शेतकरी एकत्र आला तरच टिकू शकेल आशुतोष गोडबोले 22/03/2016

'उत्‍सव चांगुलपणाचा' कार्यक्रमात विलास शिंदे यांचे प्रतिपादन

राजुल वासा यांची 'वासा कन्‍सेप्‍ट' गाजतेय फिनलँड'मध्‍ये! आशुतोष गोडबोले 06/03/2016

मुंबईच्या एका महिलेचा येत्या ८ मार्चला जागतिक महिलादिनी मोठा गौरव होणार आहे. तिच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर युरोपातील फिनलँडमधील तुर्कु येथील उपचार केंद्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन होणार आहे. त्यावेळी प्रत्यक्ष केंद्रस्थानी टुरकूचे महापौर, पालकमंत्री व अन्य मान्यवर असा मोठा लवाजमा हजर असणार आहे. मुंबईच्या त्या महिलेचे नाव डॉ. राजुल वासा असे आहे. तिने गेल्या दोन –तीन वर्षांत उत्तर युरोपात फिनलँड, स्वीडन या देशांमध्ये चमत्कार घडवून आणला आहे. अनेक मेंदुबाधित रुग्णांवर तिने मुख्यत: व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपचार सुचवून क्रांतिकारी सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यामुळे त्या भागात डॉ. राजुल वासा हे नाव कौतुकादराने घेतले जाते.

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ची सहा वर्षे किरण क्षीरसागर 05/03/2016

सप्रेम नमस्कार,

'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'ला सहा वर्षे पूर्ण झाली. आम्हाला हे काम करत असताना संशोधक, अभ्यासक, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, शास्त्रज्ञ, वक्ते, कलाकार, छांदिष्ट  अशा, महाराष्ट्रातील अनेक ‘वेड्या’ व्यक्ती भेटल्या. त्याचबरोबर सांस्कृतिक महत्त्वाच्या किल्ले-लेणी-मंदिरे- नदीघाट वगैरे वास्तू, गावोगावच्या प्रथा-परंपरा, यात्रा-जत्रा, खाद्यपदार्थ, बाजार असे संस्कृतिसंचित प्रत्ययास आले. त्यांच्या माध्यमातून आम्हाला येथील विधायकतेचा, प्रज्ञाप्रतिभेचा अनुभव आला. महाराष्ट्राची ही शक्ती आमच्या कामाला ऊर्जा पुरवत राहिली. वाचकही ते पाहून-वाचून-जाणून हरखून गेले. वाचकांचे प्रतिसाद, त्यांनी प्रकल्पाला केलेली उत्स्‍फूर्त मदत इत्यादी कृतींतून ती गोष्ट प्रत्ययास येत राहिली.