नागपूरची ‘माग्रस’ चळवळ


सुधीर देवसमाजातील वाचनवृत्ती कमी झाल्याची झळ नागपूरच्या ‘माग्रस’ चळवळीलादेखील लागली. ‘माग्रस’ (माझा ग्रंसंग्रह) चळवळीने गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून अनेकांची खासगी ग्रंथालये वाङ्मयीन दृष्ट्या सशक्त केली. नागपूरच्या त्या उपक्रमासोबत जुळलेल्या कुटुंबांची आयुष्याची सायंकाळ सुरू झाली आहे. त्यामुळे नव्या पिढीने तो वसा पुढे चालवावा, यासाठी ती चळवळ ‘नेटिझन फ्रेंडली’ होऊ पाहत आहे. इंटरनेटवरून आवडीच्या विषयावर वाचन करणा-या युवक-युवतींना ‘माग्रस’ने त्या विषयांवर बोलण्यास साद घातली आहे. परंतु देव यांच्याशी त्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्या आवाहनास कोमट प्रतिसाद मिळत असावा असे जाणवले.

नवी पिढी इंटरनेटवरून आवडीच्या आणि जे विषय आतापर्यंत गैरपारंपरिक असे मानले जायचे, अशा विषयांवर वाचन करते. त्या पिढीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘नवाग्र’ची (नवा ग्रंथ नवा वाचक) संकल्पना पुढे आली असल्याचे सुधीर देव यांनी सांगितले. इंटरनेट फ्रेंडली वाचक जोडताना ‘माग्रस’च्या सूत्राचे पालन होणारच आहे. व्यक्त होण्याची पद्धतही तीच राहील. बदलले असेल ते पुस्तक स्वरूपातील साहित्य, जे आता ‘नेट’वर उपलब्ध असेल. नवाग्र कट्ट्यावर व्यक्त होण्यासाठी भाषेचे बंधन न ठेवता मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘माग्रस’चे प्रवर्तक सुधीर देव म्हणाले, की आमचा प्रयत्न तरुणांनी नेटवर वेगवेगळे लेख वाचावे व त्यावर चर्चा करावी असा असतो. त्याचबरोबर, त्यांनी जुन्या लोकांच्या ग्रंथभेटी (स्नेह भेटी) चालू ठेवल्या आहेत, फक्त त्यामधील ग्रंथ काढून टाकले आहेत. ते त्या चर्चांना ‘मनमोकळे आभाळ’ असे म्हणतात व त्यावेळच्या बोलण्यामध्ये सहभागींकडून वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ येतातच. तो कार्यक्रम दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी देव यांच्या घरीच होतो.

माग्रसचे सदस्‍यदेव आणि मंडळींना माध्यमबदलाची चाहूल लागली आहे. त्यामुळे त्यांनी ‘मनमोकळे आभाळ’ गप्पांना जोड म्हणून दर महिन्याच्या चौथ्या रविवारी सिनेमा शो व त्यावर चर्चा असा कार्यक्रम ठेवला आहे. तो वृंदा पितळे यांच्या घरी होतो. त्यांच्याकडे प्रोजेक्शन, स्क्रीन वगैरे सुविधा आहेत. देश विदेशातील कलात्मक चित्रपट बघून त्यावर चर्चा घडवून आणली जाते. देव यांची रसिकत्वाची आतली हाक त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे ते उत्तमोत्तम, रसपूर्ण चित्रपट निवडतात व त्यांचे प्रदर्शन करतात. देव यांना संगीत, नाटक, चित्रपट अशा सर्व कलांमध्ये आस्था आहे व त्यादृष्टीने ते दोन्ही रविवारच्या कार्यक्रमांची आखणी चोखंदळपणे करतात. उदाहरणार्थ, त्यांनी ठाण्यातून इंग्रजी बंदिशींची सीडी आणून ती सभासदांना दाखवून त्यावर साधना शिलेदार यांचे भाषण योजले. साधना यांचा बंदिशींचा अभ्यास दांडगा आहे. असे वेगवेगळे विषय चर्चेत असतात.

वर्षातील वीस ते तीस चांगली पुस्तके निवडायची आणि त्यातील प्रत्येकावर प्रतिक्रियात्मक चर्चा घडवून आणायची, अशी ‘माग्रस’ची मूळ ओळख आहे. ‘माग्रस’चे कॅलेंडर फेब्रुवारी ते पुढील जानेवारी असे असे. वर्षभराची पुस्तके फेब्रुवारीत जाहीर होत. तसे आता केले जात नाही. तो उपक्रम गेली त्रेचाळीस वर्षे नागपुरात सुरू होता. त्या प्रवासाकडे मागे वळून बघताना सुधीर देव म्हणाले, “ग्रंथांवर होणारी चर्चा प्रतिक्रियात्मक असे, तेथे कुणाला वक्तृत्वाचा फड जिंकायचा नसे. दीड तासाच्या अनौपचारिक कार्यक्रमात निवडलेल्या ग्रंथांवर सर्वंकष चर्चा केली जाई.”

“या चर्चेसाठी ललित वगळून अन्य साहित्यप्रकार हाताळले जात. कारण ललित साहित्याचा जीवनाशी काडीचाही संबंध नाही ” असे सुधीर देव यांचे मत. त्यामुळे संगीत, चित्रकला, विज्ञान, संस्कृती आणि संशोधनात्मक लिखाणाला चर्चेत प्राधान्य दिले जाई.

चळवळ ऐन भरात असताना ‘माग्रस’चे एक हजार पुस्तकप्रेमी सदस्य होते. ती संख्या शंभर कुटुंबांवर आली आहे.

“माणसाची ओळख त्याच्या संग्रहातील पुस्तकांवरून होते” असे सुंदर वचन सुधीर देव यांच्या संग्रहातील पुस्तकांच्या कपाटावर चिकटवलेले आहे. त्यांच्या संग्रहातील पुस्तकांची संख्या सात हजाराच्या आसपास आहे.

सुधीर देव
९३२६०८०४३३
deosudhir@yahoo.com

Last Updated On - 18th Dec 2016

लेखी अभिप्राय

Lekh aaj wachala. Barich mahiti dilit, tyabaddal dhayawad.

Sudhir Deo27/12/2013

दिं.5/8/2016 दै. दिव्यमराठी, औरंगाबाद मध्ये "पुस्तकमित्र" सदराखाली "पुस्तकवेड्यांचा देव" या शीर्षकाखाली श्री अतुल पेठकर यांनी श्री सुधीर देव व त्यांनी स्थापिलेली "माग्रस" ही साहित्य चळवळ याविषयी दिलेली माहिती वाचून खूप आनंद झाला व आपणही या चळवळीत सामील व्हावे याओढिपोटी प्रथम आपणांसर्वांचे मनापासून अभिनंदन करून,हार्दिक शुभेच्छा देऊन मलाही सभासदस्यत्व द्यावे ही विनंती करतो !
मी मराठी असून मला माझ्या मातृभाषेचा अत्यंत आदर व अभिमान आहे. माझे तिच्यावर खूप प्रेम असून तिची सेवा आपल्या सहकार्याने करता आली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन! यासाठीची औपचारिक प्रक्रिया मला कृपया कळवावी म्हणजे ती मी आपल्या अटींसहित पूर्ण करिन. माझेही काही साहित्य(दोन पुस्तके) प्रकाशित झालेले आहे त्याबद्दलची माहिती मी आपल्या अनुमतीने पुढे सादर करिन. तूर्त पुनःश्च एकदा आपल्या साहित्य सेवेला प्रणाम व अभिष्टचिंतन! धन्यवाद !
आपला कृपाभिलाषी,
विजयकुमार भोसले, औरंगाबाद.
भ्र. ध्व.क्रं. 9326065000

विजयकुमार भोसले06/08/2016

संपादक महोदय,
अती उत्साहात अनवधानाने माझ्याकडून एका सभासदाच्या पोस्टला प्रामाणिक पण वैचारिक सकारात्मक प्रतिक्रिया thinkmaharashtra01 वर पाठवली गेली ही आपल्या नियमबद्ध संकेतानुसार माझी चूक झाली हे मी मान्य करून यापुढे याची पुनरावृत्ती कधीच होणार नाही याची आपणांस खात्री देऊन मला पुनःसभासदत्व द्यावी ही नम्र विनंती करतो आहे.
आपला विश्वासू ,
विजयकुमार भोसले , औ'बाद.

विजयकुमार रामच…21/09/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.