Member for

5 years 10 months

प्रकाश पेठे यांचा जन्‍म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्‍थायिक आहेत. त्‍यांनी 'सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर' मुंबर्इ येथून शिक्षण पूर्ण केले. पेठे यांनी १९६४ साली 'मराठी विश्‍वकोशा'साठी पंधरा जगप्रसिध्द वास्तुकलाकारांच्या चरित्र नोंदींचे लेखन केले. त्‍यांनी १९६५ मध्‍ये वास्तुकलेतील नव्या प्रवाहाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याच्या ओढीने अहमदाबाद व चंदिगडची दीर्घ सफर केली. त्‍यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्‍यांनी १९८९ मध्‍ये संगीत विशारद ही पदवी मिळवली. ते १९९८ मध्‍ये नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त झाले. त्‍यांंनी १९७७ पासून 'महाराज सयाजीराव विद्यापीठ' बडोदे येथे अतिथी प्राध्यापक, २००१ पासून 'सरदार वल्लभभार्इ पटेल इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलाजी' येथे आर्किटेक्चर आणि आणंद जवळील विद्यानगर येथे नगर रचना शास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अतिथी प्राध्यापक म्‍हणून जबाबदारी स्‍वीकारली आहे. पेठे यांना प्रवास, छायाचित्रण, साहित्‍य, संगीत आणि कला अशा विविध विषयांची आवड आहे. त्‍यांची 'स्वप्नगृह', 'धमधोकार', 'आनंदाकार', 'वडोदरा' व 'नगरमंथन' ही पाच पुस्तके 'ग्रंथाली' प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

094277 86823