संपादकीय


चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी महाराष्ट्राचे कलाजगत एके काळी फार गाजवले.  त्यांची शंभर मुद्रित चित्रे मुंबईचे विनय काळे यांच्या संग्रहात आहेत. त्याबाबतची माहिती 'थिंक महाराष्ट्र'वर दोन आठवड्यांपूर्वी सादर करताच जगभरातून विचारणांचा व प्रतिक्रियांचा पूर लोटला. 'थिंक महाराष्ट्र'ची अपेक्षा अशी आहे, की रसिकांनी त्याबाबतची किंबहुना या साइटवर येणा-या सर्व मजकुराबाबतची अधिक माहिती आमच्याकडे पाठवावी. उदाहरणार्थ, डॉ. रवीन थत्ते ह्यांचे 'ओबडधोबड ज्ञानेश्वरी' हे पुस्तक केशव भिकाजी ढवळे या संस्थेतर्फे गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले. त्यावेळी ज्योती ढवळे भेटल्या. त्यांनी ह्या संदर्भात अधिक माहिती दिली त्यात म्हणाल्या, की रघुवीरांनी ढवळे प्रकाशनासाठी पुस्तकांची सात-आठ मुखपृष्ठे केली आणि ती मूळ स्वरूपात त्यांनी फ्रेम करून ठेवली आहेत. विनय काळे यांच्या चित्रसंग्रहाबाबत औत्सुक्य असल्यास त्यांचा ईमेल - vinaykale7@gmail.com

हीच गोष्ट 'डुडुळगावच्या कमळबागे'ची. त्याबाबत वाचक-प्रेक्षकांना बरेच कुतूहल दिसून आले. सतीश गदिया ह्यांचा कमळांच्या बागेचा ध्यास आहे. ते कमळासंबंधी माहिती गोळा करत आहेत. त्यांच्या ह्या शोधाला आपण आपल्याकडे काही विशेष माहिती असेल तर ती पुरवून सहाय्य करू शकतो. किंबहुना, वेबसाईटच्या माध्यमाची ती ताकद आहे - अनेकांच्या सहभागातून माहितीची परिपूर्णता साधणे! 'थिंक महाराष्ट्र'ला ते अभिप्रेत आहे.

वाचक-प्रेक्षक पुढील पत्त्यावर thinkm2010@gmail.com किंवा 'थिंक महाराष्ट्र', पूजासॉफ्ट हाऊस, यु-१२८, दुर्गामाता मंदिराजवळ, सेक्टर -४, ऐरोली, नवी मुंबई - 400708 आपले लेखन पाठवू शकता.

संपादक म्हणून माझ्याशीही संपर्क साधता येईल.dinkarhgangal@yahoo.co.in, Tel: (022) 25221648, 9867118517

नोंदी म्हणून 'सांस्कृतिक'मध्ये नवा विभाग देत आहोत. वेगवेगळ्या लेखांत जे शब्द वा व्यक्ती ऐतिहासिक व पारंपरिक महत्त्वाच्या असतात, त्यांच्याबाबत अधिक तपशिलातील माहिती तेथे मिळते. उदाहरणार्थ 'वास्तवातील नवलाई'मध्ये जेजुरीवरील टिपणात संबळचा उल्लेख आला तर ती नोंद तेथे आहे व तळेगावसंबंधीच्या लेखात गो.नी. दांडेकरांचा उल्लेख अटळपणे येणार; तर तो लेख 'नोंदी'मध्ये येईलच. अशा नोंदी काढत जाऊन महाराष्ट्राचे 'संचित' येथे तयार होईल असे अभिप्रेत आहे.

- दिनकर गांगल
  संपादक

लेखी अभिप्राय

Waril mahiti wachali. Tya tya vyaktinna savistar vicharinach. kalawe. dhanyawad.

Sudhir Deo15/12/2013

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.