उद्याची नवी भाषा दृकश्राव्य असेल का?

प्रतिनिधी 25/05/2011

mohan_agashe     ‘स्‍पंदन परिवारा’तर्फे ‘मराठी सिनेमा - काल, आज आणि उद्या’ या विषयावर झालेल्या परिसंवादात सुरूवातीलाच डॉ. मोहन आगाशे यांनी मांडलेले भाषेबद्दलचे मत विशेष वाटले....

mohan_agashe

      ‘स्‍पंदन परिवारा’तर्फे ‘मराठी सिनेमा - काल, आज आणि उद्या’ या विषयावर झालेल्या परिसंवादात सुरूवातीलाच डॉ. मोहन आगाशे यांनी मांडलेले भाषेबद्दलचे मत विशेष वाटले. ते म्‍हणाले, की आपल्‍यावर नेहमीच शब्दाक्षर भाषेचा डॉमिनन्‍स राहिलेला आहे. साक्षरता या शब्‍दाचा अर्थ नेहमीच लिखित भाषेशी जोडण्‍यात आला. वयाच्‍या पाच-सहा वर्षापर्यंत आपण शाळेत न जाताच बोलीभाषा आत्‍मसात करतो. मात्र तरीही ती भाषा पुढील दहा-बारा वर्षे शाळेत शिकवली जाते. त्‍याउलट जन्‍माला आल्‍यापासून ज्‍या दृकश्राव्‍य भाषेतून आपण ज्ञान आत्‍मसात करत असतो, ती भाषा शिकवलीच जात नाही!
 

     आगाशे यांचे वक्‍तव्‍य चित्रपटभाषेच्‍या संदर्भात होते, मात्र त्‍याचा संबंध आपल्‍या वास्‍तव जगाशी तेवढाच गहिरा वाटला. आपण भाषा शिकतो, त्‍यावेळी बुद्धीचा संबंध अक्षरं आणि शब्‍दांशीच जोडला जातो आणि दृकश्राव्‍य भाषेशी असलेला संबंध दुर्लक्षितच राहतो. आपला सभोवताल एवढ्या झरझर बदलतोय की, जगातल्‍या सगळ्याच भाषा संवाद साधण्‍याच्‍या पातळीवर हळुहळू कमकुवत ठरू लागल्या आहेत. त्याची काहीशी छटा पाहायला मिळते. अशा वेळी जगाला एका अशा भाषेची आवश्‍यकता भासू लागेल की, जी संवादाच्‍या पातळीवर सशक्‍त तर असेलच, मात्र त्‍याचबरोबरीने ती वैश्विकही असेल. कदाचित पुढे जाऊन हीच दृकश्राव्‍य भाषा जगाची नवी भाषा ठरू शकेल!

-किरण क्षीरसागर
उपसंपादक, थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम

दिनांक - 25.05.2011

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.