दुगावची पीराची यात्रा - हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक


नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या पूर्वेस बारा किलोमीटर अंतरावरील चांदवड-मनमाड मार्गावर ‘दुगाव’ नावाचे गाव आहे. गावाची लोकवस्ती पाच हजार. गावात हिंदु, मुस्लीम आणि इतर समाजाचे लोक राहतात.

समाज आजारी आहे?


मुंबईच्या वाकोला पोलिस स्टेशनात सहाय्यक पोलिस निरीक्षकाने गैरहजेरीची नोंद करण्याच्या मुद्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व स्वत: आत्महत्या केली. अधिकारीदेखील गोळ्यांना बळी पडले... ही मुंबईत घडलेली ताजी घटना. वाकोल्याच्या या घटनेनंतर, त्यात हत्या-आत्महत्या असली तरी तो गुन्हा नव्हे हे मुख्यमंत्र्यांनी जाणले व पोलिस खात्यास जागतिक कीर्तीच्या तज्ज्ञांकडून मानसोपचार उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे! ही वेडाचाराची घटना अपवादात्मक आहे का? मुळीच नाही. थोडे बारकाईने पाहिले तर सहज तर्क लावता येत नाही अशा घटना-प्रसंग व्यक्तींच्या व सार्वजनिक व्यवहाराच्या संबंधात वेळोवेळी घडताना दिसतात. गेल्या वर्ष-दोन वर्षांतील अशा तीन घटना डोक्यात रुतून बसल्या आहेत. त्यांचे सहज स्पष्टीकरण देता येत नाही. त्यांबाबत त्या त्या वेळी मानसोपचारतज्ज्ञांचे भाष्य प्रकट झाले, पण त्यातून मनाचे समाधान झाले नाही. घटना सहजपणे नोंदतो - 

... प्राध्यापकाने स्वत: च्या प्राध्यापक पत्नीला व मुलांना ठार मारून स्वत:स भोसकून घेतले.

थिंक महाराष्‍ट्रः प्रगतीची पावले


- दिनकर गांगल

‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पामध्ये साधनसंपत्ती व मनुष्यबळ या दोन्हींची कमी आहे. परंतु अशा स्वेच्छाप्रयत्नांमध्ये हे स्वाभाविकच आहे. मात्र लोकांना ही कल्पना भावते खूप, मग प्रतिसाद उबदार व धो-धो का येत नाही? कारणे दोन आहेत: एक तर ज्या पिढीला फुरसत आहे व जी पिढी सुखस्वस्थ आहे तिला संगणक, महाजाल या गोष्टी दूरच्या वाटतात, आपल्या जमान्याच्या वाटत नाहीत. उलट, जी पिढी या माध्यमाजवळ आहे ती जीवनसंघर्षात, करिअरच्या प्रगतीत गुंतली आहे. तिला ‘फेसबूक’,ट्विटर्’ ही दैनंदिन गप्पाष्टकांची सदरे फार प्रिय असतात. थोडे वेगळे आणि अधिक ओळखीचे उदाहरण म्हणजे मोबाईल फोन. हे अत्यंत उपयुक्त साधन, परंतु त्यावरील सत्तर ते ऐंशी टक्के संभाषण ही निव्वळ बडबड असते. पण विचार असा करू या, की एरवी घरात तरी असाच वायफळपणा चालू असतो ना? (असायचा ना?) घराघरातली माणसे कमी झाली म्हणून ती गरज मोबाईल फोनमधून जनात भागवली जाते. टेलिव्हिजनवरच्या ‘सोप’ दैनंदिन मालिकांची महती तीच सांगतात. राहण्याची घरे, जागा आणि माणसे या दोन्ही गोष्टींनी लहान झाल्यावर मोठ्या कुटुंबाची गरज सासू-सून-दीर-भावजया अशा, मालिकांतील नाट्यातून, एकत्रितपणातून भागवली जाते. असो.
 

‘थिंक महाराष्ट्र’ची संकल्पना Think Maharashtra Link Maharashtra अशी माणसांना जोडण्याची असल्याने ती लोकांना पसंत पडते. आतापर्यंत आपण परभणी, नांदेड, अंबाजोगाई, लातूर, धुळे, अमरावती, येथे बैठका घेऊन, तेथे मोठ्या पडद्यावर ‘थिंक महाराष्ट्र’चे पोर्टल दाखवून अनेक माणसांना या जाळ्यात आणले आहे.