकवाड01/03/2016

खूप चांगली माहिती मिळाली. माझा माळी समाजात जन्म झाला याचा मला अभिमान आहे. श्री.संत सावता माळी मंडळ दौलावडगाव आपले हार्दिक स्वागत करीत आहे. 9763555914

sandip जाधव13/03/2016

मला संत सावता माळी यांची माहीती मिळाल्याबद्दल धन्यवाद. - सुनिल ननवरे

सुनिल ननवरे19/03/2016

कोण माळी? कुठल्या कुळी? अजुन जात धर्म मपल्या भाळी ! विठ्याचा बुक्का मर हटृ कपाळी. आजि देखली कपाळकरंट्यांची मांदियाळी!

भिकन बागवान21/04/2016

खूप छान माहिती। असाच उपक्रम चालू ठेवा।। धन्यवाद।।

निलेश पाटील खा…30/04/2016

संत सावता माळी महाराज यांच्या बद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे मी आपला खूप खूप आभारी आहे. कृपया करून महाराजांचे जास्तीत जास्त फोटो अपलोड करावेत हि विनंती. जय सावता महाराज.

राजेश नरेशराव …07/06/2016

संत सावता माळी महाराज यांच्या बद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे मी आपला खूप खूप आभारी आहे. कृपया करून महाराजांचे जास्तीत जास्त फोटो अपलोड करावेत हि विनंती. जय सावता महाराज.

राजेश नरेशराव …07/06/2016

सावता माळी यांच्याबद्दल इतक्या मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार. आपल्या या उपक्रमाला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. जय सावता.

अमोल पठारे 09/06/2016

आपण माळी समाजासाठी अतिशय मोठे असे काम करत आहात. शतशः नमन.

गिताराम कोंडीर…11/06/2016

ही माहिती अतिशय चांगली आहे.

सुनिल गवळे धुळे14/06/2016

आपण दिलेली माहिती अतिशय महत्त्वाची वाटली. यामुळे संत शिरोमणी सावता महाराज यांचा जीवन परिचय झाला, त्यांच्या कार्याचा परिचय झाला. त्यांचे सर्व अभंग वाचनास मिळावेत. त्यांच्या कार्यावर एम. फिल., पीएच. डी. संशोधने व्हावीत.

डॉ मनोज कांता…17/06/2016

खूप छान माहिती. असाच उपक्रम चालू ठेवा.

सुनिल ननवरे23/06/2016

संंत शिरोमणी सावता महाराजांंबद्दल छान माहिती मिळाली. धन्यवाद

श्री.दशरथ साबळे24/06/2016

चांगली माहीती मिळाली.

युवराज माळी30/06/2016

आपण खूप चांगली माहिती पुरवत आहात.

शिवप्रसाद अरुण हुसे 04/07/2016

आपण संत सावतामाळी यांची खूप छान माहिती दिली. अशीच समाज जागृती पुढे चालत राहो ही सावतामाळी चरणी प्रार्थना. धन्यवाद.

दत्तात्रय गवंड…06/07/2016

चांगली माहिती दिली धनवाद

सतीश मधुकर देश…09/07/2016

खूप छान माहिती दिली .धन्यवाद Jay Savta Mali.

Dnyaneshwar Itape13/07/2016

माळी माहिती खूप छान. धन्यवाद

Akshay adsul16/07/2016

आमुचि माळियाची जात | शेत लावू बागाईत ||

तुषार माळी23/07/2016

Malamahitiaplekubabharjaysavta

Bhagchnd.C.Wag…25/07/2016

फारच सुंदर. या कामी आपणास कोटि कोटी प्रणाम आणि लाख लाख शुभेच्छा
महाराजांचे अभंग अर्थास असावे अपेक्षा. लबडे महाराज अहमदनगर 9850561249

लबडे तुळशीराम …28/07/2016

माझ शेत माझा सावता (जय सावता)

किरण माळी28/07/2016

खुपचांगली माहिती मिळाली धन्यवाद

शंकर महाजन31/07/2016

खुप चांगली माहीती आहे आजच्या तरुन पिढिला याची नितांत गरज आहे

सुभाष अर्जुन फुके31/07/2016

जय ज्योती जय क्रांती

Vijay Shreeram Mali01/08/2016

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी .असा संदेश खरच आजच्या काळातही उपयोगी आहे.कामातच राम आहे हेच खरे.आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा पण सर्वोत्तम करा.हीच खरी सावता महाराजांना आदरांजली ठरेल.असे मला वाटते. जय सावता.

राजेंद्र महाजन 01/08/2016

अतिशय छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

श्री.दशरथ साबळे01/08/2016

Upakram farcagala aahe mahithi faarchan aahe

Ramdas mahajan…01/08/2016

सं सावता माळी याचा पुनतिथि निमित हादीक शुभछा

pandhari thengade01/08/2016

nice mi aapla khup khup aabhari aahe ki tumcha muly maza vvshajachi mahiti milali

ganpat laxman …01/08/2016

Khup chan

dr pradeep shi…02/08/2016

चांगली माहीती दिल्या बदधल मी मनापासून अभीनंदन करतो धन्यवाद

ज्ञानेश्वर राम…07/08/2016

मला सावता महाराज यांची कहानीआवडली

मनोज फकीरा महा…13/08/2016

खुप छान माहीती मिळाली हा उपक्रम असाच पुठे चालु ठेवावा धन्यवाद

संकेत राऊत (…23/08/2016

खूप छान माहिती

Akshay Nimkarde 15/09/2016

आपण संग्रहीत केलेल्या या माहीती मूळे आम्हाला आमचे आराध्य देवता सावता माळी यांची माहीती मिळाली आणी ती आमच्यासाठी फार महत्वाची आहे मी आपले फार आभार मानतो धन्यवाद

राहुल वसंत महा…04/10/2016

एकदम झ्क्क्क्क्कास

दयानद बाळसराफ06/10/2016

मला अरण ला जायच आहे तरी मला माहीती द्या

राम बगाडे 01/12/2016

श्रीसंत सावता ची कथा वाचून मन प्रसन्न झाले. सावता महाराजचे महात्म्य

Raju budha pardhi14/01/2017

9822830797उकृष्ट माहीती आहे हा वाटसॅपनंबर आहे

समीर नि दलवि प…14/01/2017

वाचुन खुप आनंद झाला मला आभिमान आहे मी माळी आसल्याचा

अनिल औदुंबर मे…17/02/2017

रानकृृष्णहरी....संत शिरोमणी यांचे थोडक्यात दिलेले चरित्र स्तुत्य आहे.संकलन कर्त्यांना शतश:नमन...धन्यवाद...

देवगोपालजी महा…18/07/2017

आमचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सांवता महाराजा ची माहिती मिळाल्या
बाबत मी तुमचा खूप आभारी आहे माळी सेना शेंगाव शहर आपले हार्दिक अभिनंदन करतो .मी सुरज शेगोकार माळी

Suraj shegokar22/11/2017

Nice it is a very good information.

Akshay arun khaire14/01/2018

Nice
All of this
Good information

Vishal Gadekar 02/04/2018

सावता माळी यांच्याबद्दल इतक्या मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार. आपल्या या उपक्रमाला
माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. जय सावता.
vilas jayprakash kandalkar
kurum ta -murtizapur
dist - AKOLA

vilas jaypraka…16/04/2018

खुप छान माहिती.
आपण माळी समाजासाठी अतिशय मोठे असे काम करत आहात. शतशः नमन.

Shyam Raut 16/04/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.