संरक्षित घर


2009माणसाला आपल्या जीव-जुमल्याचे संरक्षण करण्याची फिकीर कोणत्याही काळात असते. आज मुंबई-पुण्यात सुरक्षित गृहसंकुले बांधण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. चहुबाजूंनी कोट असतो. प्रवेशद्वारावर गुरखा असतो. आलेल्या पाहुण्याची चौकशी केल्यावर त्याला आत सोडले जाते. अनेक ठिकाणच्या कंपाउंडच्या भिंती आठ फूट उंच असतात. तसाच हा नाशिकचा जुना वाडा. भुरटया चोरांपासून रक्षण करणारा. याच्या तळमजल्यावरच्या भिंती भक्कम दगडाच्या आहेत. तळमजल्यावर खिडक्यांच प्रमाण कमी असून वाड्यात शिरण्यास एकच दरवाजा आहे.
पैठणचा वाडा, मे 1979.

तसेच हे पैठणचेही एक जुने घर. वास्तविक पैठण आणि नाशकात पुष्कळ अंतर आहे.तरीही गृहसंरक्षणाची कल्पना बदललेली दिसत नाही. तसं पैठणमधलं एका माहेश्वरी कुटुंबाचं हे घर. ते तीनशे वर्षांपूवी बांधलं गेलं आहे. असं कळलं. जसा काही किल्लाच! या घरातही चौक आहे. तळमजल्यावरच्या भिंती दगडाच्या आहेत आणि खिडक्या नाहीत. प्रवेशद्वारातून आत गेलं की चौक आहे. मोठ्या कुटुंबाला दोन वर्षें पुरेल इतक्या धान्याचा साठा करायची सोय आहे. या घरातलं स्वैपाकघर मोठं असून चुलीतला धूर निघून जाण्यासाठी उंच छताखाली खिडक्या आहेत. या घराचे प्रवेशद्वार किल्ल्याच्या दरवाजासारखे आहे

मुंबईतलं अल्टामाऊटं रोडवरील बांधलं जात असलेलं मुकेश अंबानींचं घर. याची उंची 173 मीटर असेल. ते शिकागोच्या पर्किन्स आणि विल यांनी डिझाईन केलं आहे.या घरावर आधुनिक काळाप्रमाणे हेलिकॉप्टर उतरवण्याची सोय आहे. त्यात पाहुणे, पोहण्याचा तलाव, जिम, आरोग्य केंद्र, बगिचे, करमणुकीची साधनं असतील. सिनेमा पाहण्याची सोय असेल. याचा खर्च दोनशें कोटी डॉलर्स येईल असा अंदाज आहे. ह्याचं संरक्षण करायला पाच-पंचवीस पहारेकरी असतील.खालचे पाच-दहा मजले पार्किंग व अशा सोयींसाठीच जाणार आहेत. अंबानी कुटुंब सर्पहल्ला पासून बचावासाठी संरक्षित झालेल्या जनमैजयासारखं तिथे राहील.

संदर्भ : www.luxemag.org/real-estate/mukesh-ambani-house.htmlwww.rediff.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.