Member for
5 years 8 monthsडॉ. सदाशिव सखाराम शिवदे हे 'अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदे'चे अध्यक्ष होते. त्यांनी पशुवैद्यक पदविका (D.Vet) मिळवली होती. त्यांनी मराठी आणि इतिहास या विषयांत एम.ए.ची पदवी तर. इतिहास-संस्कृत या विषयांत पी.एच.डी. मिळवली होती. त्यांनी संभाजीराजे, महाराणी येसूबाई, कान्होजी आंग्रे, हंबीरराव मोहिते, शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई, अशा अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवर संशोधन ग्रंथ लिहिले. त्यांची आतापर्यंत संशोधन ग्रंथ, शोधनिबंध, अनुवादित, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह या प्रकारांत एकूण अठरा पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या 'माझी गुरं-माझी माणसं' या ग्रामीण कथासंग्रहातील कथांचे आकाशवाणीवर वाचन झाले. शिवदे यांना त्यांच्या लेखनाकरता अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. शिवदे यांचे ७ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले.
9890834410