Member for

2 years 11 months

धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर हे मुक्त पत्रकार आणि छायाचित्रकार आहेत. ते कोकणातील पहिल्या 'ओरायन इन्स्टिट्यूट ओफ सायन्स चिपळूण' या डे बोर्डींग इन्स्टिट्यूटचे कार्यकारी अधिकारी म्‍हणून काम पाहतात. वाटेकर शासकीय नोंदणीकृत स्थापत्य अभियंता असून त्‍यांनी E.M.B.A. (Marketing Management) आणि E.M.B.A. (Travel  & Tourism Management) या पदवी मिळवल्‍या आहेत. वाटेकर गेली सतरा वर्षे विविध सामाजिक उपक्रमांश संलग्‍न राहिले आहेत. त्‍यांनी चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थ क्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन या पाच पुस्तकांचे लेखन केले आहे. त्‍यांच्‍याकडे देशभरातील विविध विषयांवरील सुमारे पंचवीस हजार फोटांचा संग्रह आहे. त्‍यांनी संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादन केले आहे. त्‍यांचे राज्यभरातील विविध नियतकालिकतून पाचशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्‍यांच्‍या लेखनासाठी त्‍यांना 'उत्‍कृष्‍ठ जिल्हा युवा पुरस्कार', 'उल्हास प्रभात', 'नलगे ग्रंथ पुरस्कार' असे अनेक गौरव प्राप्‍त झाले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9860360948, 8275202037